Varkhed Namdev Pagare passed away jalgaon news  esakal
जळगाव

Jalgaon News : 'ऐका हो ऐका शेतकरी राजाहो' आवाज लुप्त; दवंडीतून योजना पोचविणारे वरखेडेचे पगारे यांचे निधन

दीपक कच्छवा

Jalgaon News : 'ऐका हो ऐका शेतकरीराजाहो...'म्हणत गेली ५६ वर्षे गल्लोगल्ली फिरून दवंडी देणारा आवाज ७८ व्या वर्षी शुक्रवारी (ता.२५) लुप्त झाला. वरखेडे (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी तथा सार्वजनिक कामात नेहमी सहकार्य करणार नामदेव उखा पगारे यांच्या निधनामुळे त्यांच्या आता केवळ पंचक्रोशीत आठवणी उरल्या आहेत.

वरखेडे येथील नामदेव पगारे यांची घरची परिस्थिती जेमतेम, त्यात कुटुंबातील सदस्य आपला चरितार्थ चालविण्यासाठी ते या कामाबरोबरच बाहेरची कामे करत असत. (Varkhed Namdev Pagare passed away jalgaon news)

मंदिरात साफसफाई तसेच गावातील मुख्य प्रवेशद्वाराच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर सकाळी झाडू मारुन स्वच्छता करण्याचे देखील काम ते करत असत. त्यामुळे त्यांना त्या कामाचा मोबादला मिळेल, अशी देखील त्यांना अपेक्षा नव्हती.

ग्रामपंचायतीकडून विविध योजनांची माहिती असो, कुठल्याही अधिकाऱ्यांकडून या दिल्या जाणाऱ्या सूचना व दवंडी ग्रामस्थांपर्यंत पोचवणे हे त्यांचे काम होते. गेली ५६ वर्षे त्यांनी गावात गावातील चौकाचौकात व गल्लोगल्ली फिरून शासनाच्या योजनांसह मुख्यतः दवंडी देण्याचे काम प्रामुख्याने करत होते. यामुळे त्यांचा आवाज सर्वांच्याच परिचयाचा झाला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

वयोमानाने आणि आजारपणाने मात्र त्यांचे काम बऱ्यापैकी कमी झाले होते. पगारे हे गावातील विवाह सोहळा असो वा हळदीचा कार्यक्रम, तेथे आपले वाद्य घेऊन जायचे. त्याबदल्यात त्यांना वधू-वरांवर टाकलेल्या ओवाळणीचा मोबदला मिळत असे.

आता घाईघाईने मिळणारे वाद्य वाजविण्याला कुणीही मिळणार नाही. त्यामुळे त्यांची खंत आता गावकऱ्यांना भासणार आहे. मागच्या दोन महिन्यापूर्वी शेवटची दवंडी त्यांनी दिली. ते अनंतात विलीन झाले. त्यामुळे 'ऐका हो ऐका शेतकरीबंधूनो..’ हा आवाज कायमचाच शमला.

दवंडीचा आवाज दुर्मिळ

ग्रामीण भागातील अनेक प्रथा, रूढी व परंपरा काळाच्या ओघात लुप्त होत आहेत. त्यातील एक प्रथा म्हणजे दवंडी. आधुनिक युगात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे ही प्रथा बंद पडल्याने ग्रामीण भागात ‘ऐका हो ऐका’चा कानांवर पडणारा स्वर दुर्मिळ झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : उदय सामंतांनी घेतली शरद पवार यांची भेट...

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

अरे हा काय टाइमपास लावलाय... तेजश्री- सुबोधच्या नव्या मालिकेवर प्रेक्षक नाराज; म्हणतात- एकही भाग पॉझिटिव्ह...

Kolhapur Flyover Project : कोल्हापुरात दोन उड्डाणपूल होणार, सायबर चौक, संभाजीनगर चौकात उभारणी शक्य, अमल महाडिक यांची माहिती

SCROLL FOR NEXT