rajesh tope Esakal
महाराष्ट्र बातम्या

मुलांच्या लसीकरणानंतर टोपेंची आता केंद्राकडे 'ही' महत्त्वाची मागणी

कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येत प्रत्येकाने काळजी घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

निनाद कुलकर्णी

जालना - कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा (Corona New Variant) जगभरासह भारतातदेखील झपाट्याने प्रसार होत आहे. त्यामुळे देशाच्या चिंतेत भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर देशात आजपासून (3 जानेवारी) 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या (Children Vaccination Starts In India) लसीकरणाला सुरूवात झाली आहे. दरम्यान, 15 ते 18 वर्षे मुलांच्या लसीकरणाच्या परवानगीनंतर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Maharashtra Health Minister Rajesh Tope) यांनी केंद्राकडे आता 12 ते 15 वय असणाऱ्या मुलांचे लसीकरण करण्याची मागणी केली आहे. राजेश टेपे यांच्या उपस्थितीत आज जालन्यात लहान मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. (Rajesh Tope New Demand To Central Government)

टोपे म्हणाले की, मुलांच्या लसीकरणासाठी (Bharat Biotech) भारत बायटेकची कोव्हॅक्सिन लसीचा वापर करण्यात येणार असून, लहान मुलांच्या लसीकरणाचे चांगले परिणाम दिसून येतील असे त्यांनी यावेळी सांगितले. मुलांच्या लसीकरणाची मोहीम शाळेत राबवण्याची (Child Vaccination In School) आमचा विचार होता. मात्र, लसीकरणानंतर मुलांना काही त्रास झाल्यास तात्काळ उपचार करणे गरजेचे असल्याने मुलांचे लसीकरण शाळांऐवजी दवाखान्यांमध्ये लसीकरण करण्यात येत आहे. यावेळी त्यांनी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गर्दी टाळण्याबरोबरच कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येत प्रत्येकाने काळजी घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

मुलं उत्साहाने लसीकरणासाठी आली आहेत. त्यांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यांना कोव्हॅक्सिन (Covaxin) लस देण्यात येत आहे. केंद्र सरकारने दिलेल्या नियमांनुसार ही प्रकिया राबवली जात असून स्वतंत्र व्यवस्थाही उभारली आहे. कोरोना चाचणीचे किट उपलब्ध करून देण्याची मागणी केंद्राकडे कऱण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळांवर तपासणी करण्याबाबत मार्गदर्शन करण्याची मागणी केंद्राकडे राज्य सरकारने केली असल्याचंही राजेश टोपे म्हणाले.

लॉकडाऊनबाबत काय म्हणाले टोपे

लॉकडाऊनसंदर्भात विचारले असता राजेश टोपे म्हणाले की, वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने निर्बंध लागू केले जातायत. महाराष्ट्रात उपलब्ध ऑक्सिजन आणि रुग्णालयातील बेड्सची संख्या यावरून निर्बंध ठरवण्यात येतील. सध्या हरयाणात, दिल्लीत निर्बंध आहेत. प्रत्येक राज्य वेगळ्या पद्धतीने निर्बंध लागू करतायत. तर आयसीएमआर वगैरे संस्था आहेत त्यांना नियोजनाचे अनुभव असतात, त्यांनी सर्व राज्यांना समान निर्बंध लागू करण्याबाबत मार्गदर्शन करायला हवं अशी मागणी केंद्र सरकारकडे केली असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं. (Rajesh Tope Statement on Lockdown)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT