beating esakal
जळगाव

Crime News : दारु प्यायला पैसे दिले नाही म्हणुन मजुराला मारहाण

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील अयोध्या नगर येथे दारू पिण्याचे पैसे मागण्याच्या कारणावरून एका मजुराला काका व पुतण्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. (laborer was beaten up for not giving money for alcohol jalgaon crime)

याप्रकरणी सोमवार (ता.१) रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी परिसरातील हुनमान नगरात मोहन पांडुरंग अंबूरे (वय-45) हे हनुमान नगर येथे वास्तव्य आहेत. ते रविवार 30 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अयोध्या नगर भागातील पान टपरी समोर उभे होते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

याच ठिकाणी मोहन गायकवाड तसेच त्याचे काका असे दोघे काकापुतणे आले. मोहन अंबुरे यांनी मोहन गायकवाड यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले यावरून दोघांमध्ये वाद झाला.

यात मोहन गायकवाड याने शिवीगाळ करत मोहन अंबुरे यांच्या डोक्यात वीट मारली तर गायकवाड चा काका याने मोहन अंबुरे यांना पोटात तसेच पाठीत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

या घटनेत मोहन अंबुरे हे जखमी झाली असून त्यांनी सोमवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मोहन गायकवाड व त्याचा काका दोघे (रा.अयोध्या नगर)या देाघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा ट्विस्ट! काही महिलांना ४५०० तर काहींना फक्त १५००… तुम्ही कुठल्या यादीत?

Sharad Pawar : विलीनीकरणापेक्षाही संकटातून मार्ग काढणे महत्त्वाचे; सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री केल्याचा आनंद

कोट्यवधींचा टोल, पण सुरक्षा शून्य? टँकरचालकाचा निष्काळजीपणा अन् मुंबई-पुणे एक्सप्रेस वे 'जाम'; आपत्कालीन यंत्रणेची मोठी कसोटी

Solapur News: आयओसीएल पाकणी साइडिंगवर ३०१ रेक लोडिंगची ऐतिहासिक कामगिरी; साइडिंगचा उच्चांक, मालवाहतुकीतून ४४.२ कोटींची वाढ!

School Issue : राज्यातील ३ हजार ३२८ शाळा अंधारात; एक हजार १६४ शाळांमध्ये अजूनही मुलींसाठी स्वच्छतागृह नाही

SCROLL FOR NEXT