Shivsena Symbol News
Shivsena Symbol News esakal
महाराष्ट्र

Shivsena Symbol: शिंदे-ठाकरे गटाच्या वादात दाखला दिला जाणारी 'ती' व्यक्ती कोण ?

रुपेश नामदास

Shivsena Symbol : राज्याचं राजकारण कोणत्या दिशेला चाललं आहे. कोणच सांगू शकत नाही. शिवसेना म्हणटलं की हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव ओठावर येतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे असा वाद चालू आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत आत्तापर्यंतची सर्वात मोठी फूट पडली.

महाराष्ट्र साखर झोपेत असतानाच तत्कालीन शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार गुवाहाटीला घेवून जात मोठा बंड पुकारला त्यानंतर शिवसेना हे नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचं या वरून वादाला सुरूवात झाली. त्यानंतर दोन गट पडले एक म्हणजे उद्धव ठाकरे गट आणि दुसरा म्हणजे एकनाथ शिंदे गट.

दोन्ही गट दावा करू लागले की आम्हीच खरी शिवसेने आहे. आता वादावर कोर्टात आणि निवडणूक आयोगात सुनावणी चालू आहे. या दोन्ही ठिकाणी सुनावणीत काँग्रेसच्या एका केसचा सतत उल्लेख केला जात आहे. ती केस म्हणजे सादिक आली केस.

सादिक अली प्रकरणाचा दाखला एकनाथ शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांच्या वतीने निवडणूक आयोगात सादर करण्यात येत आहे . हे प्रकरण काँग्रेसमधील फुटीशी संबंधित आहे. दरम्यान सादिक आली नक्की कोण होते त्यांचं कार्य काय जाणून घ्या.

कोण होते सादिक आली?

सादिक अली यांचा जन्म ४ एप्रिल, १९१० रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे झाला. अलाहाबाद विद्यापीठातील शिक्षण पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांनी लहान वयातच घर सोडले. त्यानंतर ते स्वातंत्र्युद्धात सहभागी झाले. अनेकवेळा त्यांनी तुरूंगवासही भोगला.

१९३६ ते १९४८ या काळात ते अखिल भारतीय काँग्रेस समितीचे कार्यालयीन सचिव आणि मग स्थायी सचिवही झाले.

१९५० ते १९५२ पर्यंत ते तात्पुरत्या संसदेचे आणि १९५७ पासून ते १९७० पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. तसेच १९५८-६२ आणि १९६४-६९ या काळात ते अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या `आर्थिक पुनर्विलोकन` (इकॉनॉमिक रिव्ह्यू) याचे मुख्य संपादकही होते.

१९५८-१८६२ व पुन्हा १९६४-१९६९ या कालावधीमध्ये ते अखिल भारतीय काँग्रेस समिती प्रमुख कार्यवाह होते.

१९६९ मध्ये काँग्रेसमध्ये दोन गट पडले. इंदिरा गांधींच्या विरोधात काँग्रेस संघटना गट तयार झाला. तेव्हा इंदिरा गांधींच्या समर्थकांनी काँग्रेस दुसरा गट स्थापन केला होता. इंदिरा गांधींच्या विरोधातल्या संघटना कॉंग्रेसचं अध्यक्षपद सादीक अली यांच्या कडे सोपवण्यात आलं.

इंदिरा गांधींच्या विरोधात संघटना कॉंग्रेस सर्वोच्च न्यायालयात गेली. पक्ष अध्यक्ष म्हणून सादीक अली यांच्या नावाने ही केस ओळखली गेली. याच केसचा दाखला आजही शिंदे ठाकरे गटाच्या वादात सुप्रीम कोर्टात दिला जातो.

१९७१-७३ या काळात सादीक अली यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (ओ) चे अध्यक्ष म्हणून काम पाहिले, १९७७-८० या काळात ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते, तर १९८०-८२ या काळात तामिळनाडूचे राज्यपाल होते. १९९२-९६ या कालावधीत त्यांनी राजघाट समाधी समिती, नवी दिल्ली याचे अध्यक्ष म्हणून काम केले.

१९८५ पासून ते गांधी स्मारक संग्रहालय समितीचे अध्यक्ष होते, आणि १९९० पासून गांधी राष्ट्रीय स्मारक निधीचे अध्यक्ष होते. सरदार पटेल मेमोरियल ट्रस्ट आणि सांप्रदायिक सद्भावना परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

ए सर्व्हे टूवर्डस सोशालिस्ट थिंकिंग इन द काँग्रेस, डेमोक्रेसी अँड नॅशनल इंटिग्रेशन, दि व्हिजन ऑफ स्वराज्य इ. त्यांची पुस्तके खूपच गाजली होती.

हेही वाचा- दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Result : बारावीचा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला; कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१

Narendra Modi : ... तर नेहरूंनी आरक्षणच दिले नसते

Pune News : विशाल अग्रवालसह चार जणांना अटक

Azamgarh Loksabha Election : ‘सप’च्या बालेकिल्ल्यात दोन यादवांमध्ये लढाई; धर्मेंद्र यादव विरुद्ध दिनेशलाल निरहुआ

Milind Deora : उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस पक्ष सोडला

SCROLL FOR NEXT