Navya Naveli Nanda reaction on jaya bachchan statement to have a child without marriage  Google
मनोरंजन

Navya Naveli:लग्न न करता मुल जन्माला घालण्याच्या जया बच्चन यांच्या वक्तव्यावर नातीची प्रतिक्रिया चर्चेत

जया बच्चन यांची नात नव्या नंदा एक बिझनेस वुमन आहे. एका सेमिनार दरम्यान तिनं आजी जया बच्चन यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

प्रणाली मोरे

Navya Naveli Nanda: जया बच्चन त्या अभिनेत्रींपैकी एक आहेत ज्यांना लोकांसमोर आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायला आवडत नाही. काही दिवसांपूर्वी जया बच्चन यांनी एक वक्तव्य केलं होतं जे ऐकून सगळेच हैराण झाले होते. जया यांनी सांगितलं होतं की,त्यांची नात नव्यानं लग्न न करता मुलाला जन्म दिला तरी त्यांना काहीच हरकत नसेल. जया बच्चन यांचे हे वक्तव्य जोरदार व्हायरल झालं आणि त्यावरनं त्यांना ट्रोलही केलं गेलं. (Navya Naveli Nanda reaction on jaya bachchan statement to have a child without marriage)

आता जया यांच्या या वक्तव्यावर नात नव्यानं स्पष्टिकरण दिलं आहे. नव्यानं सांगितलं आहे की, आजीचं हे वक्तव्य मला मुळीच खटकलं नाही. ती म्हणाली,''माझा जो पॉडकास्ट आहे ज्यात मी महिलांविषयीच्या अनेक विषयांवर बोलते. महिलांच्या स्वातंत्र्याविषयी आम्ही त्यात बोलतो तेव्हा तिचं हे म्हणणं चुकीचं नाही वाटत मला''.

तिनं हे देखील म्हटलं की, तिचा एक पॉडकास्ट महिलांचं आरोग्य आणि आरोग्यशास्त्र यावर आधारित आहे. आणि अशा विषयांवर बोलताना स्पष्ट बोलणं,सहज बोलणं,हातचं न राखता बोलणं आणि योग्य-विचारपूर्वक बोलणं खूप गरजेचं आहे. आजीनं देखील तिचे स्पष्ट विचार मांडले. ज्यात मला गैर वाटत नाही.

नव्या म्हणाली,''आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण सोशल मीडियावर व्यक्त झालो की काही जण त्याला पाठिंबा देतात तर काही त्याचा विरोध करतात. आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्याला लोकांचे मनोरंजन देखील करायचे आहे'', असं नव्या म्हणाली.

नव्याविषयी बोलायचं झालं तर तिला अभिनयात मुळीच रस नाही. भले ती फिल्मी परिवारातून असली तरी तिला अभिनयात मुळीच रस नाही. तिला फक्त बिझनेस वुमन बनायचं आहे. तिला सर्व महिलांना दाखवून द्यायचं आहे की आपण उत्तम बिझनेस करू शकतो. नव्या काही एनजीओ सोबत जोडलेली आहे,जे अनेक सामाजिक मुद्द्यांवर काम करत आहेत. महिलांच्या विकासाशी संबंधित अनेक योजनांवर नव्या सध्या काम करत आहे.

नव्या अभिनय क्षेत्रात येणार नसली तरी तिचा भाऊ अगस्त्य नंदा मात्र लवकरच 'द आर्चिस' सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमातनं शाहरुखची सुहाना खान आणि श्रीदेवीची धाकटी लेक खुशी कपूर देखील बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT