Digilocker
Digilocker  Sakal
लाइफस्टाइल

Pension Certificate : ज्येष्ठांना दिलासा! डिजीलॉकरवर मिळणार पेन्शन सर्टिफिकेट

सकाळ डिजिटल टीम

Pension Certificate On Digilocker : सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण ज्येष्ठ नागरिकांना आता पेन्शन (Pension Certificate) प्रमाणपत्रासाठी बँकांकडे किंवा कार्यालयांमध्ये चकरा माराव्या लागणार नसून, आता पेन्शन प्रमाणपत्र ज्येष्ठांना त्यांच्या मोबाईल फोनमध्येच मिळणार आहे, तेही डिजीलॉकरमध्ये (Digilocker) . यासाठी तुम्हाला मोबाईल फोनमध्ये डिजिलॉकर सक्रिय करावे लागेल.

डिजिलॉकर हे क्लाउड आधारित प्लॅटफॉर्म असून, येथे तुम्ही तुमची सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रं शेअर करू शकता, स्टोअर करू शकता आणि व्हेरिफाय करू शकता. दिवसेंदिवस डिजिटलायझेशनची वाढती मागणी लक्षात घेऊन सरकारने या कामासाठी डिजिलॉकर परिपूर्ण बनवले आहे. डिजीलॉकरमुळे तुम्हाला तुमच्यासोबत कागदपत्रांची (Document) फाइल घेऊन जाण्याची गरज नाहीये.

डिजीलॉकरवरील सुविधा कोणत्या

काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) लाँच केलेल्या या सुविधेमध्ये रेशन कार्ड, आधार, लायसेंन्स, गुणपत्रिका इत्यादी सेव्ह करता येतात. डिजीलॉकर अॅप मोबाईलमध्येही डाउनलोड करता येते. वरील सुविधांनंतर आता या अॅपच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन प्रमाणपत्र मिळवता येणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने डिजीलॉकरवर पेन्शन प्रमाणपत्र जारी करणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.

असे मिळवा डिजीलॉकर वरून पेन्शन प्रमाणपत्र

  • डिजीलॉकरवर पेन्शन पमाणपत्र मिळवण्यासाठी प्रथम तुम्हाला डिजिलॉकर वेबवरील तुमच्या खात्यात लॉग इन करावे लागेल किंवा तुमच्या स्मार्टफोनवर डिजिलॉकर अॅप उघडावे लागेल.

  • यानंतर साइन-इन करण्यासाठी येथे तुम्हाला 6 अंकी सुरक्षा पिनसह तुमचा आधार क्रमांक किंवा नोंदणीकृत फोन नंबर विचारला जाईल. हे टाकल्यानंतर डिजिलॉकरमध्ये लॉगइन करण्यासाठी तुम्हाला एक OTP मिळेल.

  • ओटीपी टाकून तुम्ही यशस्वीरीत्या लॉग इन केल्यानंतर येथे तुम्ही पेन्शन प्रमाणपत्र पाहु शकाल. याशिवाय तुम्ही वेबसाइटच्या डाव्या बाजूला असलेल्या मेनूमध्ये शोध दस्तऐवजमध्येदेखील हे पमाणपत्र शोधू शकता. यासाठी तुम्हाला पेन्शन दस्तऐवज असे लिहावे लागले. असे केल्यानंतर तुम्हाला अनेक पर्याय समोर दिसतील त्यातील बँक ऑफ महाराष्ट्र हा पर्याय निवडावा.

  • वरील सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला एक छोटा फॉर्म दिसेल ज्यामध्ये तुम्हाला पेन्शनधारकाची जन्मतारीख आणि पीपीओ क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर पीपीओ क्रमांकाच्या खाली असलेल्या चेकमार्कवर टॅप करा येथे डिजिलॉकरची निवड करून पेन्शन प्रमाणपत्र मिळविण्यासाठी Get Document वर क्लिक करावे.

डिजीलॉकर व्हॉट्सअॅपवरही उपलब्ध

डिजीलॉकर (Digilocker) सुविधा तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपवरदेखील मिळवू शकता यासाठी तुम्हाला फक्त एक मेसेज पाठवायचा आहे. तुम्हाला MyGov च्या WhatsApp नंबर 9013151515 वर HI लिहून मेसेज करावा लागेल. यानंतर तुम्हाला काही सूचना सांगितल्या जातील. ज्यांचे पालन करून तुम्ही डिजिलॉकरवर तुमचे अनेक डॉक्युमेंट पाहू किंवा डाउनलोड करू शकता. व्हॉट्सअॅपवर मेसेज लिहूनच तुम्हाला अशी कागदपत्रे मिळू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: मोदीजी हिंमत असेल तर संपवण्याचा प्रयत्न करुन बघा...; उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान

PM Modi In Mumbai: राहुल गांधींना फक्त एक गोष्ट करायला सांगा; पंतप्रधान मोदींचे शरद पवारांना आव्हान

Raj Thackeray: मराठीला अभिजात दर्जा, मराठ्यांचा इतिहास अन् मुंबई-गोवा महामार्ग...; राज ठाकरेंनी मोदींकडं व्यक्त केल्या ७ अपेक्षा

RCB vs CSK : खेळ आरसीबी, सीएसके अन् पावसाचा; प्ले ऑफचा चौथा संघ ठरवणारा सामना

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर

SCROLL FOR NEXT