Prateik Babbar talks about mother smita patil
Prateik Babbar talks about mother smita patil Google
मनोरंजन

Prateik Babbar: 'आईविषयी मनात प्रचंड राग...', स्मिता पाटील यांच्याविषयी हे काय म्हणाला प्रतिक बब्बर?

प्रणाली मोरे

Prateik Babbar: प्रतिक बब्बर लवकरच मधुर भांडारकर यांच्या 'इंडिया लॉकडाऊन' सिनेमात मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. प्रतीक या सिनेमात आपल्या नेहमीच्या मेट्रो सिटी बॉय लूकपेक्षा वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. यात त्यानं लॉकडाऊन दरम्यान काम गेल्यामुळं उपासमारीपोटी स्थलांतरीत होणाऱ्या कामगाराची व्यक्तिरेखा साकारली आहे. मुलाखती दरम्यान प्रतीकनं सांगितलं की तो या भूमिकेला आपली आई स्मिता पाटील यांना समर्पित करू इच्छितो. (Prateik Babbar talks about mother smita patil)

प्रतिक पुढे म्हणाला,''ही भूमिका अशी होती ज्याला मी नकार देऊच शकलो नाही. मधुर भांडारकर जेव्हा माझ्याकडे स्क्रिप्ट घेऊन आले, तेव्हा मी हैराण झालो होतो. कारण तोपर्यंत मी अशा पद्धतीची भूमिका साकारली नव्हती. माझ्या व्यक्तिरेखेच्या एकदम विरोधात होती ही भूमिका. आपण सगळेच कामासाठी दूर शहरात येऊन राहणाऱ्या कामगारांच्या आयुष्याविषयी जाणतो. आयुष्याशी रोजचा त्यांचा सुरु असलेला झगडा आपल्याला माहितीय.आपल्या कुटुंबाला चालवण्यासाठी त्यांना खूप स्ट्रगल करावा लागतो. खासकरुन जेव्हा लॉकडाऊन झालं होतं, तेव्हा सगळ्यात जास्त परिणाम या स्थलांतरीत कामगारांच्या आयुष्यावर झाला होता''.

हेही वाचा: गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

''अडचणींचा एवढा मोठा डोंगर त्यांच्यासमोर उभा राहिला होता की त्यांना आपल्या घरी पोहोचण्यासाठी पायी चालत जावं लागलं होतं. आणि माझ्यावर खूप मोठी जबाबदारी होती की मी समाजातील या घटकाचं प्रतिनिधित्त्व सिनेमाच्या माध्यमातून चोख पार पाडावं. शूटिंगचा अनुभव तर खूपच कमाल होता.आणखी एक कारण आहे माझी आई,स्मिता पाटील जिच्यामुळे मी ही भूमिका पडद्यावर साकारली. कारण तिचे कितीतरी सिनेमा मातीतले होते. आपल्या लोकांशी जोडलेले. मला माझ्या आईला माझ्या पद्धतीनं श्रद्धांजली वहायची होती''.

''आईशी तुलना केली जाते अर्थातच माझ्यावर याचं दडपण आहे. पण त्यातनंच मला उत्साह मिळतो असं देखील प्रतिक म्हणाला. मी यामुळे अधिक आत्मविश्वासू बनतो. मला सारखं आठवण करून दिली जाते की मी एका प्रतिभावंत अभिनेत्रीचा मुलगा आहे. माझ्यासाठी तिच्या अभिनयाच्या जवळपास जाणं म्हणजे खूप मोठी अचिव्हमेंट असेल''.

''जेव्हा पण मी आईविषयी विचार करतो ,तिचे सिनेमे पाहतो,फोटो पाहतो ,तेव्हा तिचा काळ नकळत अनुभवण्यास लागतो,कदाचित मी शब्दात हे नाही सांगू शकत. आईशी जोडल्या गेलेल्या सगळ्याच गोष्टी खूप मौल्यवान असतात. अनेक लोक जे आईला ओळखतात ते मला तिच्याविषयी अनेक गोष्टी सांगतात. आणि त्या माध्यमातून मग मी तिच्या अधिक जवळ जातो,खरंतर यामुळे मी तिला ओळखू लागलो''.

''मी खूप लकी आहे की स्मिता पाटील यांना म्हणजे माझ्या आईला तिच्या सिनेमांच्या माध्यमातूनही मी ओळखतो. मला माहितीय,ती माझ्यासोबत नाही,पण आता मी तिला पूर्णतः ओळखतो. पण एक खंत मात्र कायम सतावते. जर आई असती तर..मला आईचं प्रेम मिळालं असतं.तिच्यासोबत जगता आलं असतं. पण मग विचार करतो ती नसली तरी तिचा आत्मा कुठेतरी माझ्याजवळच आहे. ती मला पाहतेय. मला मार्गदर्शन करतेय. राहिला प्रश्न रागाचा,तर हो मला खूप राग येतो. त्या रागामुळेच तर माझं करिअर संपलं होतं आईवरच्या रागामुळे मी माझं आयुष्य संपवायला निघालो होतो. आता तो राग थोडा कमी झालाय,माझे आजी-आजोबा मला सोडून गेले तेव्हा मी आपल्या मातीत,आपल्या लोकांशी हळूहळू जोडला गेलो''.

''मी माझ्या रागामुळे खूप काही सहन केलंय. पण देवाचे आभार मानतो की मी लवकर या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. आता मी गोष्टींचा स्विकार करायला सुरुवात केली आहे. मला सर्वात जास्त राग तेव्हा यायचा जेव्हा वाटायचं आई का नाहीय माझ्या जवळ, मला मार्गदर्शन करायला. मी चूकतो कुठे हे सांगायला. का नाही ती मला सांगत काही. मी काय करतोय याविषयी कोण बोलणार. आणि मग मी आकाशाकडे एकटक बघत म्हणायचो, मी असा यामुळे आहे कारण तू माझ्यासोबत नव्हतीस. तुझ्यामुळे मी स्वतःला असं करुन घेतलंय. मी स्वतःलाच प्रश्न विचारायचो की मी चुकीचा वागतो कारण माझी आई नाहीय. इतर मुलांप्रमाणे माझं बालपण नव्हतं''.

पुढे प्रतिक म्हणाला की, ''भले मी स्मिता पाटील आणि राज बब्बरचा मुलगा असलो तरी मी एका टिपिकल मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलो. मला जाणुनबुजून सिनेइंडस्ट्रीपासून दूर ठेवलं गेलं. माझे कोणी मित्र या इंडस्ट्रीतून नव्हते. स्टारकिड्ससोबत मी वाढलो नाही. एका आऊटसाइडर्सप्रमाणे मी अनेकदा रिजेक्शन पचवलंय. मला अनेकदा वाटायचं स्टारकिड असूनही मला तसं वागवलं जात नाही. पण मला यामुळे कधीच फरक पडला नाही. मी स्वतःला समजवायचो,मी युनिक आहे,माझ्यासारखं कुणीच नाही. माझा प्रवास खूप वेगळा आहे कारण माझी गोष्ट वेगळी आहे''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT