Metropolis Sakal
महाराष्ट्र बातम्या

Metropolis Success Story : एका खोलीतून सुरू झाला सात देशातील साम्राज्याचा प्रवास

नवीन विचार, मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर कोणताही व्यवसाय मोठ्या उंचीवर नेता येऊ शकतो.

सकाळ डिजिटल टीम

Metropolis Success Story : नवीन विचार, मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर कोणताही व्यवसाय मोठ्या उंचीवर नेता येऊ शकतो. याच जिवंत उदाहरण म्हणजे अमीरा शाह. मेट्रोपोलिस या भारताच्या पहिल्या इंटरनॅशनल पॅथॉलॉजी लॅबची सुरुवात अमिरा शहाच्या वडिलांनी एका छोट्या खोलीतून केली होती. पण आज अमिराने तिच्या वडिलांची हीच पॅथॉलॉजी लॅब 7 देशांमध्ये नेली आहे, या कंपनीच्या एकूण 171 लॅब कार्यरत आहेत.

हेही वाचा : First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातून फायनान्समध्ये पदवी घेतलेल्या अमिराचे पालक डॉक्टर आहेत. तिचे वडील डॉ. सुशील शहा हे मुंबईत एका खोलीतून 'डॉ. सुशील शहा लॅबोरेटरी' नावाची पॅथॉलॉजी चालवत होते. २००१ अमिरा अमेरिककेतू भारतात परतली त्यावेळी बांगलादेश ग्रामीण बँकेचे संस्थापक आणि नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्यामुळे प्रभावित झालेल्या अमिराने भारतात परतल्यानंतर वडिलांचा पॅथॉलॉजी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. यावेळी देशभरात पॅथॉलॉजी लॅबची साखळी तयार करण्याचा तिचा उद्देश होता. आज तिच्या या उद्देशाला यश आले आहे. आज मेट्रोपोलिस ही अशी एक कंपनी आहे, जिचे मूल्यांकन सुमारे 1.12 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 9,000 कोटी रुपये एवढे आहे.

अमिरा शहा यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगतात की, ज्यावेळी वडिलांचा लॅबोरेटरीचा व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला त्यावेळी लॅबच्या ग्राहकांचा विश्वास संपादन करणे हा खूप मोठा टास्क होता. यासाठी सर्वात प्रथम मी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील सहानुभूती, सचोटी आणि अचूकता या दुव्यावर लक्ष केंद्रित करण्यास सुरूवात केली. सुरुवातीला आमच्याकडे एक उत्तम डॉक्टरांचा ग्रुप होता पण, डॉक्टरांना मॅनेजमेंट, सेल्स आणि मार्केटिंग कशी येणार? असा प्रश्न होता. आमच्याकडे मार्केटिंग आणि मॅनेजमेंट टीमची कमी होती. ही फळी भक्कम करण्यासाठी आम्ही हळूहळू काम करण्यास सुरूवात केली. यामुळे व्यवसाय वाढण्याबरोबरच ग्राहकांचा विश्वासही वाढण्यास फायदा झाला.

पहिला पगार 15,000 रुपये

अमिराने तिच्या वडिलांसोबत 2.5 कोटी रुपये घेऊन मेट्रोपोलिस सुरू केले. सुरुवातीचा प्रॉफिट हा पूर्णपणे मेट्रोपोलिसच्या विस्तारात गुंतवला होता आणि अमिरा आणि तिचे वडील फक्त पगार घेत होते. अमेरिकेहून शिकून आलेली असतांनाही आणि स्वतःचीच कंपनी असतांनाही अमिराचा सुरुवातीचा पगार फक्त 15,000 रुपये होता. अमिरा सांगतात की, तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही इतरांकडून घेतलेला पैसा ही तुमची मालमत्ता नसून ती तुमच्यावरची जबाबदारी आहे. घेतलेली ही रक्कम तुम्हाला त्यांना चांगल्या रिटर्नसोबत परत करावी लागेल. जर तुम्ही ही जबाबदारी चोखपणे पार पाडली तर, गुंतवणूकदारांचा तुमच्यावरील विश्वास वाढतो असे अमिरा सांगतात.

अमिरा यांचा नव्या उद्योजकांसाठी मोलाचा सल्ला

नवीन उद्योजकांनी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे असून, व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी जेवढे पैसे लागतात तेवढचं कर्ज त्यांनी घ्यावं. उगाच जास्त पैसा घेतला तर, त्याचा दबाव वाढतो, जो हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे एकाच वेळी मोठी रक्कम घेण्याऐवजी हा निधी हळूहळू वाढवला पाहिजे. तुमचे मॉडेल चांगले असेल, ग्रोथ करत असेल, तर गुंतवणूकदार नक्कीच यामध्ये गुंतवणुकीसाठी रूची दाखवतात असे त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record Internet Speed: इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड! 10,000 पेक्षा जास्त 4K सिनेमे एका क्षणात झाले डाउनलोड, कुठे घडला हा चमत्कार?

Hinjewadi Electric Supply : हिंजवडीतील वीजपुरवठा ७२ तासांनी पूर्वपदावर; नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

Latest Marathi News Updates : बँकेबाहेर विसरलेली सव्वा लाखाची रोकड असलेली पिशवी दांपत्यास केली परत

Valhe News : बँकेबाहेर विसरलेली सव्वा लाखाची रोकड असलेली पिशवी दांपत्यास केली परत

Video: बापरे! प्रार्थना बेहरेच्या पायाला गंभीर दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'तुमच्या आशिर्वादाची...'

SCROLL FOR NEXT