Stroke  Sakal
आरोग्य

World Stroke Day 2022 : भाज्या, फळे कमी खाल्ल्यानेदेखील होऊ शकतो स्ट्रोक

स्ट्रोकवर उपचार करण्याऐवजी प्रतिबंध करण्यावर अधिक भर देण्याची गरज असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सकाळ डिजिटल टीम

World Stroke Day 2022 : कोरोनानंतर लोकांमध्ये स्ट्रोकचा (Stroke) धोका वाढला आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असेही सांगण्यात आले की, कोरोनाची (Corona Vaccination ) लस घेतल्यानंतर लोकांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची समस्या निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत ब्रेन स्ट्रोक व्यतिरिक्त पल्मोनरी थ्रोम्बोसिसचे रुग्ण समोर येत आहेत.

मात्र, तज्ज्ञांच्या मते काही सामान्य गोष्टी आहेत ज्यांची दैनंदिन जीवनात काळजी घेतली जात नाही, अशा व्यक्तीदेखील या आजाराचे बळी ठरू शकतात. आज आम्ही तुम्हाला असंतुलित आहाराच्या सवयींमुळे होणाऱ्या स्ट्रोकबाबत माहिती सांगणार आहोत.

स्ट्रोकवर उपचार करण्याऐवजी प्रतिबंध करण्यावर अधिक भर देण्याची गरज असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे (Health Expert) म्हणणे आहे. जेव्हा स्ट्रोक येतो तेव्हा मेंदूला होणारा रक्तपुरवठा थांबतो. यामुळे मेंदूच्या पेशींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ज्यामुळे गंभीर प्रकरणांमध्ये अर्धांगवायू आणि मृत्यू देखील होऊ शकतो.

अति धूम्रपान, मद्यपान आणि चुकीच्या जीवनशैली हीदेखील पक्षाघाताची कारणे असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. या चुकीच्या सवयींमुळेच गेल्या काही वर्षात तरुणाईही मोठ्या प्रमाणात पक्षाघाताचे बळी ठरत आहे.

watermelon

स्ट्रोकची सुरुवातीची लक्षणे

स्ट्रोकच्या सुरुवातीच्या लक्षणांवर लक्ष ठेवल्यास यातून निर्माण होणारे गंभीर परिणाम टाळता येऊ शकतात. चेहऱ्याचा एक भाग वाकडा होणे, एका हातामध्ये दुखणे, आवाजाची तीव्रता कर्कश होणे किंवा बोलण्यात अडचण यांसारखी लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Vegetables

फळे आणि भाज्यांचा कमी सेवनानेही आहे धोका

वरील कारणांसोबतच स्ट्रोक येण्यामागे एक चतुर्थांश प्रकरणे ही असंतुलित आहाराशी संबंधित आहेत, विशेषतः फळे आणि भाज्यांचे कमी सेवन केल्यानेही स्ट्रोकाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आहारात फळे आणि भाजांचे सेवन संतुलित प्रमाणात करणे आवश्यक आहे. तसेच स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी मिठाचे सेवन कमी करावे. मद्य, तंबाखू, सिगारेट किंवा इतर मादक पदार्थांचे सेवन टाळण्यास स्ट्रोकचा धोका कमी होतो. त्यामुळे मादक पदार्थांपासून दूर राहणे केव्हाही फायदेशीर ठरू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१५ वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग मेपर्यंत पूर्ण होणार, पण...; राज्य सरकारने दिली महत्त्वाची माहिती

T20 WC, IND vs WI: 'माझे ११ सैनिक सज्ज आहेत...' विंडीजच्या सॅमीची टीम इंडियाला सामन्यापूर्वी चेतावणी

Nashik Malti IVF Center : बदलापूर स्त्रीबीज तस्करीचे धागेदोरे नाशिकमध्ये! महापालिकेकडून 'मालती आयव्हीएफ'ला नोटीस

Latest Marathi News Update : मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर शहरात वाहतूक कोंडी

Kolhapur : 'ड्यूटी'वरून एलसीबीचे दोन 'पाटील' भिडले, पोलिस अधीक्षक कार्यालयातच सुपारी देऊन संपविण्याची भाषा

SCROLL FOR NEXT