jennifer mistry bansiwal accused producer asit modi of sexual harassment Instagram
मनोरंजन

'Taarak Mehta..' मालिकेच्या निर्मात्यावर लैंगिक शोषणाचा आरोप, अभिनेत्री म्हणाली,'७ मार्च रोजी सेटवर..'

'मिसेस सोढी' ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बंसीवालनं शो चे निर्माते असित मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.

प्रणाली मोरे

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या मालिकेत रोशन सिंग सोढी च्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्रीनं हैराण करणारा खुलासा केला आहे.

'मिसेस सोढी' ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बंसीवालनं शो चे निर्माते असित मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. अभिनेत्रीनं असित कुमार मोदी व्यतिरिक्त प्रोजेक्ट हेड सोहल रमानी आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर जतिन बजाजच्या विरोधात लैंगिक शोषणाचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.

ई-टाईम्सला मिळालेल्या माहितीनुसार, जेनिफर मिस्त्रीनं गेल्या दोन महिन्यांपासून शूटिंग थांबवलं होतं. ती शेवटची ७ मार्चला शूटिंगसाठी सेटवर पोहोचली होती.

सूत्रांनी सांगितलं की सोहेल आणि जतिन बजाजनं अभिनेत्रीचा अपमान केला होता त्यानंतर ती सेटवरनं निघून गेली होती. जेव्हा अभिनेत्रीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा तिनं कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

पण एक गोष्ट मात्र तिनं सांगितली की,'' मी आता मालिका सोडली आहे. माझा अखेरचा भाग ६ मार्च रोजी प्रसारित झाला होता. प्रोजेक्ट हेड सोहेल रमानी आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर जतिन बजाजनं मला अपमानित केलं होतं''.(Taarak Mehta mrs sodhi quit show after 15 years jennifer mistry bansiwal accused producer asit modi of sexual harassment)

jennifer mistry bansiwal accused producer asit modi of sexual harassment

'तारक मेहता..'च्या 'मिसेस सोढी' हिनं सांगितलं की,'' होळीच्या सणादिवशी तिची अॅनिव्हर्सरी होती. तो दिवस ७ मार्च होता. त्याचदिवशी ही घटना झाली. मी सुट्टीसाठी अनेकदा विचारणा केली. पण मला ते जाऊच देत नव्हते. सोहेलनं माझ्या गाडीला जबरदस्तीनं थांबवलं. मी त्यांना म्हटलं देखील की मी १५ वर्ष या शो मध्ये काम केलं आहे,ते माझ्यासोबत असं करू शकत नाहीत. त्यानंतर सोहेलनं मला धमकी दिली. मी असित कुमार मोदी, सोहेल रमानी आणि जतिन बजाज विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे''.

मी आधीच टीमला सांगितलं होतं की, ''माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि मी हाफ डे घेऊन घरी जाणार आहे, माझी मुलगी देखील होळी सेलिब्रेशनसाठी माझी वाट पाहत आहे. पण निर्मात्यांनी मला घरी जाऊ दिलं नाही, मी असं देखील म्हटलं की दोन तासाचा ब्रेक घेऊन मी परत शूटवर येईन. पण त्यांनी ऐकलं नाही''.

'' ते नेहमी मेल अॅक्टर्सला सगळ्याबाबतीत अॅडजस्ट करतात. या शो मध्ये पुरुषप्रधान संस्कृती अनेकदा दिसून येते. जतिननं दोखील माझी कार थांबवण्याचा प्रयत्न केला. हे सगळं सीसीटीव्ही फूटेजमध्ये बंदिस्त आहे. ही घटना ७ मार्चची आहे. मला वाटलं हे लोक मला कॉल करतील. पण २४ मार्च रोजी सोहेलनं मला नाटीस पाठवली की मी मालिका सोडली होती म्हणून ते माझे पैसे कापत आहेत. त्यांनी मला घाबरवलं देखील''.

जेनिफर मिस्त्री बंसीवाल पुढे म्हणाली की,'' ४ एप्रिलला मी त्यांना व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून उत्तर दिलं की माझं लैंगिक शोषण झालं आहे. मी एक ड्राफ्ट पाठवला आणि त्याचं उत्तर देत ते म्हणाले,मी त्यांच्याविरोधात हे सगळं पैशासाठी करत आहे''.

''मी त्यादिवशीच निर्णय घेतला की आता यांनी माझी सर्वांसमोर माफी मागावी. मी यासाठी वकीलाची मदत घेतली आहे. ८ एप्रिलला मी असित मोदी,सोहेल रमानी ,जतिन बजाजला नोटीस पाठवली. मला यावर अद्याप कोणंतच उत्तर मिळालं नाही. पण मला विश्वास आहे की ते आता माझे वकील यात लक्ष घालतील आणि प्रकरणाचा योग्य तपास कायद्याच्या मदतीनं करतील''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT