boycott or cancel culture is really damaging bollywood films profit, but know how movie gain profit. Google
मनोरंजन

लाल सिंग चड्ढा,रक्षाबंधन फ्लॉप, तरीही नफ्यात; कशी अन् कुठून केली कमाई? वाचा

कोरानानंतर जेवढे बिग बजेट सिनेमे रिलीज झाले त्यांनी बॉक्सऑफिसवर अक्षरशः मान टाकल्याचं चित्र दिसून आलं आहे.

प्रणाली मोरे

Laal Singh Chaddha gain profit: लॉकडाऊन दरम्यान लोकांचे मनोंरजन होत रहावं म्हणून अनेक सिनेमे रिलीज केले गेले. पण आता काय होतंय हे. कोरोना नंतर जणू प्रेक्षकांनी मनोरंजन सृष्टीकडे पाठच फिरवली आहे. प्रेक्षक आता प्रमाणापेक्षा जास्तच चोखंदळ झालेयत. एकापाठोपाठ एक बिग बजेट सिनेमे रिलीज होत आहेत पण प्रेक्षक मात्र त्यांच्याकडे पाठ फिरवू लागलेयत.(boycott or cancel culture is really damaging bollywood films profit, but know how movie gain profit.)

बॉलीवूडमध्ये सध्या अॅक्शन सिनेमे लोकांना भुरळ घालताना दिसत आहेत. ना बडे स्टार्स चालताना दिसत आहेत,ना कॉमेडीची जादू लोकांवार काम करतेय ना इमोशन्स. बड्या बॅनर्सच्या सिनेमांची तर अक्षरशः माती झाली आहे. सुपरस्टार्सचे सिनेमे तर साधं एक आठवडा देखील थिएटरात तग धरू शकले नाहीत. एक व्हिलन रिटर्न्स फ्लॉप,शमशेरा फ्लॉप,शाबाश मिठू फ्लॉप, खुदा हाफिज-२ फ्लॉप, सम्राट पृथ्वीराज फ्लॉप,धाकड फ्लॉप,जनहित मे जारी फ्लॉप,हिरोपंती-२ फ्लॉप, जर्सी फ्लॉप, बच्चन पांडे फ्लॉप,बधाई दो फ्लॉप, बंटी और बबली २ फ्लॉप आणि आता आमिरचा ड्रीम प्रोजेक्ट लाल सिंग चड्ढाचीही दांडी गूल. २०२२ मध्ये रिलीज झालेल्या कोणत्याही सिनेमाचं नाव घ्या आणि पहा...सिनेमाचं नाव वेगळं असेल, कलाकार वेगळे असतील,. बॅनर वेगळं असेल पण एक गोष्ट कॉमन असेल ती म्हणजे...फ्लॉपचा शिक्का.

ऑगस्ट आता संपत आलाय आणि भूलभूलैय्या २ आणि काश्मिर फाईल्सला सोडलं तर अद्याप बॉलीवूडला एकही हिट सिनेमा मिळालेला नाही. फ्लॉप सिनेमांची यादी जशी मोठी होतेय तसं आता बॉलीवूडचा गेम खल्लास झाला अशी भविष्यवाणी होताना दिसत आहे. पण याव्यतिरिक्त आता एक मोठा प्रश्न चर्चेत आला आहे.

boycott or cancel culture is really damaging bollywood films profit, but know how movie gain profit.

प्रश्न हा आहे की सिनेमे फ्लॉप होत असले तरी यामध्ये पैसा लावणारे निर्माते आणि कलाकार कसे काय आरामात दिसतायत. ना निर्मात्याचं दिवाळं निघालं अशी बातमी नाही, ना कुठे कलाकार कंगाल झाला अशी चर्चा. बॉलीवूडचं आपलं मस्त सुरू आहे. पण याचं उत्तर दडलंय इथल्या कमाईच्या गणितात. चला जाणून घेऊया

प्रसिद्ध ट्रेड अॅनलिस्ट कोमल नाहटा म्हणतात,''आजच्या जमान्यात जे सिनेमे रिलीज होतात, ते फ्लॉप झाल्यावर त्याचं नुकसान निर्मात्याला भोगावं लागत नाही तर ते सॅटेलाइट राइट्स,डिजिटल राइट विकत घेणाऱ्यांना आणि ड्रिस्ट्रीब्युटर्सना झेलावं लागतं. लाल सिंग चड्ढा फ्लॉप झाल्यावर आमिर खानला किंवा निर्मात्याला काहीच नुकसान झेलावं लागलं नाही. पण याचा फटका वॉयकॉम 18 ला बसला. मोठ्या सिनेमांच्या बाबतीत हेच घडतं. त्यांच्या मेकर्सना माहीत असतं की सिनेमाला टेबल प्रॉफीट तर मिळून जाईल, नंतर ज्याला रडायचं आहे तो रडेल. त्यामुळे कथेवर मेहनत घेताना मेकर्स दिसतच नाही. त्यांना वाटतं की फायदा तर मिळत आहे, मग कशाला मेहनत करायची,आणि सरळ-सरळ कामात चालढकल सुरु आहे. आता असं कुणीच बोलत नाही की लाल सिंग चड्ढासाठी मेहनत नव्हती घेतली, पण सिनेमाच्या कथेतच दम नसेल कोण काय करणार''.

ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यावर सविस्तर समजावून सांगताना म्हणत आहेत की,''सिनेमानं किती बिझनेस केला ,त्याचं कलेक्शन काय,त्याच आधारावर सिनेमे फ्लॉप किंवा हिट ठरतात. कोरोनानंतर खूप सिनेमे फ्लॉप ठरले आणि त्यांची कमाई देखील ना के बराबर होती. पण जे फ्लॉप झाले त्यांनी थिएटरिकल राईट्स,डिजिटल राईट्स, सॅटेलाईट राई्टस यांच्या मदतीलं मोठ्या प्रमाणात आपला पैसा वसूल केला. रिलीज आधीच आपल्या सिनेमांचे राइट्स विकून निर्माते आपला पैसा वसून करून घेतात. पण ज्यांना सिनेमे विकलेले असतात त्यांचे मात्र नुकसान होते. तरणने शमशेराचं उदाहरण देत म्हटलं आहे की, हा सिनेमा थिएटरात चाललाच नाही. पण रिलीज आधीच यशराजने प्रीसेल्सच्या माध्यमातून आपली गुंतवणूक वसूल केली''.

boycott or cancel culture is really damaging bollywood films profit, but know how movie gain profit.

ट्रेड अॅनलिस्ट गिरीश जौहर म्हणतात की,'' सिनेमाची कमाई ही देशातील आणि परदेशातील थिएटर्समधून होते. ओटीटी डिजीटल, म्युझिक, सॅटेलाइट्स, सिंडिकेशन राइट्स,रीमेक सारखे राइट्स मधनं देखील मोठी रक्कम वसूल केली जाते. काही सिनेमांचे ब्रॅंडिंगचे राइट्स देखील असतात, इथे बार्टर सिस्टममध्ये ब्रान्ड सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची मार्केटिंग करतात. इथे देखील पैशाची बचत केली जाते,जेव्हा सिनेमा रिलीज होणार असतो. सिंडीकेशन राइट्स-म्हणजे कधी सिनेमा टी.व्ही वर गेला, कधी परदेशातील फ्री टू एअर चॅनलवर दाखवला गेला किंवा कधी यू.ट्यूब चॅनलवरही गेला तर यामाध्यमातूनही सिनेमे नफा कमावतात.

boycott or cancel culture is really damaging bollywood films profit, but know how movie gain profit.

गिरीश म्हणाले की,'' एका सिनेमा ५० ते ६० टक्के कमाई ही बॉक्सऑफिसवरनं करतो . डिजिटल राइट्समधून २० टक्के कमाई होते. म्युझिक राइ्टसमधनं ७ ते १० टक्के कमाई होते. सॅटेलाइट राइट्समधून १० टक्के तर बाकी उर्वरीत २ ते ३ टक्के अन्य राइट्समधून कमावले जातात. जर सिनेमा हिट झाला तर नशीबच बदलून जातं ही गोष्ट वेगळी. सगळे राइट्स एकमेकांशी इंटरलिंक आहेत. सिनेमा हीट झाला तर सॅटेलाइट राइट्स वाढतात. ओटीटीवर सिनेमाची व्हॅल्यू वाढते. हे सगळं एकंदरीत गणित असतं,जे थोडं गुंतागुंतीचं आहे पण मेकर्ससाठी फायद्याचं, मग भले सिनेमा बॉक्सऑफिसवर फ्लॉप का होईना''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT