tararani
tararani sakal
महाराष्ट्र

फक्त संभाजीराजेच नाही तर अख्ख्या करवीर संस्थानचा इतिहास स्वाभिमानाचा

सकाळ डिजिटल टीम

सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. शिवसेनेनं दिलेला प्रस्ताव नाकारल्यांनंतर राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चर्चा होती. भाजप आणि महाविकास आघाडीने त्यांना पाठिंबा न दिल्यामुळे संभाजीराजे चांगलेच अडचणीत आलेत. 

नुकताच त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होतानाचा एक फोटो पोस्ट केला आणि जनतेला पाठिंबा देण्याचे आव्हान केले. संभाजीराजे राजे यांनी लिहिलं कि, 'महाराज... तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय. मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी, मी बांधील असेन तो फक्त जनतेशी...'   

इतकंच नाही तर काल २५ मे रोजी त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर एक पोस्ट सुद्धा व्हायरल केली होती. ज्यात म्हंटल होत कि, 'आता राज्यसभा नव्हे तर संपूर्ण राज्यच घेणार'. ही पोस्ट म्हणजे शिवसेनेला इशारा असल्याचं म्हंटल जातंय. संभाजीराजे छत्रपतींनी करवीर संस्थानच्या स्वाभिमानाचा वारसाच पुढं नेलं असल्याचं त्यांच्या समर्थकांनी म्हटलंय.

काय आहे करवीर संस्थानच्या स्वाभिमानाचा इतिहास? छत्रपतींच्या कोल्हापूरच्या गादीची सुरवात होते महाराणी ताराबाईंच्या पासून.

कोण आहे या ताराबाई? ताराबाई या मराठ्या्ंच्या इतिहासातील एक शुरवीर नाव आहे. ज्यांनी आपल्या स्वाभिमानाच्या जोरावर इतिहास घडविला आणि करवीर गादीची स्थापना केली.

१६८३–८४ च्या सुमारास त्यांचे राजारामा यांशी लग्न झाले. मोगलांचा रायगडास वेढा पडला असता, जिंजीला जाण्यासाठी ५ एप्रिल १६८९ रोजी ताराबाईंनी राजारामासोबत रायगड किल्ला सोडला. राजाराम जिंजीला गेल्यानंतर ताराबाई व त्यांच्या इतर सवती रामचंद्र नीलकंठांच्या योजनेप्रमाणे मोगलांचा पाठलाग चुकवीत विशाळगड व इतर गडांवर काही वर्षे राहिल्या. या दरम्यान ताराबाईंना मुलकी व लष्करी व्यवहाराची माहिती झाली. ताराबाई १६९४ मध्ये जिंजीला पोहोचल्या.

राजाराम जिंजीहून निसटल्यानंतर ताराबाई आणि त्यांचे नातेवाईक जुल्फिकारखानाच्या तावडीत सापडले. त्यांना जुल्फिकारखानाने मोगली सैन्यातील शिर्के व मोहिते या सरदारांच्या स्वाधीन केले. त्यांनी ताराबाई व त्यांच्या नातेवाईकांना महाराष्ट्रात सुखरूप पोहोचविले. २ मार्च १७०० रोजी राजाराम मृत्यू पावला. त्यानंतर ताराबाई यांची राजकीय कारकीर्दीस सुरुवात झाली.

शाहू मोगलांच्या कैदेत असताना ताराबाईंनी गादीची जबादारी स्वीकारली. आपला मुलगा शिवाजींची मुंज करून विशाळगड येथे त्यांनी राज्याभिषेक करविला. त्यानंतर त्या आपल्या मुलाच्या नावाने राज्यकारभार पाहू लागल्या. सैन्याधिकारी नेमून त्त्यांनी नंतर औरंगजेबाशी उघड सामना सुरू केला.

१७०५ मध्ये मराठ्यांनी पन्हाळा मोगलांकडून जिंकून घेतल्यानंतर त्यांनी पन्हाळा ही राजधानी केली. गडागडांवर जाऊन त्या जातीने पाहणी करी. १७००–०७ पर्यंत मोगलांनी घेतलेले बहुतेक गड ताराबाईंच्या सैन्याने परत मिळविले.

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू मोगलांच्या कैदेतून सुटून स्वराज्यात परत आले त्यानंतर शाहू सुटल्यापासून ताराबाई व शाहू यांच्यात वारसाहक्कासाठी कलह सुरू झाला. ताराबाई व शाहू यांत १२ ऑक्टोबर १७०७ रोजी खेड–कडूस येथे लढाई झाली. ताराबाईंच्या ताब्यात असलेले गड शाहूने घेतले.

पेशव्यांच्या मध्यस्थीने ताराबाई व शाहू यांची भेट झाली. तेव्हा शाहूने त्यांना मानाने वागविले. त्या पुढे साताऱ्यास रहावयास गेली. १७४९ पर्यंत त्यांचे आणि शाहूचे संबंध चांगले राहिले. आपला नातू रामराजा यास दत्तक घ्यावे, म्हणून त्यांनी शाहूचे मन वळविले. शाहूंच्या मृत्यूनंतर रामराज महाराजांना सातारच्या गादीवर बसविले. दमाजी गायकवाड आणि नासिरजंग निजाम यांच्या साह्याने त्यांनी साताऱ्याचा कारभार आपल्या हाती घेऊन पेशव्यांशी सामना सुरू केला. अखेर १७६१ मध्ये तारबाई मरण पावल्या

ताराबाई हुशार व राजकारणी होत्या. त्यांचे खरे कर्तृत्व १७००–०७ या निर्णायकी काळात दृष्टीस पडले. त्यांनी निजामासारख्या मराठ्यांच्या शत्रूसही जवळ करण्यास कमी केले नाही. त्यांनी कोल्हापूरची वेगळी गादी निर्माण केली. शाहू महाराज स्वराज्यात येण्यापूर्वी त्यांनी कर्तबगारीने मराठ्यांचे नेतृत्व केले आणि मोगलांशी टक्कर दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, आम्हालाही तसाच नेता हवा.. पाकिस्तानी अब्जाधीशाने उधळली स्तुतीसुमनं

IPL 2024 : पावसामुळे 18 मे होणारा RCB Vs CSK सामना रद्द झाला तर… प्लेऑफसाठी कोण ठरणार पात्र?

Car Care: कडक उन्हात कार आतील बाजूस थंड ठेवण्यासाठी आजच करा 'या' 5 गोष्टी

Shirur Lok Sabha : मतांचा टक्का घसरल्यामुळे भल्याभल्यांचे अंदाज चुकणार... शिरूरमध्ये घड्याळ चालणार की तुतारी वाजणार?

Cannes Film Festival 2024 : कान्स फिल्म फेस्टिव्हलला मेरील स्ट्रीप यांचा सन्मान ; आईला केला पुरस्कार समर्पित

SCROLL FOR NEXT