The Boogeyman Horror Movie Esakal
मनोरंजन

Hollywood Movie: अर्ध्या रात्री एकट्याने पाहून दाखवाच..! आगामी हॉलिवूड सिनेमासाठी थिएटरवाल्यांनी दिलं चॅलेंज..

हे झालं हॉलीवूडचं..आपल्या राम गोपाल वर्मानं देखील १३ वर्षांपूर्वी त्याच्या 'फूंक' सिनेमा संदर्भात अशीच एक मोठी घोषणा केली आहे.

प्रणाली मोरे

The Boogeyman Horror Movie: हॉरर सिनेमांना जगभरात मोठी डीमांड आहे. भीतीदायक गोष्टीतही मनोरंजन शोधणाऱ्या लोकांच्या लिस्टमध्ये हॉरर सिनेमे वरच्या क्रमांकावर असतात.

सिनेनिर्मितीत हा एक लोकप्रिय जॉनर मानला जातो. आणि जगभरात जेवढ्या फिल्म इंडस्ट्रीज आहेत तिथे एकापेक्षा एक भीतीदायक सिनेमे बनवले जातात.(The Boogeyman dare to watch it alone challenge by pvr cinema)

काही सिनेमे तर असे आले आहेत ज्यांना एकट्यानं पाहणं कठीणच आहे. भीतीचा हाच थरारक अनुभव घेण्यासाठी अनेकदा थिएटरवाले या सिनेमांना पाहण्यासाठी बक्षिसाची घोषणा करतात,ज्यानं सिनेमाची लोकप्रियता देखील वाढते.

हॉलीवूडचा हॉरर सिनेमा 'द बूगीमॅन' २ जूनला सिनेमागृहात भेटीस येत आहे. या सिनेमाच्या प्रचारासाठी पीवीआर मल्टिप्लेक्सवाल्यांनी एक अनोखी कॉन्टेस्ट Dare To Watch Alone ची घोषणा केली आहे.

याअंतर्गत क़ॉन्टेस्टमध्ये भाग घेणाऱ्यांनी अर्ध्या रात्री हा सिनेमा एकट्यानं पाहून दाखवण्याची घोषणा केली आहे आणि जिंकणाऱ्यासाठी बक्षिसाची देखील घोषणा केली आहे.

पीवीआर सिनेमाच्या ट्वीटर हॅंडलवरुन जारी केलेल्या पोस्टनुसार ,प्रेक्षकांना या ट्वीटच्या कमेंटमध्ये 'द बूगीमॅन' एकट्यानं का पहायचा आहे? याविषयी लिहायचं आहे. ज्याचं उत्तर परिक्षकांचे मन जिंकेल तो सिनेमागृहात एकट्यानं सिनेमा पाहणार आहे. अर्थात काही अटी देखील आहेत ज्याचं पालन करावं लागेल.

सिनेमा शेवटपर्यंत जो पाहील त्याला पाच हजार रुपयाचं वाउचर दिलं जाईल. या कॉन्टेस्टमध्ये भाग घेण्यासाठी इच्छूक असणाऱ्यांनी पीवीआर सिनेमाजच्या ट्वीटर हॅंडलवर दिलेल्या अटींना मात्र नीट वाचून घ्या.

सुपरनॅचुरल हॉरर सिनेना 'द बूगीमॅन'चं दिग्दर्शन रॉब सैवेजनं केलं आहे. सिनेमात सोफी थॅचर,क्रिस मेसिना,विवियन लायरा ब्लेयर आणि डेव्हिड डॅस्टमॅल्कियन यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. सिनेमा ९९ मिनिटाचा आहे. हा सिनेमा १९७३ मध्ये आलेल्या स्टीफन किंगच्या शॉर्ट स्टोरीवर आधारित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

Ashadhi Wari: पंढरपूरला चातुर्मासात रोज कीर्तनाची साडेतीनशे वर्षांची परंपरा

Flight Cancelled : तीन तासांची प्रतीक्षा अन् विमान रद्द

SCROLL FOR NEXT