मनोरंजन

रामाची भूमिका करणाऱ्या अरुण यांनी जेव्हा ओढली सिगारेट, त्यानंतर...

सकाळ डिजिटल टीम

रामानंद सागर व्दारा (Ramanand Sagar Ramayana) निर्मित धार्मिक मालिका रामायण ( Ramayana) सर्वांना माहिती आहे. त्याला त्यावेळी प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. 80 ते 90 च्या दशकांत या मालिकेनं चाहत्यांना आपलेसं केलं होतं. खासकरुन 90 च्या दशकात रामायण आणि महाभारत (Ramayana and Mahabharta) मालिकेनं प्रेक्षकांचं प्रबोधन केलं असं म्हटलं जातं. या मालिकेत काम करणाऱ्या कलावंतांची लोकप्रियताही नेहमीच चर्चिली जाते. रामायण मालिकेत काम करणाऱ्या वेगवेगळ्या कलाकारांची चर्चा होत असते. त्यात रामाची भूमिका करणाऱ्या अरुण गोविल (Arun Govil) यांची भूमिका त्यावेळी कमालीची गाजली होती. आज त्यांचा जन्मदिन आहे.

अरुण गोविल (Arun govil) यांनी एका मुलाखतीमध्ये आपल्याला सिगारेट (Smoking) ओढणं किती महागात पडलं होतं. हे सांगितलं होतं. त्या प्रसंगावरुन आपल्याला चाहते कशाप्रकारे फॉलो करतात. ते किती प्रेम करतात हे लक्षात आले. याची आठवण गोविल यांनी सांगितली होती. 1987 मध्ये डीडी नॅशनलवर सर्वाधिक लोकप्रिय असणारी मालिका म्हणून रामायणचे नाव घेता येईल. त्यावेळी त्या मालिकेचे दहा कोटी प्रेक्षक होते. वाल्मिकी रामायण आणि तुलसीदास यांच्या रामचरितमानसवर आधारित या मालिकेतील कलाकारांना प्रेक्षकांनी नेहमीच फॉलो केलंय.

त्या मालिकेमध्ये काम करणाऱ्या कलावंतांना लोकांनी देवाचा दर्जा बहाल केला होता. 12 जानेवारी 1958 रोजी जन्म झालेल्या अरुण गोविल यांनी त्या मालिकेमध्ये रामाची भूमिका साकारली होती. त्या मालिकेच्या शुटिंग सेटवर घडलेली गोष्ट आजही सांगितली जाते. ती म्हणजे अरुण गोविल हे कपिल शर्माच्या शो मध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी एक किस्सा शेयर केला. गोविल म्हणाले, मी तेव्हा फार सिगारेट ओढायचो. शुटिंगमध्ये जेव्हा ब्रेक मिळेल तेव्हा सिगारेट ओढायचो. एकदा लंचला जाण्यापूर्वी मला सिगारेट ओढण्यापूर्वी एकानं मला पाहिले. तो माझ्यावर चिडला होता. त्यानं मला अरेरावीच्या भाषेत सांगितलं. त्याला मी जे काही करत होतो ते आवडलं नव्हतं. आम्ही तुम्हाला देव मानतो आणि तुम्ही असं करता. ते ऐकल्यावर मी पुन्हा कधीही सिगारेट हात लावला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT