radhakrishna vikhe patil
radhakrishna vikhe patil 
महाराष्ट्र

म्हाडाने परत घेतलेला भूखंड गृहनिर्माण मंत्र्यांनी नियमबाह्यपणे पुन्हा विकासकाला दिला!

सकाळन्यूजनेटवर्क

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा आरोप

मुंबई : म्हाडाने खासगी विकासकाकडून परत घेतलेला भूखंड राज्याच्या गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी पुन्हा त्याच विकासकाला नियमबाह्यपणे परत दिल्याचे प्रकरण विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी समोर आणले आहे.

आज (बुधवार) दुपारी विखे पाटील यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, पंतनगर, घाटकोपर येथील सीटीएस क्र. 194 हा 18 हजार 902 चौरस मिटरचा भूखंड 1999 मध्ये निर्मल होल्डिंग प्रा. लि. या विकासकाला पूनर्विकसीत करण्यासाठी देण्यात आला. मात्र विकासकाने कोणताच प्रतिसाद न दिल्याने म्हाडाने 2006 मध्ये तो भूखंड परत घेतला. परंतु, गृहनिर्माण मंत्र्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून हा भूखंड पुन्हा एकदा त्याच विकासकाला दिल्याची माहिती आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने गृहनिर्माण मंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली.

या प्रकरणातील अधिक गंभीर माहिती म्हणजे हा भूखंड पुन्हा त्याच विकासकाला देण्यास नकार देणाऱ्या सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची त्या पदावरून तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे विखे पाटील यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT