accident
accident esakal
जळगाव

Jalgaon Accident News : आयशर मोटरसायकलच्या अपघातात युवक ठार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : भरधाव वेगाने धावणाऱ्या आयशरने समोरून येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात २२ वर्षीय युवक जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. (Youth killed in Eicher motorcycle accident jalgaon news)

हा अपघात बुधवारी (ता. ३) सायंकाळी पाचच्या सुमारास म्हसावद रस्त्यावरील उमरदे गावाजवळील पुलाजवळ घडला.

खेडगाव तांडा (ता. एरंडोल) येथील भाईदास संतोष राठोड व संदीप खिमा जाधव हे मोटरसायकलने (क्रमांक- एम. एच.४१ बीजी ४५८४) काल (ता. ३) सायंकाळी पाचला एरंडोल येथून कपडे व अन्य वस्तूंची खरेदी करून खेडगाव तांडा येथे जात होते. उमरदे गावाजवळील पुलाजवळ त्यांच्या मोटरसायकलला म्हसावदकडून येणाऱ्या आयशरने (क्रमांक- डी. एन. ०९ एन ९८९०) जोरदार धडक दिली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ज्यात संतोष खिमा जाधव (वय २२) हा जागीच ठार झाला तर भाईदास संतोष राठोड हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर संदीप जाधव यांच्या मागे मोटरसायकलने येणारे मयत संदीप जाधव यांचे मामा सुनील राठोड व दिनेश पवार यांना अपघात झाल्याचे दिसले. अपघातानंतर उमरदे येथील ग्रामस्थांनी आयशर थांबवली.

सुनील राठोड व दिनेश पवार यांनी ग्रामस्थांच्या मदतीने दोघांनाही ग्रामीण रुग्णालयात आणले असता, संदीप राठोड हे मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. जखमी भाईदास राठोड यांच्यावर उपचार सुरु आहेत.

याबाबत सुनील राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून आयशरचालक महेंद्रसिंग प्रतापसिंग राजपूत (रा. दादरा नगर हवेली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेंद्र पाटील तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT