Kareena Kapoor, Mahesh Tilekar
Kareena Kapoor, Mahesh Tilekar Esakal
मनोरंजन

Kareena Kapoor:'इन्फोसिसच्या नारायण मूर्तींसोबत हे चुकीचेच वागली करीना..', महेश टिळेकरांनी पोस्ट करत व्यक्त केली चीड

प्रणाली मोरे

Kareena Kapoor: बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर खानचे चाहते जगभरात पसरले आहेत. तिचं फॅनफॉलोइंग किती जास्त आहे याचा अंदाजा देखील आपण लावू शकत नाही. करीना कपूर बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. पण अनेकदा तिच्या गर्विष्ठ स्वभावामुळे ती चर्चेत आलेली पहायला मिळाली आहे. यादरम्यान आता मराठी निर्माते-दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी करीना कपूरचं चाहत्यांना आणि तिच्या सहकलाकारांना इग्नोर करण्याविषयी एक खुलासा केला आहे. आता महेश टिळेकर यांनी अनेक बॉलीवूड अभिनेत्रींसोबत काम केले आहे,टिळेकरांचे बॉलीवूडमध्ये देखील मोठी ओळख आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. त्यांच्या मराठी तारका या कार्यक्रमाला आशा पारेख,झीनत अमान यांच्यापासून रेखा,कंगना रनौत यांनी देखील हजेरी लावली आहे,हा मोठा दाखला म्हणाला लागेल.(Marathi Producer-Director Mahesh Tilekar Post on Kareena Kapoor)

महेश टिळेकर यांनी एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे आणि करीनाशी संबंधित एक खुलासा केला आहे. त्यांनी एक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की,आठ वर्षापूर्वी ते आपल्या टीमसोबत विमानप्रवास करत होते. जिथे त्यांनी करीनाला एअरपोर्टवर पाहिलं होतं. या पोस्टमध्ये महेश टिळेकर यांनी करीनासोबत राधिका आपटेच्या नावाचा देखील उल्लेख केला आहे. राधिकाला ऑटोग्राफ देणं पसतं नाही पण सिनेमाचं प्रमोशन असतं तेव्हा मात्र तिची पसंत जाते कुठे...असं रागानं त्यांनी म्हटलं आहे. पण टिळेकरांच्या पोस्टचा मुख्य संदर्भ लागतोय तो इन्फोसिसचे सर्वेसर्वा नारायण मूर्ती यांच्याशी.

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत महेश टिळेकर यांनी लिहिलं आहे की,''कुठं मूर्ती आणि कुठे करीना?
नुकताच इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांच्या इंटरव्ह्यूचा एक व्हिडिओ पाहिला ज्यात ते सांगत होते की लंडनहून ते भारतात येत असताना फ्लाईट मध्ये त्यांच्या पुढच्या सीटवर करीना कपूर बसली होती. फ्लाईट मधील काही लोक नारायण मूर्ती यांच्याजवळ येऊन त्यांना अभिवादन करत होते ,दोन शब्द बोलत होते आणि लोक आपल्याला रिस्पेक्ट देतायेत म्हणून मूर्ती उभे राहून त्यांच्याशी संवाद साधत होते, पण काही चाहते करीना कपूर जवळ जाऊन तिला हॅलो म्हणत होते तर ही त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हती आणि ही गोष्ट नारायण मूर्ती यांना खूप खटकल्याचे त्यांनी सांगितले आणि करिनाचा असा इगो काय कामाचा? असा प्रश्नही त्यांनी केला

''8 वर्षांपूर्वी आमचा मराठी तारका कार्यक्रमाचा परदेशातून शो करून एअरपोर्ट वर आल्यावर पुन्हा तिथे चेकिंग साठी असणाऱ्या रांगेत मी उभा होतो,तर आमच्या कार्यक्रमातील एका मराठी अभिनेत्रीच्या पुढे करीना कपूर उभी होती,तिचा पासपोर्ट दाखवून ती पुढे वळताना तिचा चेहरा दिसला तसा आपली मराठी अभिनेत्री तिच्याशी बोलायला म्हणून लाळ घोटेपणा करत तिच्या मागे धावत गेली पण करीना तिला फाट्यावर मारत झपाझप पावले टाकत पुढे निघून गेली. बरं याच मराठी अभिनेत्रीने करीना कपूर च्या एका लोकप्रिय सिनेमात एका सिन साठी नगण्य भूमिका केली होती तरी देखील करीनाने तिच्याकडे मान वळवून ही पाहिलं नाही, फोटो काढणं तर दूरच''
''पण हेच स्वतः च्या प्रेमात असणारे काही सेलिब्रिटी यांचा एखादा सिनेमा रिलीज व्हायचा असेल तेंव्हा जनमानसात मिसळून , चाहत्यांबद्दल प्रेम असल्याचा जो अभिनय करतात त्याला खरच तोड नाही.मागे एका इंटरव्ह्यू मध्ये हिंदीत काम करणारी मराठी अभिनेत्री राधिका आपटे हिने तिला लोकांना फोटो,सेल्फी द्यायला आवडत नाही, ती सही पण देत नाही चाहत्यांना असं सांगत होती''. 

''पण काहीच दिवसांपूर्वी OTT वर रिलीज झालेल्या तिच्या एका हिंदी सिनेमाच्या प्रमोशन निमित्ताने मात्र सोशल मीडियावर पॉप्युलर असणाऱ्या काही इन्फ्लुंसर बरोबर सेल्फी देऊन स्वतः ची प्रसिध्दी करून घेत होती. बरं या बयेला ती कुठं राहते तो पत्ता पण लोकांना, तिच्या चाहत्यांना कळू नये असं वाटतं.जर समजलं लोकांना ही कुठं राहते मुंबईत तर काय फरक पडणार आहे? अमिताभ बच्चन,सलमान,शाहरुख यांना पहायला जशी गर्दी जमते तसा जनसमुदाय हीची एक झलक दिसावी म्हणून हिच्या बिल्डिंग बाहेर जमा होणार आहे का??? जेंव्हा कामे मिळणं बंद होतं, प्रसिद्धीचा काळ संपतो तेंव्हा कुणीतरी आपली दखल घ्यावी म्हणून बेचैन होणारे अनेक नट नट्या मी जवळून पाहिले आहे''.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, आम्हालाही तसाच नेता हवा.. पाकिस्तानी अब्जाधीशाने उधळली स्तुतीसुमनं

Car Care: कडक उन्हात कार आतील बाजूस थंड ठेवण्यासाठी आजच करा 'या' 5 गोष्टी

Shirur Lok Sabha : मतांचा टक्का घसरल्यामुळे भल्याभल्यांचे अंदाज चुकणार... शिरूरमध्ये घड्याळ चालणार की तुतारी वाजणार?

Cannes Film Festival 2024 : कान्स फिल्म फेस्टिव्हलला मेरील स्ट्रीप यांचा सन्मान ; आईला केला पुरस्कार समर्पित

Indian Economy : भारत २०२५ पर्यंत चौथी अर्थव्यवस्था ; जी-२० शेर्पा व निती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांचा विश्वास

SCROLL FOR NEXT