Weight Loss Tips
Weight Loss Tips  Esakal
लाइफस्टाइल

Weight Loss Tips : पोटाच्या ढेरीकडे बघून वजन कमी नाही होणार; पहा काय आणि किती खावं?

सकाळ डिजिटल टीम

बरेच लोक वजन कमी करण्यासाठी हे ड्रिंक घ्या. त्याचे सेवन करा, असा सल्ला देतात. मात्र, वाढत असलेलं वजन आधी स्थीर ठेवलं पाहिजे. त्यासाठी तूम्ही वजन कमी करण्यासाठी काय खाणे बंद केले पाहिजे, याबद्दल फारशी माहिती कोणी देत नाही.

वाढलेल्या वजनाने अनेकजण चिंतेत आहेत. पण स्वतःवर काही बंधन घालून खाण्यापिण्याच्या योग्य सवयींचं पालन केल तर, तुमचं वजन न वाढता तुम्ही नक्कीच फिट राहाल. तसेच, मोठमोठे, अवघड असे डायट प्लॅन घेऊन ते फॉलो न करण्यापेक्षा रोजच्या आहारात काही बदल करून वजन कमी करणे सोपे आहे.

गोड खाणे बंद करा

वजन वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे, गोड पदार्थाचे सेवन. गोड खात नाही, आवडत नाही असे म्हणत सर्वच लोक गोड खात असतात. त्यामूळे आधी ते बंद करा.

पांढरे पदार्थ खाऊ नका

मैदा, साखर, मीठ, भात यासारख्या पांढऱ्या रंगाच्या गोष्टींचे सेवन बंद करा.

कोणत्या गोष्टींचा अतिरेक टाळावा

तेल, तूप, बटर, मिठाई, चॉकलेट, चिप्स, जंक फूड, पोळी, बटाटा यांसारख्या वस्तू पूर्णपणे टाळू नका, पण अति खाऊ नका.

थंड पाणी नकोच

थंड पाणी पिणं कटाक्षानं टाळा. थंड पाणी प्यायची इच्छा झाल्यास माठातील पाणी प्या. कोमट पाणी प्यायल्यास वजन लवकर कमी व्हायला मदत होते आणि पचनक्रिया देखील सुरळीत पार पडते.

कसा असावा दिवसाचा डायट

नाश्ता - ९ ते १०च्या दरम्यान

दोन पोळ्या किंवा ब्राऊन ब्रेडचे तीन स्लाइज, एक वाटी डाळ किंवा पालेभाजी, एक प्लेट सलाड साय काढलेलं दूध या पर्यायांपैकी एखादा निवडू शकता. 

दुपारचे जेवण – १ ते २ दरम्यान

दुपारी जेवताना एक-दोन पोळ्या किंवा एक ते दोन वाटी भात खाऊ शकता. एक वाटी आमटी किंवा डाळ (पाण्याचं प्रमाण जास्त असलेली), पालेभाजी (एक वाटी) आणि सलाड (१५० ते २०० ग्रॅम) याचाही दुपारच्या आहारात समावेश करू शकता.

सायंकाळी काय खावे - ५ वाजता

कमी साखरेचा चहा किंवा कॉफी घेऊ शकता. त्यासोबत भाजलेले चणे, शेंगदाणे किंवा मखाणे खाऊ शकता.

रात्रीचे जेवण- ७ ते ८ च्या दरम्यान

वजन कमी करण्यात खूप महत्वाची भूमिका असते ती रात्रीच्या जेवनाची. रात्री हलका आहार घ्या आणि शक्यतो लवकर जेवा. ७ ते ८ च्या दरम्यान जेवलात तरी चांगला फरक पडतो.e

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : अमित शाहांचा डिपफेक व्हिडिओ शेअर केल्यानं काँग्रेसच्या ट्विटर हँडलविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT