District Milk Union Election esakal
जळगाव

District Milk Union : जिल्हा दूधसंघातील वादग्रस्त नोकरभरती रद्द

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाच्या काळात जळगाव जिल्हा दूधसंघाची वादग्रस्त ठरलेली नोकरभरती रद्द करण्यात आली आहे.

नवीन संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हा दूधसंघाचे चेअरमन व भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.

आमदार खडसे यांच्या नेतृत्वाच्या काळात संघाला तब्बल नऊ कोटी ६० लाखांचा तोटा होता. पदभार घेतल्यानंतर एका महिन्यात ९० लाख रुपयांचा नफा मिळविल्याचेही त्यांनी सांगितले. (Controversial recruitment in District Milk Sangh cancelled Chairman Mangesh Chavan In last six years team incurred loss of Nine crores Jalgaon News)

जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाची बैठक शनिवारी (ता. २१) झाली. चेअरमन आमदार मंगेश चव्हाण अध्यक्षस्थानी होते. बैठकीत संघाच्या कामकाजाचा आढावा, तसेच आर्थिक माहिती घेण्यात आली.

संचालक मंडळाच्या कार्यकाळात गेल्या सहा वर्षांत नऊ कोटी ६७ लाख रुपयांचा तोटा झाल्याची माहिती मिळाली. यात ऑगस्ट २०२२ या महिन्यात प्रशासकीय मंडळ होते.

या काळात २० लाख रुपये नफा झाला, तर आता मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नवीन संचालक मंडळाने पदभार घेतल्यानंतर महिनाभरात ९५ लाख रुपयांचा नफा झाल्याची माहितीही आमदार चव्हाण यांनी दिली.

या महिनाभराच्या काळात संघात होणारा अतिरिक्त खर्च कमी केला आहे. अतिरिक्त असलेले तब्बल २० कामगार कमी केले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

नोकरभरती रद्द ठराव मंजूर

जिल्हा दूधसंघात २०२१ मध्ये १०४ कर्मचाऱ्यांची नोकरभरती करण्यात आली होती. राखीव जागांच्या प्रश्‍नावरून न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे न्यायालयाने नोकरभरतीला ‘स्थगिती’ दिली होती. नोकरभरतीचा प्रश्‍न संघाच्या निवडणूक काळात मोठ्या प्रमाणात गाजला होता. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे चेअरमन असताना, या भरतीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप विरोधी गटाने केला होता.

त्यावरून आरोप-प्रत्यारोप झाले होते. श्री. खडसे यांचा पराभव झाल्यानंतर राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन व पाणीपुरवठा स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनलची सत्ता आली. आता नवीन संचालक मंडळाने वादग्रस्त ठरलेली नोकरभरतीच रद्द केली आहे.

याबाबत चेअरमन चव्हाण यांनी सांगितले, की ही नोकरभरती रद्द करण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. नोकरभरती रद्द करण्यात आल्याची माहिती आम्ही न्यायालयात देणार आहोत. आता संघ तोट्यात असल्यामुळे नोकरभरती करण्यात येणार नाही. संघ नफ्यात येईल, त्या वेळी ही भरती करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोल्ड स्टोरेज जळगावातच

जिल्हा दूधसंघाचे बटर वाई येथील कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात येत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च होत होता. नेहमीच हा खर्च वादात होता. त्यामुळे आता कोल्ड स्टोरेज संघाच्या आवारातच उभारले आहे. त्याच ठिकाणी बटर ठेवण्यात येणार आहे.

त्यामुळे संघाचे वर्षाला १५ लाख रुपये वाचणार असल्याचेही चेअरमन चव्हाण यांनी सांगितले. बैठकीस संचालक तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, रोहित निकम, संजय पवार, अरविंद देशमुख, श्‍यामल झांबरे, पूनम पाटील, मधुकर राणे, ठकसेन पाटील, दिलीप वाघ, तर विरोधी गटाच्या छाया देवकर, प्रमोद पाटील, पराग मोरे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water Supply : पुण्यात एक दिवसाआड पाणी? आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष; वेळापत्रक तयार करण्याचे आदेश

Nagpur News : पोलिस कर्मचाऱ्याने स्नेहाची मृत्यूपूर्वीची चिठ्ठी रेकॉर्डवर घेतलीच नाही; चौकशीत झाले उघड

Shivrajyabhishek Din : स्वराज्याची राजधानी तेजोमय! शिवभक्तांचा मार्ग झाला प्रकाशमय

Sakal Vidya Education Expo 2026 : एकाच छताखाली करिअरच्या दिशा; गायिका बेला शेंडे यांच्या हस्ते आज प्रदर्शनाचे उद्‌घाटन

Mohol News : विवाहितेचा मृत्यू डॉक्टरच्या हायगयीने झाल्याचा नातेवाईकांचा आरोप; नातेवाईकांनी डॉक्टरवर कारवाईसाठी मृतदेह आणला पोलीस ठाण्यात

SCROLL FOR NEXT