Vijay Sethupathi to play the villain in Allu Arjun’s Pushpa 2? Google
मनोरंजन

'पुष्पा 2' नं टाकला सुटकेचा निश्वास,मिळाला हवा तो खलनायक,वाचा सविस्तर

2022 च्या ऑगस्ट महिन्यापासून 'पुष्पा 2' च्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याचं बोललं जात आहे.

प्रणाली मोरे

अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) सुपरहिट 'पुष्पा'(Pushpa) सिनेमाच्या सीक्वेलची लोक मनापासून वाट पाहत आहेत. आता सिनेमासंदर्भात नवीन अपडेट समोर येत आहे. जी ऐकल्यावर चाहत्यांचा उत्साह दुपटीनं वाढणार आहे. 'पुष्पा-द राइज' सिनेमात अल्लू अर्जूनच्या डॅशिंग अंदाजावर चाहते खूश होतेच पण दुसऱ्या भागात म्हणजे मध्यांतरानंतर फहाद फाजिलच्या एन्ट्रीनंतर थिएटरात जणू वीजा चमकायला लागल्या होत्या.(Vijay Sethupathi to play the villain in Allu Arjun’s Pushpa 2?)

आता बातमी आहे की सिनेमाच्या सीक्वेलमध्ये 'पुष्पा- द रूल' मध्ये फहाज फाजिल ऐवजी अल्लू अर्जूनचं जगणं मुश्किल करायला नवीन व्यक्तीरेखा आणली जात आहे, यासाठी निर्मात्यांनी डेंजर विजय सेतुपतिला(Vijay Sethupathi) संपर्क साधला आहे.

'पुष्पा 2' च्या निर्मात्यांनी दमदार अभिनेता विजय सेतुपतिला खलनायक साकारण्यासाठी ऑफर दिली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला मिळालेल्या माहितीनुसार विजयने या ऑफरला मान्य केले आहे आणि आता अल्लु अर्जुन समोर एक खतरनाक व्हिलन बनून उभा राहणार आहे. 'पुष्पा' च्या पहिल्या भागावेळी देखील निर्मात्यांनी विजयशी एका व्यक्तीरेखेसाठी संपर्क साधला होता. विजयला ती भूमिका आवडली देखील होती पण तारखांचे गणित जुळले नसल्या कारणाने तेव्हा काम करणं शक्य झालं नव्हतं.पण पुष्पाच्या सीक्वेलसाठी मात्र निर्मात्यांनी ज्या तारखा मागितल्या आहेत त्या विजयनं दिल्या आहेत.

पुष्पाचे दिग्दर्शक सुकुमार सिनेमाच्या स्कीप्टला आणखी कसं रंगवता येईल याच्यावर मेहनत घेत आहे. सीक्वेल आधीच्या भागापेक्षा दमदार व्हावा म्हणून टीमचे प्रयत्न सुरू आहेत. माहितीनुसार या वर्षात ऑगस्ट महिन्यात 'पुष्पा 2' चे शूटिंग सुरू होत आहे. सिनेमाचं पहिलं शेड्युल 6 महिन्यांपेक्षा अधिक दिवस सुरू राहणार असल्याचं बोललं जात आहे.

Vijay Sethupathi to be part of Allu Arjun's Pushpa 2? Deets inside

सिनेमातील अॅक्शन सीक्वेन्स हे आतापर्यंतच्या भारतीय सिनेमातील महागड्या अॅक्शन सीक्वेन्समध्ये गणले जाणार असल्याची बातमी आहे. 2023 मध्ये ऑक्टोबरनंतर सिनेमा प्रदर्शित केला जाईल. अल्लू अर्जुन,रश्मिका मंदाना,फहाद फाजिल यांच्या भूमिका असलेला 'पुष्पा-द राइज' 17 डिसेंबर 2021 रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमानं जगभरात 350 करोडपेक्षा अधिक कमाई बॉक्सऑफिसवर केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: उजनी धरणातून विसर्ग वाढविला, भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT