Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : व्यावसायिकास 8 लाखांत गंडविले; Sextortion गुन्ह्यांचा Honey Trap

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : फेसबुकवर हाय हॅलो.. घरंदाज शब्दाच्या कोटींगने, विचारांची देवाण-घेवाण. लगेच व्हॉट्‌सॲप नंबर एक्सचेंज करून थेट संपर्काला सुरवात होते. त्यातून सावज हेरून ‘हनी ट्रॅप’चे प्रकार घडतात व धमकी देत लाखो रुपये उकळले जातात.

असाच काहीसा प्रकार जळगावातील व्यापाऱ्यासोबत झाला. एका महिलेने चक्क आठ लाखांचा गंडा घातल्याची तक्रार सायबर पोलिसांत दाखल झाली आहे.

या गुन्ह्यांमध्ये फेसबुक, व्हॉट्‌सॲप, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडीयाचा वापर करून सावज हेरला जातो.(businessman was cheated in eight lakh honey trap of sextortion crime Crime against women Jalgaon News)

मोबाइलवर व्हॉट्‌सॲपद्वारे व्हिडिओ कॉल करून अश्‍लील चित्रफित रेकॉर्डिंग करून नंतर ती व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्यात येते. असाच प्रकार जळगावमधील एका ५१ वर्षीय मिनरल वॉटर उत्पादकाबाबत घडला व त्यास आठ लाख रुपयांत फसविण्यात आले.

असा घडला प्रकार

सायबर पोलिस ठाण्यात पीडित व्यावसायिकाने तक्रार दिली. त्यानुसार, त्याच्या फेसबुक अकाउंटवर Riya Agrawal या अनोळखी महिलेने चॅटींगद्वारे संपर्क केला.

संपर्क होताच ओळख निर्माण होऊन या प्रौढासोबत मॅसेंजरवर चॅटींगला सुरवात झाल्यावर नंतर व्हॉट्‌सॲपद्वारे पर्सनल नंबरवरून व्हिडिओ कॉल करून अश्‍लील भाषेचा वापर करत भावना उत्तेजीत करून पीडित व्यावसायिकाचा नग्न व्हिडिओ तयार करण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आठ लाखांचा गंडा

आपल्या जाळ्यात ओढला गेल्याची संपूर्ण खात्री झाल्यावर आणि नग्न व्हिडिओ रेकॉर्डिंग हातात मिळाल्यावर त्या अनोळखी तरुणीने या व्यापाऱ्यास धमकी देत पैसे दिले नाही, तर ते नग्न व्हिडिओ यु ट्यूब व सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.

यामुळे भेदरलेल्या वृद्धाने AU SMALL FINANCE BANK व गुगल पे मोबाईल क्रमांकावर वेळोवेळी ऑनलाईन पेमेंट करत एकूण ७ लाख ७७ हजार ७४५ रुपये पाठविले. तरी त्रास कमी होत नसल्यानेमुळे त्यांनी शेवटी जळगाव सायबर पोलिसात फेसबुक खातेधारक Riya Agrawa विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक अशोक उतेकर तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Clash: मिरजेत दोन गटात राडा; तणाव नियंत्रणात, स्वतः एसपी उतरले रस्त्यावर

Himachal Pradesh Bus Landslide : हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये भीषण दुर्घटना; बसवर दरड कोसळून १८ जणांचा मृत्यू!

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या! वडील महावितरणमध्ये वरिष्ठ अधिकारी; अभ्यासात हुशार, घरची स्थिती चांगली, बहीणही मेडिकललाच, तरी केली उचलले टोकाचे पाऊल

विद्यापीठाच्या युवा महोत्सवात मानपानावरून कुलगुरुंसमवेत वाद; स्टेजवर बोलावून मानमान न दिल्याने अधिसभा व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सत्कार न स्विकारताच परतले

मोठी ब्रेकिंग! सोलापुरातील समर्थ सहकारी बॅंकेच्या व्यवहारावर ‘आरबीआय’चे निर्बंध; काय आहेत निर्बंध, वाचा...

SCROLL FOR NEXT