Deepika Padukone birthday sakal
मनोरंजन

Deepika Padukone : आमचं सगळं चांगलं होतं, पण त्या कारणानं झालं ब्रेक अप… रणबीर बोलून गेला

रणबीर आणि दिपिकाचं ब्रेकअप का झालं होतं, जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

आज बॉलीवूडची मस्तानी गर्ल दीपिका पादुकोण चा वाढदिवस आहे. दीपिका पादुकोण आज 37 वर्षाची झाली. दीपिका पादुकोणचे चित्रपट असो की वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय राहले. एकापेक्षा एक भारी चित्रपट देणारी दिपिका ही आताच्या दशकातली बॉलीवूडमधील मोठी अभिनेत्री मानली जाते.

दीपिकाचे प्रत्येत चित्रपट बॉक्स ऑफीसवर हिट होतात. तसंच तिचं वैयक्तिक आयुष्यही तितकंच गाजलं.आज जरी अभिनेता रणविर सिंगसोबत लग्न बंधनात अडकलेली असली तरी एकेकाही ही दीपिका रणबीर कपूरसोबतच्या प्रेमात होती. त्यावेळी त्यांच्या प्रेमाची जितकी चर्चा रंगली त्यापेक्षा जास्त त्यांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली.

आज आपण रणबीर आणि दीपिकाचं ब्रेकअप का झालं होतं, याविषयी जाणून घेणार आहोत. एका मुलाखतीत स्वत: रणबीरनी याविषयी खुलासा केला होता.

रणबीर-दीपिकाची लव्हस्टोरी ही बॉलीवूडमधील सर्वात गाजलेलं प्रेमप्रकरण होतं. बचना ए हसीनों या चित्रपटापासून त्यांची जवळीकता वाढत गेली आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडाले मात्र हे प्रेम जास्त दिवस राहले नाही आणि वर्ष 2009 मध्ये दोघांचं ब्रेकअप झालं.

ब्रेकअपनंतर त्यांचं नातं का तुटलं, ही एकच चर्चा होती. यावर अनेक दीपिकाने अनेकदा रणबीरवर चीट केल्याचा आरोप केला होता. ब्रेकअपनंतर दिपिका डिप्रेशनमध्ये गेली होती. तो तिच्या आयुष्यातील वाईट काळ होता. दीपिकाच्या आरोपानंतर एका मुलाखतीत रणबीरने ब्रेकअपविषयी खुलासा केला होता.

रणबीरने म्हणाला होता, "हो मी धोका दिला होता. मी मॅच्योर नव्हतो. अनुभव नव्हता. आपल्याला या गोष्टी तेव्हा कळतात जेव्हा आपण खूप मोठे होतो. तेव्हा आपण याला अधिक महत्त्व देतो. जेव्हा तुम्ही कमीटमेंट देऊ शकत नाही त्यावेळी तुम्ही त्या नात्यात का असावे?

रणबीर समोर म्हणाला, दीपिकासोबत माझं नातं टिकलं नाही आणि वेगळं झालो. आम्ही या सर्व गोष्टी मॅच्युरीटीसोबत हाताळल्या. दिपिकासोबत मी आयुष्यात समोर गेलं. माझ्या करीअरच्या ग्रोथमध्ये दीपिकाचा मोठा वाटा आहे. मी तिच्या सोबतच्या सर्व आठवणी जपून ठेवल्या. दिपिकाने मला कमिटमेंटविषयी बरंच काही शिकवलं.

रणबीर हा आलियासोबत लग्नबंधनधात अडकला असून त्याला एक छोटी मुलगी आहे तर दीपिकासुद्धा अभिनेता रणवीर सिंग सोबत वैवाहीक जीवनात खूप खुश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Stock Market Closing: शेअर बाजार 3 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद; आयटी आणि एफएमसीजीमध्ये मोठी वाढ

बॉलिवूडचा एक असा खलनायक ज्याच्यामुळे अमिताभ बच्चन झाले सुपरस्टार ! त्याचा मृत्यू अखेरपर्यंत रहस्यच राहिला

Who Is Shashank Rao : बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधुंना शह देणारे शशांक राव कोण? कशी केली कमाल?

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT