Farmers waiting for heavy rains
Farmers waiting for heavy rains sakal
जळगाव

Jalgaon Rain Crisis : चाळीसगाव तालुक्यावर दुष्काळाचे ढग; दमदार पावसाअभावी ‘खरीप’ धोक्यात

दीपक कच्छवा

Jalgaon Agriculture News : पावसाळा होऊन अडीच महिने होत आले तरी अद्यापही चाळीसगाव तालुक्यात दमदार पाऊस नसल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. माळरानावर अत्यंत विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

अडीच महिन्यात केवळ २२२ मिलिमीटर इतकाच पाऊस झाला आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्याअखेर ४३७.११ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली होती. चाळीसगाव तालुक्यात पाऊस नसल्याने अनेक गावात पिके सुकू लागली आहेत. तालुक्यावर दुष्काळाचे ढग जमा होत असल्याचे चित्र आहे. (Due to lack of rain crops have started drying up in many villages Chalisgaon jalgaon news)

पावसाचे अडीच महिने होत आले तरी तालुक्यात दमदार पाऊस झाला नाही. फक्त रिमझिम पाऊस होत आहे. किरकोळ पावसावर आलेल्या पिकांची ढगाळ वातावरणामुळे वाढ खुंटत असून, तण मात्र मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने कपाशीसह अन्य पिकांची खुरपणीसाठी शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहे.

मजुरांना सुगीचे दिवस

सगळीकडेच तणाची समस्या निर्माण झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना रोजंदारीवर मजूर मिळत नसल्याने घरातील लहान, मोठ्यांची हजेरी शेतात दिसून येते. मजुरांचा सकाळी ९ ते दुपारी २ असा मजुरीचा दर २०० रूपये आहे. तर सायंकाळच्या पाचपर्यंतचा दर ३०० रूपये आहे.

यंदा रिपरिप पावसामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर तण वाढल्याने शेतकऱ्यांना जबर फटका बसत आहे. आधीच कोळपणी, वखरणी, औषध फवारणी यांचा खर्चाचा ताळमेळ बसत नसताना वाढलेल्या तणाने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत टाकले आहे.

तालुक्यातत कमी, अधिक प्रमाणात झालेल्या पावसावरच शेतकऱ्यांनी नगदी पीक कापसासह अन्य पिकांची लागवड केली. मात्र त्यानंतर केवळ रिमझिम पाऊस होत असून, त्यातून पिकांना केवळ सलाईन मिळत आहे. दररोजचे ढगाळ वातावरणामुळे पिकांची वाढ खुंटत चालली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

विशेषत: कोरडवाहू क्षेत्रात अत्यल्प पावसामुळे भयावह स्थिती आहे. अधूनमधून रिमझिम पाऊस येतो. त्याने न जमिनीत पुरेशी ओल होते ना वाढ होते. कोरडवाहू क्षेत्रातील पिके सुरूवातीला तजेलदार वाटत होती. आता मात्र पाण्याअभावी कोमजू लागली आहेत. काही गावांमध्ये दुबार पेरण्याही झाल्याचे सांगण्यात येते.

पिके काहीअंशी तग धरून

पीक वाढीस असताना दमदार पाऊस झाला नसल्याने पिकांची वाढ होऊन अपेक्षित उत्पन्न शेतकऱ्यांना मिळेल, याची शाश्‍वती नाही. बागायत क्षेत्रातील पिके काहीअंशी तग धरून असले तरी कोरडवाहू क्षेत्रातील स्थिती गंभीर होऊ लागली आहे. ९७ टक्के पेरणी तालुक्यात झाली असून, पेरणीयुक्त क्षेत्र ८७ हजार ८८५ हेक्टर क्षेत्रापैकी ८५ हजार ३३० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

त्यात ६३ हजार ६४० हेक्टर क्षेत्रात पांढरे सोने अर्थात कापसाची लागवड झाली आहे. त्या खालोखाल मका पिकाची लागवड १४ हजार ५७० हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. उर्वरित पिकांमध्ये ज्वारी, बाजरी व इतर पिकांचा समावेश आहे. आतापर्यंत ९७ टक्के पेरणी झाली असून, दमदार पाऊस नसल्याने अद्यापही ३ टक्के पेरण्या अद्यापही झालेल्या नाहीत.

कोरडवाहू क्षेत्राला फटका

चाळीसगाव तालुक्यात वार्षिक पर्जन्यमान सरासरी ६३७ मिमी इतके आहे. त्यापैकी यंदाच्या २३ ऑगस्टपर्यंत केवळ २४४ मिमी इतका पाऊस झाला आहे. गतवर्षी याच महिन्यात सुमारे ४४८ मिमी इतका पाऊस झाला होता. म्हणजे गत वर्षाच्या निम्मेच पाऊस यंदा झाला असून, परिणामी तालुक्यावर दुष्काळाचे ढग जमा होऊ लागले आहे.

अनेक गावांची स्थिती चिंताजनक आहे. १४ लघु प्रकल्पांपैकी केवळ खडकीसीम प्रकल्प १०० टक्के भरले आहे तर कृष्णापुरी धरणात ६० टक्के जलसाठा झाला आहे. उर्वरित १२ प्रकल्पांमध्ये अजूनही ठणठणाटच आहे. तर जिल्ह्याला वरदान असलेल्या गिरणा धरणातही केवळ ३५ टक्के साठा आहे.

४० गावांसाठी सिंचनाची सोय करणाऱ्या मन्याड धरणातही केवळ ६ टक्के साठा झाला आहे. भर पावसाळ्यात आठ गावांमध्ये टँकर सुरू आहेत. रूसलेल्या पावसाचे गणित आगामी काळात असेच राहिले तर पुढील काळात पाणीटंचाई आणखी डोके वर काढण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT