वैद्यकीय उपचार
वैद्यकीय उपचार 
कोकण

साथीच्या रोगांना अटकाव! महापुरानंतर आरोग्य यंत्रणेचे यश

राजेश कळंबटे

पुरानंतर सातत्याने बारा दिवस आषाढ सरी कोसळल्या.

रत्नागिरी: जिल्ह्यात अभूतपुर्व पाऊस हा चिपळूण सारख्या शहरात गेल्या शंभर वर्षात आला नव्हता, तितका पूर आला. राजापूर शहर व तालुक्यात अतिवृष्टी सुरु झाल्यापासून बारा दिवस पुराचे पाणी घुसत होते. संगमेश्‍वर व परिसरात २००५ च्या पुरापेक्षा अधिक पातळी पाण्याने गाठली. पुरानंतर सातत्याने बारा दिवस आषाढ सरी कोसळल्या.

पुराने आणलेला कचरा, चिखल, अशुध्द पाणी, शहरात साठलेले कचऱ्‍याचे ढिग यामुळे रोगराईला निमंत्रण ठरलेले होते. कोविडचा धोका डोक्यावर आहेच. अशा आव्हानात्मक परिस्थितीत आरोग्य यंत्रणेने सुक्ष्म पातळीवर छोट्या, छोट्या गोष्टींचे नियोजन करुन केलेल्या कामामुळे साथीच्या रोगांना अटकाव करण्यास यश मिळवले आहे. कोविडच्या महामारीत ढिसाळ कारभार आणि अपुऱ्‍या सुविधा यामुळे सतत टीका झालेल्या आरोग्य विभागाने महापूर व त्यानंतरची कामगिरी दखल घेण्याजोगी ठरली आहे.

महापुरानंतर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने जिल्हा, तालुका आणि प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर चोवीस तास साथरोग व पूरनियंत्रण कक्ष कार्यरत केले आहेत. जिल्ह्यात ४७ गावांमध्ये आरोग्य कर्मचारी यांची वैद्यकीय ६१ उपचार पथके सुसज्ज रुग्णवाहिका, पुरेशा औषध साठयांसह सज्ज ठेवला. खेडमधील विस्थापित १०८ कुटुंबे व ५७८ ग्रामस्थ आणि चिपळूण तालुक्यातील १६ कुटुंबे आणि ७४ ग्रामस्थ विस्थापित झाली होती. त्याठिकाणी आरोग्य पथकाव्दारे आवश्यक त्या आरोग्य सुविधा पुरविण्यात आल्या.

वैद्यकीय पथकांचे नियोजन

वीस वैद्यकीय पथके चिपळूण शहरात, १४ ग्रामीण भागात आणि ४ फिरते आरोग्य पथके आपत्ती निवारणाच्या अनुषंगाने सर्व त्या आरोग्य सेवा पुरविण्याच्या कामी कार्यरत आहेत. ४ आरबीएसके पथकातील ७ डॉक्टर्स, ४ एएनएम व ४ औषध निर्माण अधिकारी वाहनासह तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे देण्यात आली. खेड शहरात ५ पथके व ग्रामीण भागात ३ पथके, संगमेश्वरात १३, रत्नागिरीत ६, लांजा १ व राजापूरमध्ये ९ आरोग्य पथके आपत्ती निवारणाच्या अनुषंगाने सर्व त्या आरोग्य सेवा पूरविण्यासाठी अजुनही कार्यरत आहेत. कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील २ डॉक्टर्स व नर्स असलेले पथक एका वाहनासह खेड शहरात पूर पश्चात साथरोग सर्वेक्षणासाठी कार्यरत आहे.

घरोघरी सर्वेक्षणाचा कृती आराखडा

नऊ रुग्णवाहिका चिपळूण येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठविण्यात आल्या. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून पूरेसा औषध साठा देण्यात आला. आरोग्य पथकांमध्ये पुरेसा औषधसाठा, मेडिक्लोर, सर्पदंश लस, ओआरएस उपलब्ध आहे. अतिरिक्त औषधांची मागणी गरजेनुसार करण्यात आली. पूर ओसरल्यानंतर प्रत्येक गावात आरोग्य सेवक व आरोग्य सेविका यांचेमार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्याचा कृती आराखडा तयार करुन तो प्रत्यक्षात आणला. यामध्ये २९ हजाराहून अधिक घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. पिण्याच्या पाण्याचे पर्यायी स्त्रोतांचे (विहिर, बोअरवेल) शुध्दीकरण करण्यात येत आहे.

जलजन्य आजाराच्या अनुषंगाने सर्व्हेक्षण

किटकजन्य, जलजन्य आजाराच्या अनुषंगाने सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना तत्काळ देण्यात आल्या होत्या. जिल्हा रुग्णालय, सर्व उपजिल्हा, कामथे ग्रामीण रुग्णालय व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे येथे साथरोग प्रतिबंधक किट अद्ययावत ठेवण्यात आली. खेर्डी, वालोपे, पेढे, मिरजोळी (चिपळूण) व पोसरे बौध्दवाडी (खेड) येथे वैद्यकीय पथकांमार्फत पाणी नमुना घेणे, पिण्याच्या पाण्याची ओ. टी. टेस्ट घेणे, कंटेनर सर्वे व डास प्रतिबंधक फवारणी इत्यादी कामे करण्यात येत आहेत.

आरोग्य यंत्रणेचे लाखोंचे नुकसान

जिल्हयातील ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी प्राथमिक आरोग्य केंद्र दादर व प्राथमिक आरोग्य केंद्र अडरे येथील मालमत्तेचे प्रत्येकी ५ लाखाचे नुकसान झाले. दळवटणे उपकेंद्रात ५ लाख, खेर्डी उपकेंद्रातील २ लाख मालमत्तेचे नुकसान झाले. नागरी आरोग्य केंद्र चिपळूण येथील मुख्य इमारतीमधील अंदाजे ७ लाख रुपयांचे नुकसान झाले. जिल्हा रुग्णालय, सर्व उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालये यांना पूराचा फटका बसलेला नसून सर्व संस्था सुस्थितीत असून तेथे नियमित आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहेत. उपजिल्हा रुग्णालयातील कार्यालयातील महत्वाचे दस्तऐवज पाण्याखाली बुडाले असून, पंचनामा करण्यासाठी तहसीलदार यांना पत्र देण्यात आले आहे.

४ हजार ४२० घरांत औषध फवारणी

पूर परिस्थिती ओसरल्यानंतर योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याने उद्रेकजन्य स्थिती चिपळूण, खेड परिसरात उद्भवली नाही. पुरामुळे साचलेल्या चिखलात फिरल्याने लेप्टो, विहिरींच्या अशुध्द पाण्यामुळे गॅस्ट्रो, कॉलरा, हगवणसारख्या तर साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू, मलेरियासारख्या रोगांच्या साथींचा प्रादुर्भाव होत असतो. मात्र, काही ठिकाणी तापाचे किरकोळ रुग्ण आढळले. त्यांच्यावर तत्काळ उपचारही करण्यात आले. ४ हजार ४२० घरांमध्ये औषध फवारणी करण्यात आली. त्यामध्ये १९ हजार ८१९ ग्रामस्थांचे वास्तव्य होते.

पूर ओसरल्यानंतर आरोग्य यंत्रणा युध्दपातळीवर कामाला लागली. एकीकडे कचरा सफाईची मोहीम राबविली जात असताना नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य यंत्रणा ऑनफिल्ड राबत होती.

- उदय बने, उपाध्यक्ष, आरोग्य सभापती, जिल्हा परिषद

एक नजर...

- कर्मचाऱ्याना मुख्यालयी राहणे अनिवार्य

- गरोदर मातांच्या सुरक्षिततेवर लक्ष

- कोविड बाधितांना औषधांचा पुरवठा

- कामथे उपजिल्हा रुग्णालयात अधिक बेड

- शवविच्छेदनाची व्यवस्था

एक दृष्टीक्षेप..

- २९ हजारांहून अधिक घरांचे सर्व्हेक्षण

- पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे शुध्दीकरण

- वीस वैद्यकिय पथके चिपळूण शहरात

- साथरोग प्रतिबंधक किट अद्ययावत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT