Jalgaon School Reopen esakal
जळगाव

Jalgaon School Reopen : जिल्ह्यातील शाळांची घंटा उद्या वाजणार.... शाळा प्रवेशोत्सव होणार!

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon School Reopen : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह सर्व शाळा येत्या गुरुवार (ता. १५)पासून सुरू होणार आहेत. शासनाच्या शिक्षण विभागाच्या आदेशानुसार शाळेचा पहिला दिवस ‘शाळा प्रवेशोत्सव’ म्हणून साजरा होणार आहे. (All schools including ZP in district will start from 15 june jalgaon news)

त्यासाठी शाळा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. प्रभातफेरी काढून व पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. गुरुवारी जिल्हाभरातील शाळांची घंटा वाजणार असून, शाळांमध्ये सुट्यांनतर पुन्हा किलबिलाट सुरू होणार आहे.

उन्हाळ्याचा दीर्घ सुट्यानंतर शाळांमध्ये विद्यार्थी येतील. त्यांना शाळेत प्रसन्न वाटले पाहिजे. शाळेबद्दल आपुलकी निर्माण होऊन गोडी लागावी, या दृष्टीने तयारी करण्यात येत आहे. शिक्षण विभागाने जय्यत तयारी केली असून, नुकतीच त्याबाबत बैठक घेऊन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासन अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांच्या स्वागताच्या सूचना दिल्या.

शासनाच्या अध्यादेशानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंचांनी आपल्या गावातील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे आवाहन ल शिक्षण विभागाने केले आहे. कार्यक्षेत्रातील आमदार, खासदारांना शाळा प्रवेशाच्या कार्यक्रमांना आमंत्रित करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने केल्या आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शाळा होणार सुशोभीत

पहिल्याच दिवसासाठी शिक्षक व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी गाव किवा वॉर्डातील युवक-युवती मंडळे, बचत गटांच्या सहकार्यातून उपलब्ध संसाधनाच्या सहाय्याने शाळा परिसर स्वच्छ करून, सडा टाकून सुशोभीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गावातील उपलब्ध फुले आणि पानांची तोरणे बांधून वर्ग खोल्यांना सुशोभीत करण्याचे आदेश दिले आहेत.

मध्यान्ह भोजन व गणवेशवाटप

पहिल्याच दिवशी शाळेत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहारात खास गोड पदार्थ तयार करण्यात येणार आहेत. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश व मोफत पुस्तकांचे वितरण होणार आहे.

दीड लाख विद्यार्थ्यांना मोफत गणवेश

समग्र शिक्षामधून १ लाख ५९ हजार ८५० विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांतील इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व मुली, अनुसूचित जातीचे मुले, अनुसूचित जमातीचे मुले व दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुलांना समग्र शिक्षा अंतर्गत २०२३-२४ साठी मोफत गणवेश दिली जातील, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी दिली.

भारत सरकारच्या प्रकल्प मान्यता बोर्डकडून प्रतिविद्यार्थी दोन गणवेशांसाठी सहाशे रुपये मंजूर केले आहेत.

त्यापैकी सद्यस्थितीत शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश उपलब्ध होण्यासाठी प्रतिविद्यार्थी एक गणवेशासाठी ३०० रुपयांप्रमाणे जिल्ह्यातील १ लाख ५९ हजार ८५० लाभार्थ्यांसाठी एकूण ४ कोटी ७९ लाख ५५ हजार रुपये मंजूर करण्यात आले असून, ही रक्कम तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी कार्यालयास वर्ग करण्यात येणार आहे.

शाळेतील लाभार्थी संख्येनुसार विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देण्याची कार्यवाही शाळा व्यवस्थापन समितीने पूर्ण करून लाभार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश उपलब्ध करून दिले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT