Valentines Day  esakal
लाइफस्टाइल

लग्नानंतरचा पहिला Valentine's Day आहे? असा बनवा Special

लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याचा आनंद वेगळाच असतो.

सकाळ वृत्तसेवा

लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याचा आनंद वेगळाच असतो.

प्रेम व्यक्त करणाऱ्यासाठी फेब्रुवारी महिना खूप खास असतो. दरवर्षी 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे (Valentines Day) म्हणून साजरा केला जातो. प्रेम करणाऱ्यांसाठी व्हॅलेंटाइन डे खास असतो. सध्या लग्नाआधीही व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याचा ट्रेंड आहे, पण लग्नानंतरही पती-पत्नीला हा दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करायला आवडतो. लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाइन डे (First Valentine Day) साजरा करण्याचा आनंद वेगळाच असतो. लग्न झालेल्या कपल्ससाठी ही पहिलीच वेळ असते, जेव्हा ते पती-पत्नी म्हणून नव्हे तर प्रेम करणारे कपल्सप्रमाणे एकमेकांवर प्रेम व्यक्त करतात.

तुमचा पहिला व्हॅलेंटाईन डे संस्मरणीय (Memorable) व्हावा, असे प्रत्येकाला वाटते, यासाठी तुम्ही काही आयडियाज (Ideas) वापरु शकता. जर तुम्ही लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाइन डे साजरा करणार असाल तर काही टिप्स वापरुन तुम्ही तुमच्या पार्टनरला (Partner) खुश करू शकता. चला जाणून घेऊया त्या कोणत्या आहेत.

हटके गिफ्ट्स देऊन सरप्राइज द्या:

जर तुम्ही लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाइन डे साजरा करणार असाल तर हा दिवस तुमच्या जोडीदारासाठी खास बनवा. यासाठी तुम्ही तुमच्या पार्टनरला सरप्राईज (Surprise) देऊन दिवसाची सुरुवात करू शकता. हटके गिफ्ट्स (Gifts) देऊन तुम्ही तुमच्या पार्टनरला सरप्राईज करू शकता. तुम्हाला हवे असल्यास, जोडीदार उठण्यापूर्वी जोडीदाराच्या उशीजवळ एक सुंदर भेटवस्तू ठेवा. जेव्हा तुमचा जोडीदार झोपेतून उठतो आणि त्याच्या जवळील भेटवस्तू पाहतो तेव्हा खूप आनंद होऊ शकतो. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू असेल.

गुलाब द्या:

व्हॅलेंटाईन डे हा गुलाब (Rose) शिवाय अपूर्ण आहे. खरे तर लाल गुलाब हे प्रेमाचे प्रतीक आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या जोडीदाराला लाल गुलाब देऊन खुश करू शकता. लग्नानंतरच्या पहिल्या व्हॅलेंटाइन डेला तुम्ही तुमच्या जोडीदाराला काही वेगळ्या प्रकारे गुलाब देऊ शकता. जेव्हा तुमचा जोडीदार ऑफिसमध्ये असतो किंवा घरातील कामात व्यस्त असतो. तेव्हा त्यांना कुरियरने गुलाब पाठवा. जर त्यांना इतर कोणतेही फूल आवडत असेल तर त्यांचे आवडते फूल पाठवा आणि प्रेमाचा एक मेसेज लिहा. तुमच्या जोडीदाराला हे पाहून आश्चर्य वाटेल आणि तो आनंदीही होईल.

असे करा प्रेम व्यक्त:

प्रेम व्यक्त केलं नाही तर व्हॅलेंटाइन डे अपूर्ण आहे. अशा परिस्थितीत या खास दिवशी तुमच्या पार्टनरला खास वाटण्यासोबतच तुमच्या मनातील भावना व्यक्त करा. यासाठी तुम्ही वेगवेगळ्या ट्रिक्स वापरु शकता. आजकाल बहुतेक लोक सोशल मीडियावर (Social media) फ्रेंडली असतात. जर तुमचा पार्टनर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असेल तर याद्वारे त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करा. तुम्ही इंस्टाग्राम यूजर असल्यास, तुम्ही तुमच्या जोडीदाराचे नाव जोडून तुमचे नाव ठेवू शकता किंवा तुम्ही व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर डीपी आणि स्टेटस अपडेट करू शकता. चांगले स्टेटस टाकून तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त करू शकता.

डिनर डेटची प्लॅनिंग करा:

अजूनही जगभरात कोरोना (Corona) सुरु आहे. रोज नवनवीन व्हेरिएंट तयार होत आहेत. अशा परिस्थितीत घराबाहेर पडणे सुरक्षित नाही. जर तुम्ही घरी व्हॅलेंटाईन डे साजरा करत असाल तर रोमँटिक कॅन्डल लाईट डिनरचे प्लॅनिंग करता येईल. तुम्ही बाहेर जात नसाल तरीही, घरी चांगली तयारी करा आणि एकत्र डिनर डेटचा आनंद घ्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या डिनर डेटला बाहेरून जेवण मागवू शकता किंवा कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने जोडीदाराच्या आवडीचे पदार्थ बनवून त्याला खूश करु शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT