Gulabrao Patil news
Gulabrao Patil news esakal
जळगाव

Jalgaon News | खेडीभोकरी ते भोकरदरम्यान तापी नदीवर होणार पूल : पालकमंत्री गुलाबराव पाटील

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : चोपडा, जळगाव तालुकावासीयांना वरदान ठरणाऱ्या निम्न तापी पाडळसरे मध्यम प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या तापी नदीवरील खेडीभोकरी ते भोकरदरम्यानच्या तापी नदीवरील मोठ्या उंच ऐतिहासिक पुलाचे १३ फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.

त्यांच्यासोबत ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदयजी सामंत, बंदरे व खणिकर्म विभागाचे मंत्री दादा भुसे यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार उपस्थित राहणार असून, त्यासाठीची पूर्वतयारी सुरू झाल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. (Guardian Minister Patil Say Bridge will be constructed on Tapi River between Khedibhokari and Bhokar Jalgaon News)

शनिवारी (ता. ४) भोकर नदी परिसरात मंत्री पाटील, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे व निम्न तापी पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्या वेळी ते बोलत होते.

यासाठी राज्य शासनाने तब्बल १५० कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली असून, यामुळे हजारो नागरिकांचा व शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणातील फेरा वाचणार आहे. मंत्री पाटील यांनी चोपडा मतदारसंघाच्या आमदार लता सोनवणे, माजी आमदार सोनवणे यांच्या सोबत सातत्याने पाठपुरावा सुरू केला.

यात सार्वजनिक बांधकाम व जलसंपदा या दोन्ही खात्यांनी प्रत्येकी ५० टक्के वाटा उचलावा, असा निर्णय झालेला आहे. गव्हर्न्मेंट कंत्राटदार यांना १३ जुलै २२ ला वर्क ऑर्डर प्रदान करण्यात आली आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

...असा असेल पूल

तापी नदीवरील खेडी-भोकरी ते भोकदरम्यानचा पूल हा तब्बल ६६० मीटर लांब आहे. यात प्रत्येकी ३० मीटरचे २२ गाळे असणार आहेत. सदर पुलाच्या दोन्ही बाजूस सुमारे ६५० मीटर लांबीचे पोच रस्ते असतील. दोन्ही बाजूला भराव टिकवून ठेवण्याकरिता बॉक्स रिटर्न व पाइल फाउंडेशनसह रिटेनिंग वॉल असणार आहे. स्टील रेलिंग रोडसाइड फर्निचर व इतर आनुषंगिक बाबींचा यात समावेश आहे.

भोकर येथे नदी परिसरात मंत्री पाटील यांनी पाहणी केली. या वेळी बाळासाहेब सेनेचे जिल्हाप्रमुख नीलेश पाटील, निम्न तापी पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता वाय. के. भदाणे, कार्यकारी अभियंता एम. एस. चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी येळाई, उपअभियंता गिरीश सूर्यवंशी, डी. सी. पाटील, भोकर परिसरातील माजी सभापती भारत बोरसे, जानाअप्पा कोळी आदी उपस्थित होते.

मोठ्या पुलाच्या वचनपूर्तीचा मनस्वी आनंद

खेडीभोकरी ते भोकरदरम्यानचा पूल हा शेतकरी, प्रवासी आणि एकूणच या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या हजारो नागरिकांना व शेतकऱ्यांना सुविधा प्रदान करणारा ठरणार आहे. यातून आम्ही दिलेल्या एका वचनाची पूर्तता होणार असल्याचा मनस्वी आनंद आहे. सदर पुलाचे काम मार्गी लागत असल्याची बाब लक्षणीय अशीच आहे, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : आज कपिल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार

SCROLL FOR NEXT