Taarak Mehta ka Ooltah Chashmah Producer Asit Modi On New Contract Google
मनोरंजन

Taarak Mehta:निर्मात्याने बनवलं नवं कॉन्ट्रॅक्ट, यामुळे कलाकार मात्र अडचणीत

गेल्या काही दिवसांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधून अनेक बड्या कलाकारांच्या एक्झिटनं मालिका जोरदार चर्चेत आहे.

प्रणाली मोरे

Taarak Mehta Ka Ooltah chashmah: गेल्या १४ वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेत दयाबेन(Dayaben) या भूमिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या दिशा वकानीनं कधीच शो ला रामराम ठोकला आहे. पण तारक मेहता मालिकेच्या टीआरपीचा ग्राफ मात्र चढाच राहिला आहे. मात्र तारक मेहतामधून एका मागोमाग होणाऱ्या कलाकारांच्या एक्झिटमुळे मालिका अडचणीत आहे हे देखील नाकारता येता येणार नाही.(Taarak Mehta ka Ooltah Chashmah Producer Asit Modi On New Contract)

कलाकार मालिका सोडतायत म्हणून आता निर्माते असित मादी यांनी स्टाकास्टसाठी एक नवं कॉन्ट्रॅक्ट बनवलं आहे. या कॉन्ट्रॅक्टची गरज का भासली आणि हे का योग्य आहे यासंदर्भात आता निर्माता असित मोदी यांनी स्पष्टिकरण दिलं आहे.

एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत असित मोदी म्हणाले आहेत की,''प्रेक्षकांनी मालिकेला भरभरुन प्रेम दिलं, कारण यातील व्यक्तिरेखा या एक्सक्लुसिव्ह होत्या. त्यातील कलाकार इतर कुठे लोकांना दिसत नव्हते. आता या मालिकेतील कलाकार जर इतर ठिकाणी काम करु लागतील तर अर्थातच मालिकेचं महत्त्व कमी होणार प्रेक्षकांमध्ये. जेव्हा कोणी कलाकार मालिका सोडण्याचा निर्णय घेतं तेव्हा खरंतर मनाला खूप दुःख होतं. कारण आमच हे एक कुटुंब आहे. मी त्या कलाकारांना मालिकेसाठी निवडलं आहे. मी त्यांच्या अडचणींना नेहमीच समजून घेण्याचा प्रयत्न केला. हा एक प्रवास आहे,यामध्ये कोणीतरी मधनंच बाहेर पडेल असं होऊ शकतं''.

''मी कोणत्याही कारणामुळे मालिकेला अडचण होईल असं कधीच काही केलं नाही. मला फक्त एवढंच वाटतं सगळ्यांनी एकत्र रहावं आणि यश एन्जॉय करावं. पण जर का कुणाला शो सोडायचाच असेल तर आता त्यात मी काय करू शकतो? लोकांनी या मालिकेतील कलाकारांना खूप प्रेम दिलं आहे,त्यामुळे ते जेव्हा मालिका सोडतात तेव्हा अर्थातच प्रेक्षकही दुःखी होणारच. प्रेक्षक मला देखील मेसेज करतात, चालू असलेल्या सर्व गोष्टींविषयी चौकशी करतात,त्यांची नाराजगी जाहीर करतात''. असित मोदींच्या नव्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काही असे नियम आहेत ज्यामुळे कलाकार मात्र अडचणीत येण्याचे संकेत मिळत आहेत.

दिशा वकानीनंतर आता तारक मेहताची भूमिका साकारणारे शैलेश लोढा यांनी देखील मालिका सोडली आहे. अद्याप याविषयी अधिकृतरित्या काहीही बोललं गेलेलं नाही. शैलेश लोढा आता 'वाह भाई वाह' या शो मध्ये दिसत आहेत. शैलेश लोढा यांच्या एक्झिटविषयी बोलताना मोदी म्हणाले की, ''कोणाच्या जाण्यानं मालिका थांबणार नाही. जुने कलाकार परत आले तर त्यांचे स्वागतच आहे पण नाही आले तरी नवीन तारक मेहता नक्कीच येतील''.

आता या सगळ्या कलाकार-निर्मात्यांच्या वादात प्रेक्षकांची मात्र उगाचच फरफट होतेय. आतापर्यंत दयाबेन मालिकेत दिसत नाही म्हणून प्रेक्षक नाराज होते. आता तारकही गायब झाल्याने त्यांची नाराजगी अधिक वाढली आहे. आणि मालिकेविषयी सर्वच चिंता व्यक्त करताना दिसत आहेत. त्यात आता निर्मात्यांच्या नव्या कॉन्ट्रॅक्टमुळे काम करत असलेले आणि मालिकेत नव्याने येणाऱ्या कलाकार मात्र अडचणीत येणार हे चित्र स्पष्ट झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT