neha kakkar Esakal
मनोरंजन

Neha Kakkar Birthday: चौथ्या वर्षांपासून गायन! ज्या शोमधून बाहेर काढलं त्याच शोची बनली जज..असा आहे नेहाचा जीवनप्रवास

Vaishali Patil

Happy Birthday Neha Kakkar: बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कर आज म्हणजेच 6 जून रोजी तिचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. नेहाने पंजाबी इंडस्ट्रीपासून ते हिंदी चित्रपटसृष्टीपर्यंत आपल्या गाण्याने मोहिणी पसरवली आहे.

नेहा कक्कर आज कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही. पण हे यश तिला सहजासहजी मिळाले नाही यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला. तिने तिच्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत.

नेहा ही एक सेल्फ मेड स्टार सिंगर आहे जिने इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. तिच्या सुरेल आवाजाने चाहत्यांची मने जिंकण्यासोबतच नेहा कक्कर अनेकदा सोशल मीडियावर सक्रिय राहून लाईमलाइट मिळवली आहे.

उत्तराखंडमधील ऋषिकेश मध्ये 6 जून 1988 रोजी जन्मलेल्या नेहानं चार वर्षांची असतांनाच स्थानिक मंडळं आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करण्यास सुरुवात केली. 2004 मध्ये, ती संगीतात करिअर करण्यासाठी तिचा भाऊ टोनी कक्कर यांच्यासोबत मुंबईला गेले होते.

त्यानंतर नेहाने इंडियन आयडॉलच्या दुसऱ्या सीझनसाठी ऑडिशन दिली. इंडियन आयडॉलमध्ये मात्र तिला लवकर बाहेर काढण्यात आलं, पण तिने गायिका बनण्याचे तिचे स्वप्न सोडले नाही.

त्यानंतर तिने 2008 मध्ये, तिने मीत ब्रदर्सच्या संगीतासह 'नेहा द रॉकस्टार' हा तिचा पहिला अल्बम रिलीज केला. तिचा हा अल्बम सुपरहिट ठरला.

नेहा आज भारतातील सर्वात लोकप्रिय गायकांपैकी एक आहे. तिचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत आणि त्याची गाणी YouTube आणि इतर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर लाखो वेळा स्ट्रीम केली जातात.

ती तिच्या दमदार आवाजासाठी ओळखली जाते. नेहाने 24 ऑक्टोबर 2020 रोजी पंजाबी गायक रोहनप्रीत सिंगसोबत लग्न केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT