Filmmaker Ashok Pandit files complaint against Richa Chadha Google
मनोरंजन

Richa chadha: 'लष्कराचा अपमान करणाऱ्याला हा देश...',रिचा विरोधात चित्रपट निर्माते अशोक पंडितांची तक्रार

भारतीय लष्कराची खिल्ली उडवणारं ट्वीट रिचानं केल्यानंतर तिला जोरदार ट्रोल केलं जात आहे. आता फिल्ममेकर अशोक पंडितांनी तर याहून अधिक कडक पाऊल उचललं आहे.

प्रणाली मोरे

Richa chadha: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रिचा चढ्ढा हिच्या एका ट्वीटने खळबळ उडवून दिली आहे. रिचा चढ्ढानं गलवान संदर्भात एक ट्वीट केलं होतं. त्यावरून खूप वाद निर्माण झाला तसंच तिच्यावर चारही बाजूंनी टीका होत आहे. इतकंच नाही तर तिच्याविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रारही दाखल झाली आहे.(Filmmaker Ashok Pandit files complaint against Richa Chadha)

या टीकेनंतर रिचानं ते वादग्रस्त ट्वीट डिलीट केलं तसंच याप्रकरणी तिनं भारतीय लष्काराची आणि सर्व सैनिकांची माफी मागितली आहे. माफीनाम्यात रिचानं सैनिकांचा अपमान करण्याचा हेतू नसल्याचं सांगितलं. पण रिचाला हे ट्विट अंगाशी आल आहे. रिचा सोशल मीडियावरही ट्रोल झाली आहे. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी तिला चांगलेच सुनावले आहे.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

रिचा चढ्ढान गलवान संदर्भात केलेल्या टिप्पणीबद्दल अक्षय कुमार, के.के.मेनन यांनी नाराजगी व्यक्त केली. रिचाला खडेबोल सुनावले .तर चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी गुरुवारी रिचा चढ्ढा विरुद्ध मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि तिच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची विनंती केली. बॉलिवूड सेलिब्रिटींना बोलण्याचे आवाहन केले आहे.

अशोक पंडित यांनी म्हटले आहे की, 'एक जबाबदार नागरिक स्वतःला म्हणवून घेत आपल्या सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ करण्याची आणि त्यांची खिल्ली उडवण्याची ही वृत्ती चांगली नाही. जेव्हा मी ट्वीट वाचले तेव्हा एखाद्या जवानाचा जेव्हा मृतदेह त्याच्या कुटुंबाच्या समोर येतो... आणि तेव्हा जी परिस्थिती असते... रडणे, ओरडणे आणि किंचाळणे... हे सारं दृश्य माझ्या नजरेसमोर आलं. तुम्ही सेलिब्रेटी आहात म्हणून जवानांची खिल्ली उडवू शकत नाही, ते जवान देशाचे संरक्षण करतात म्हणून आपण जिवंत आहोत. तुम्ही त्यांची चेष्टा करू शकत नाही" . अशोक पंडित यांनी ट्वीटरवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपलं ट्वीट टॅग केलं आहे.

इतकेच नव्हे तर अशोक पंडित यांनी रिचा चढ्ढाला बॉलीवूडमधून बॉयकॉट करा ही मागणी केली आहे. रिचाने भले माफी मागितली पण ती आता पळून जाऊ शकत नाही,असं देखील ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तीचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नाही, पण मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; IMDने दिला इशारा

Crime News: अमेरिकेतील डल्लासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; हैदराबादच्या चंद्रशेखर पोलच्या मृत्यूने भारतात हळहळ

Latest Marathi News Live Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहिल्यानगर दौऱ्यावर

Sakal Premier League : 5 नोव्हेंबरपासून 'सकाळ प्रिमिअर लीग'चा थरार; विजेत्या संघाला तीन लाखांचा पुरस्कार, ३२ संघ होणार सहभागी

PMC Elections : कोठे तक्रारींची दखल; कोठे राजकीय सोय, अंतिम प्रभागरचना जाहीर; इच्छुकांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे

SCROLL FOR NEXT