Marathi Rangabhumi Din esakal
महाराष्ट्र बातम्या

Marathi Rangabhumi Din : मराठी रंगभूमी दिन 5 नोव्हेंबरलाच का साजरा केला जातो?

ज्याला रंगभूमी माहिती अशा प्रत्येकासाठी जागतिक रंगभूमी दिन महत्त्वाचा आहे.

सकाळ डिजिटल टीम

Marathi Rangabhumi Din : ज्याला रंगभूमी माहिती अशा प्रत्येकासाठी जागतिक रंगभूमी दिन महत्त्वाचा आहे. मराठी रंगभूमीला जवळ जवळ १७० हुनही जास्त वर्षांची परंपरा आहे. १८४३ ला नाटकाला डोक्यावर घेतलेल्या प्रेक्षकाने आजही त्याचा भार वाजत गाजत मिरवत पुढे आणला आहे.

समोर एक लाल पडदा, त्या पहिल्या दोन घंटा, प्रेक्षकांची पुढलं तिकीट मिळावं यासाठीची लगबग, प्रेक्षागृहात पसरलेला मंद धुपाचा सुवास; मागे नेपथ्य आणि प्रकाशयोजना सेट करण्याची वर्दळ, हलकेच कानावर पडणारे म्युसिक; तिसरी घंटा.. समोर जणू कलाकाराची परीक्षा घेयला बसलेला मायाळू प्रेक्षक.. आणि पडदा उघडतांना लख्ख प्रकाशात दिसणारा रंगमंच..

मराठी रंगभूमी दिन 5 नोव्हेंबर रोजी का साजरा केला जातो? मागील कित्येक वर्षांपासून मनोरंजन आणि प्रबोधन यांची सांगड घालत नाटक संस्कृतीचा वसा सुरू आहे. या वटवृक्षाचे एक देखणे मुळ म्हणजे मराठी नाटक. १८४३ मध्ये सीता स्वयंवर"" ने सुरू झालेला हा प्रवास आजही किमान १७० वर्षानंतरही सुरूच आहे .

सीता स्वयंवर, संगीत शारदा, संगीत सौभद्र, ती फुलराणी, सखाराम बाईंडर, घाशीराम कोतवा न्यूज आहे, एका लग्नाची तिसरी गोष्ट आणि आणखीन.गेले कित्येक वर्ष नाटक कधी थांबलं नाही कारण प्रेक्षकांनी ते थांबू दिलं नाही; काहीतरी नवं बघायला प्रेक्षक कुचारला पण म्हणून त्याने नाटकाचा हात कधी सोडला नाही.

०५ नोव्हेंबर हा रंगभूमीवर काम करणाऱ्या प्रत्येकासाठीच फार महत्त्वाचा आहे. याचा इतिहास बघुया...

१८४३ मध्ये सांगली येथे मराठी रंगभूमीचा पाया रचला गेला. चिंतामणराव पटवर्धन यांच्या आश्रयात विष्णुदास भावे यांनी ०५ नोव्हेंबर १८४३ साली “सीता स्वयंवर” या नाटकाचा प्रयोग केला आणि तिथूनच मराठी नाटकांच्या पर्वाला सुरुवात झाली.

१९४३ साली या दिवसाच्या स्मरणार्थ या क्षेत्रातील सर्व नामवंत कलाकारांनी एकत्र येऊन सांगली येथे ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत शताब्दी महोत्सव साजरा केला. या संमेलनाचे अध्यक्ष वि.दा.सावरकर हे होते.

याच दिवशी नाट्यविद्येच्या संवर्धनासाठी अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती स्थापन करण्यात आली. यावेळी सर्व नाट्य रसिकांच्या साक्षीने सांगली येथे समितीने ठराव करून हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्ह्णून घोषित करण्यात आला होता.

दरवर्षी यादिवशीच रंगभूमीची प्रदीर्घ काळ सेवा करणाऱ्या कलावंताला विष्णुदास भावे पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. मागील काही काळात रंगभूमीवर पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, मनोरंजनपर, रहस्यमय असे वेगवेगळे विषय हाताळले जाता आहेत. १७० वर्षाची ही मराठी नाटकाची परंपरा येत्या काळात आणखीनच वृद्धिंगत होत राहो ही सदिच्छा आणि सर्व रंगकर्मींना मराठी रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Megablock: मुंबई लोकल मार्गावर ५६ तासांचा विशेष ब्लॉक, मेल-एक्सप्रेसवर परिणाम; कधी आणि कुठे? पाहा वेळापत्रक

बरं झालं मी 'वाजले की बारा' नाही केलं नाहीतर... अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य; अमृता खानविलकरचे चाहते संतापले, म्हणाले- मॅडम

Flying Flea C6 : बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! रॉयल एनफिल्डची पहिली इलेक्ट्रिक बाईक लाँच; 154KM रेंज, रॅपिड चार्जिंग अन् किंमत फक्त...

Latest Marathi Live Updates: न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखला पाहिजे : अण्णा हजारे

पवनराजेंना मारलं कुणी? पद्मसिंहांच्या लेकानं १९९० ते २००९ पर्यंतचं राजकारण काढलं बाहेर, षडयंत्र असल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT