Hair Care esakal
लाइफस्टाइल

Hair Care : केसांची दुर्गंधी या उपायांनी घालवा

केसांमध्ये घाम येण्याची समस्या बऱ्यापैकी कॉमन आहे. अत्याधिक घाम येणे हीदेखिल धोक्याची घंटा आहे. यामुळे केसांतून दूर्गंध येतो. यासाठी हे काही घरगुती उपाय करून बघा.

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येकाला सुंदर केस हवे असतात. केसांमुळे व्यक्तीमत्व उठावदार दिसते. चांगल्या केसांसाठी आपण केसांची काळजी घेतच असतो तरीही केसांतून दुर्गंध यातो. याचे कारण स्काल्पवर तेल राहणे व बॅक्टेरीयामुळे असते. याशिवाय केस नीट न धुणे, घाम, हार्मोनल चेंज, प्रदुषण ही कारणेपण असू शकतात.

तुमच्या रोजच्या हेअर केअर बरोबरच हे घरगुती उपाय करून बघा. यामुळे केसांत शाईनच्या बरोबर केसांत नवा तजेला जाणवतो. या उपयांमुळे उन्हाळ्यात केसांतून येणारा दुर्गंध पुर्णपणे जातो.

टी ट्री ऑईल

जर तुम्ही केसांना मजबूत, कोंडामुक्त करणाऱ्या तेलाच्या शोधात असाल टी ट्री ऑईल चांगला पर्याय आहे.

कसे वापरावे

६ थेंब टी ट्री ऑईल व २ मोठे चमचे बदाम तेल घ्यावे. नीट मिक्स करावे.

हे मिश्रण स्काल्पला व केसांवर लावावे.

हलक्या हाताने मसाज करावा व ३० मिनीटांनंतर शॅम्पूने धूवावे.

लिंबाचा रस

जर तुमच्या डोक्यात कोंड्यामुळे दुर्गंध येत असेल तर लिंबाचा रस चांगला पर्याय आहे. यामुळे स्काल्प वरील दुर्गंध निर्माण करणारे बॅक्टेरीयाला मारण्यास मदत करतात.

कसे लावावे

२ लहान चमचे लिंबाचा रस व २ कप गरम पाणी घ्यावे, दोन्ही व्यवस्थित मिक्स करावे.

नंतर केस माइल्ड क्लिंझरने धुवावे.

यानंतर लिंबाचा रस लावावा व पाण्याने धुवावे.

ॲपल साइडर व्हीनेगर

ॲपल साइडर व्हीनेगर कोंडा व स्काल्पच्या दुर्गंधी घालवण्यासाठी चांगला पर्यार आहे.

कसे लावावे

अर्धा कप ॲपल साइडर व्हीनेगर व २ कप पाणी घ्यावे. नीट मिक्स करावे.

आधी केस माइल्ड क्लींझरने धूवावे.

यानंतर हे मिश्रण आपल्या केसांवर लावून थोड्यावेळ ठेवावे. नंतर केसांना साध्या पाण्याने धूवावे.

टोमॅटोचा रस

जर तुमच्या स्काल्पवर बॅक्टेरीया होत असतील तर त्यावर टोमॅटो एक चेंगला उपाय आहे. टोमॅटोमध्ये अँटीबॅक्टेरीयल गुण फार असतात. त्यामुळे स्काल्पवरील बॅक्टेरीया मारण्यास मदत होते.

कसे लावावे

१ मध्यम आकाराचा टोमॅटो घ्यावा.

त्याचा गर काढून केसांवर लावावा.

३० मिनीट ठेवावे मग साध्या पाण्याने धूवावे.

कांद्याचा रस

कांद्याचा रस केसांना मजबूत बनवण्याबरोबर केसांना दाट बनवतात. यात सल्फरचे प्रमाण अधिक असल्याने स्कल्पमधून येणारी दुर्गंधी जाते.

कसे लावावे

३ लहान चमचे कांद्याचा रस व २ लहान चमचे लिंबूचा रस घ्या. हे मिश्रण ३० मिनीट लावून ठेवावे मग साध्या पाण्याने धूवावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT