Harassment of married for 5 lakhs Jalgaon Crime News  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : 5 लाखांसाठी विवाहितेचा छळ; गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : नोकरीसाठी माहेराहून पाच लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करून सात महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या १९ वर्षीय विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून मारहाण केल्याप्रकरणी विवाहितेचा पती, सासू, सासरे यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. (Harassment of married for 5 lakhs Jalgaon Crime News)

येथील केवडीपुरा भागातील रहिवासी दीक्षा शुभम सोनवणे हिचा विवाह १६ डिसेंबर २०२२ ला ठाणे येथील शुभम चंद्रकांत सोनवणे यांच्याशी झाला होता. विवाहानंतर दीक्षा सोनवणे सासरी गेल्यानंतर पतीसह सासरच्या लोकांनी केवळ दहा ते पंधरा दिवस चांगली वागणूक दिली.

त्यानंतर दीक्षाचे पती, सासू आणि दीर किरकोळ कारणावरून दीक्षाशी वाद घालून तिला शिवीगाळ करून मारहाण करू लागले. दीक्षाचे पती शुभम सोनवणे यांनी नोकरीवर कायम करण्यासाठी पाच लाख रुपये माहेराहून पैसे घेऊन ये, अशी मागणी करून तिला मारहाण करू लागले.

त्यानंतर २८ डिसेंबरला दीक्षाचे वडील प्रकाश शिंदे यांनी पैसे देण्यास असमर्थता दाखविल्याने २९ डिसेंबरला दीक्षाचे वडील निघून गेल्यानंतर सासू वर्षा चंद्रकांत सोनवणे, नणंद धनश्री यांनी तिला मारहाण केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तसेच पती शुभमने ३० जानेवारीला मारहाण करून तिचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न करून घराबाहेर हाकलून दिले.

त्यानंतर सासरच्या लोकांनी दीक्षाच्या वडिलांना फोन करून तिला घेऊन जाण्याचे सांगितले. दीक्षाच्या वडिलांनी तिला एरंडोल येथे आणले. ११ मार्चला वाढदिवसाचे निमित्त सांगून सासू वर्षा सोनवणे यांनी दीक्षाला ठाणे येथे बोलावून घेतले. मात्र चार ते पाच दिवसानंतर तिला मारहाण करून रात्रभर घराबाहेर काढले.

याबाबत दीक्षा सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती शुभम सोनवणे, सासू वर्षा सोनवणे, नणंद धनश्री रोषन खरे, मामेसासरे पावन एकनाथ पडवळ, दीर सुजल चंद्रकांत सोनवणे, आजलसासू पद्माबाई एकनाथ पडवळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejas Fighter Jet Crash: एअर शोमध्ये मोठा अपघात! भारताचे तेजस लढाऊ विमान कोसळले; थरारक व्हिडिओ व्हायरल

Masti 4 X Review: अडल्ट कॉमेडीचा ओव्हरडोस! कसा आहे आफताब- रितेश- विवेकचा 'मस्ती ४'? एक्सवर नेटकरी म्हणतात-

Latest Marathi News Live Update : कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपाला मोठा धक्का

BIBI-ka-Maqbara: जागोजागी पडझड, सौंदर्य काळवंडले! हेच आहे का वारसा संवर्धन? बीबी-का-मकबरा विचारतोय प्रश्न

Viral Video: बिबट्या ड्रेस घालून नेहा कक्करने अंगावर ओतलं पाणी, लाईव्ह कॉन्सर्टमध्ये केलं अस काही की, नेटकरी म्हणाले...'मोगली सेना'

SCROLL FOR NEXT