जळगाव

Jalgaon Crime News : निकाह न केल्यास ॲसिड टाकण्याची मुलीला धमकी; पालकांमध्ये खळबळ

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : अल्पवयीन शाळकरी मुलीला निकाह करण्याची मागणी करणाऱ्या तरुणावर पहूर पोलिस ठाण्यात ‘पोस्को’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाने शाळकरी विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. (Threatening girl to throw acid if she says no to marriage jalgaon crime news)

याबाबत पीडितेने पहूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की गावातीलच संशयित हुसेन शहा नासीर शहा याने २८ सप्टेंबर २०२३ ला दुपारी एक ते १० ऑक्टोबर २०२३ ला सकाळी साडेदहाच्या दरम्यान वेळोवेळी पहूर पेठ येथील आठवडे बाजार परिसरात माझा पाठलाग करीत शिवीगाळ करून ‘तू माझ्याशी निकाह करशील का? तू बाजारात भेटत जा, तू जर नाही भेटली तर तुझ्या तोंडावर अॅसिड टाकेन, तू जर माझी नाही झालीस तर दुसऱ्याची होऊ देणार नाही,’ अशी धमकी दिली.

या प्रकरणी पीडिता अल्पवयीन शाळकरी मुलीच्या फिर्यादीवरून पहूर पोलिस ठाण्यात संशयित हुसेन शहा नासीर शहा (रा. पहूर पेठ, ता. जामनेर) याच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित मात्र अद्याप फरारी आहे. पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल गर्जे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shraddha Kapoor: अडीचशे कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात श्रद्धा कपूरचा भाऊ अडचणीत; 25 तारखेला हजर राहण्याचे आदेश

Talegaon Election : तळेगाव दाभाडेत नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत; १९ नगरसेवक बिनविरोध, उर्वरित ९ जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात!

Pune Crime : टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर आंदेकर टोळीतील आरोपींची धिंड

Pune News : महापालिकेतील उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या, अधिकारी धास्तावले

Daund Election : दौंड नगरपालिका निवडणूक तापली; नगराध्यक्षपदासाठी सहा महिला, तर सदस्यपदासाठी तब्बल ८६ उमेदवार रिंगणात!

SCROLL FOR NEXT