Smuggling of 8 kg of ganja from railway station jalgaon crime news
Smuggling of 8 kg of ganja from railway station jalgaon crime news  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : रेल्वेस्थानकातून 8 किलो गांजाची तस्करी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : जळगाव रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक आठ किलोहून अधिक गांजा बेवारस स्थितीत आढळला.

गुजरात आणि मध्यप्रदेशात गाड्या जाणाऱ्या या स्थानकावर सध्या बेवारस पद्धतीने सामान असल्याचे भासवून अमली पदार्थाची तस्करी वाढली आहे. (Smuggling of 8 kg of ganja from railway station jalgaon crime news)

जळगाव शहरात रेल्वे गाड्यातून अंमलीपदार्थांची मोठ्या प्रमाणावरून तस्करी वाढली असून नवीन वर्षाच्या सुरवातीला आज बेवारस बॅगामधून गांजा नेला जात असल्याचे प्रकरण रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आले.

सोमवारी १५ जानेवारीला रात्री रेल्वे सुरक्षा दलाचे सहाय्यक फौजदार विनोद साळवे, डी.एच. खैरनार असे रेल्वे स्थानकावर गस्त घालत असताना त्यांना फलाट दोनवर एक ट्रॉली बॅग, लाल व पिवळ्या रंगाची कापडी पिशवी बेवारस स्थितीत आढळली.

बॅग जवळ उभ्या प्रवाशांना विचारपूस करूनही या पिशव्यांवर कुणीच दावा करीत नसल्याचे लक्षात आल्यावर रेल्वे सुरक्षा दलाने बॅगा ताब्यात घेत फलाटावर तसेच स्थानकाच्या परिसरात मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

मात्र कुणीच पुढे येत नसल्याने बॅग व पिशव्यांची तपासणी केली असता त्यात काही तरी अमली पदार्थ असल्याचे लक्षात आले.

आरपीएफ निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील यांनी नायब तहसीलदार दिलीप बारी, वैध मापन विभागाचे उपनियंत्रक बी.जी. जाधव, निरीक्षक चंद्रशेखर पालीवाल यांना कळवून त्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला असता.

बॅग व पिशव्यांत सुमारे गांजाचे ८१ हजार ७२० रुपये किमतींचा आठ किलोहून अधिक वजनाचे सहा पाकीट आढळून आले. या प्रकरणी अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरपीएफचे मंडळ सुरक्षा आयुक्त एच. श्रीनिवास राव व निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक राजेंद्र पाटील तपास करत आहेत.

अशी होते तस्करी

मध्यरेल्वेच्या प्रमुख स्थानकापैकी जळगाव रेल्वेस्थानक महत्त्वाचे स्थानक असून येथून मुंबई आणि गुजरात अशा दोन मार्गांसाठी दिवसातून शंभर दिडशे रेल्वे गाड्यांची ये-जा असते.

गुजरातहून येणाऱ्या रेल्वेतून एमडी व पावडर ड्रग्ज ची तर मध्यप्रदेशातून गुटखा,ओला-सुका गांजा मुंबई आणि गुजरातच्या दिशेने पाठवला जातो.

पूर्वी ठरावीक लोकच तस्करी करत पण आता मोठ्या प्रमाणावर कुठल्याही स्थानकावरून बोगीत माल टाकला जातो.पोलिसांच्या लक्षात आले नाही तर निविर्ध्नपणे तस्करी सुरु असते. अशा तक्रारी आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Results: नरेंद्र मोदी जवाहरलाल नेहरुंच्या विक्रमाची बरोबरी करणार? ठरणार दुसरे पंतप्रधान?

Jayant Patil : मतमोजणी प्रक्रियेत सावध राहा; जयंत पाटील यांचे कार्यकर्त्यांना पत्र; फेरफार होण्याची भीती

National Cheese Day 2024 : नाश्त्याला झटपट बनवा चवदार मसाला चीज मॅक्रोनी, वाचा 'ही' सोपी रेसिपी

Maharashtra Lok Sabha Election Results Live : मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात; पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली

India Lok Sabha Election Results Live : दिल्लीच्या भाजप कार्यालयात गोडधोड पदार्थांची रेलचेल

SCROLL FOR NEXT