Fadnvis_Pravin Chavan 
महाराष्ट्र बातम्या

"ते वकील तसा मी पण वकील, त्यामुळं...."; प्रवीण चव्हाणांच्या आरोपांना फडणवीसांचं उत्तर

फडणवीसांनी समोर आणलेल्या स्टिंग आपरेशनवर सरकारी वकिलांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : स्टिंग आपरेशनमधील (Sting Operation) फुटेजद्वारे विधानसभेत सरकारी वकील आणि महाविकास आघाडी सरकारवर (MVA Govt) विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी गंभीर आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्या आरोपांना सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Pravin Chavan) यांनी प्रत्युत्तर देताना या व्हिडिओमध्ये आणि आवाजात छेडछाड झाल्याचा आरोप केला होता. पण चव्हाण यांच्या आरोपांना फडणवीसांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आहे. (Sting operation Fadnavis responds to allegations of public prosecutor Praveen Chavan)

फडणवीस म्हणाले, प्रवीण चव्हाण जसे वकील आहेत तसा मी देखील वकील आहे. माझ्या पुराव्यांवर अशा प्रकारे प्रतिक्रिया येईल, याची मी आधीच काळजी घेतली आहे. त्याची टेक्निकल माहिती माझ्याकडे आहे, सव्वाशे तासांच्या व्हिडिओ व्यतिरिक्त आणखी पुरावे माझ्याकडे आहेत. ते मी सीबीआयकडे गेल्यानंतर देईन, त्याची चौकशी राज्य पोलीस करू शकत नाहीत. या प्रकरणावर तीन दिवस चव्हाण का बोलले नाहीत. गेल्या तीन दिवसांत पोलिसांशी चर्चा करून मग आता ते पुढे आले आहेत. आता यासंदर्भात गुन्हा दाखल करायचा आणि दबाव टाकायचा प्रयत्न सुरु आहे पण मी ते होऊ देणार नाही.

याबाबत दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्यास मी लागेल तो टेक्निकल रिपोर्ट सादर करेन. हे जे सरकारी वकील आहेत त्यांच्याविरोधात मी पुरावे मांडल्यानंतर माझ्याकडे याबाबत आता अनेक तक्रारी आल्या आहेत. काल एक भयानक तक्रार आली आहे, पण मी सध्या त्याचं व्हेरिफिकेशन करतोय, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

विधानसभेतील या पुराव्यानंतरच मला नोटीस पाठवण्यात आली आहे. सध्या याचं नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सरकारमध्ये घबराट पसरली आहे. आम्ही काही कारवाई करत आहोत यामुळं आपले घोटाळे बाहेर येत आहेत ते दाबण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. कॅमेऱ्यांवर डेट वेगवेगळ्या आहेत. त्यांच्याकडून लोकांची दिशाभूल केली जात आहे. पण माझ्याकडे आलेल्या व्हिडिओचं मी फॉरेन्सिक ऑडिट करून घेतलं आहे. या प्रकरणाची चौकशी जर करायची असेल तर विरोधी पक्षाच्या लोकांना जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र हे कसं करू शकतात? ज्यांची नावं यामध्ये घेतली आहेत, त्यांची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही यावेळी फडणवीस यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ''संतोष देशमुख प्रकरणातल्या आरोपींनी राबवलं ऑपरेशन डी-टू'', उज्वल निकमांनी घेतलं थेट पाकिस्तानचं नाव

Trip Locations : गुगलवर वर्षभरात सर्च झालीत टॉप 5 ठिकाणे, दोन दिवसांची सुट्टी घेऊन प्लॅन करा ट्रीप, खर्चही एकदम कमी

Latest Marathi News Live Update : वर्ध्यात सामान्य रुग्णालयात आग, सुदैवाने कुणालाही इजा नाही

ICC Rankings: वर्ल्ड कप स्टार दीप्ती शर्मा नंबर १! ऑस्ट्रेलियान खेळाडूला धक्का; पण, स्मृती मानधनाने गमावला ताज

नियती इतकी निर्दयी कशी? अपघात आई-वडिलांचं छत्र हरवलं, निरागस लेकरांनी एकमेकांना सावरलं; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT