When Karan Johar revealed Kajol’s massive crush on Akshay Kumar Google
मनोरंजन

Kajol Birthday: करण जोहरने केली काजोलची पोलखोल; म्हणाला,'अक्षयसाठी हिने...'

९० च्या दशकातील सुपरहिट अभिनेत्री काजोल आज आपला ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे.

प्रणाली मोरे

Kajol Birthday: ९० च्या दशकातील सुपरहिट अभिनेत्री काजोल(Kajol) आज आपला ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. काजोल गेल्या तीन दशकांपासून सिनेइंडस्ट्रीशी जोडलेली आहे. आणि या दरम्यान तिनं बॉलीवूडच्या जवळपास सगळ्याच अभिनेत्यांसोबत काम केले आहे. खूप कमी लोकांना माहित आहे की, ९० च्या दशकात काजोल देखील त्या अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये सामिल होती,ज्या सर्व अक्षय कुमारच्या(Akshay Kumar) प्रेमात वेड्या होत्या.(When Karan Johar revealed Kajol’s massive crush on Akshay Kumar)

काजोलनं आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात १९९२ साली 'बेखुदी' सिनेमापातून केली होती. या सिनेमात ती केवळ १६ वर्षांची होती. काजोल ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची मोठी कन्या आहे. 'बेखुदी' सिनेमानंतर काजोलने शाहरुख आणि शिल्पा शेट्टीसोबत 'बाजीगर' हा सिनेमा केला. या सिनेमानं रातोरात काजोलला स्टार बनवलं. त्याच दरम्यान काजोलचा करिअर ग्राफ जसजसा वर चढत होता,तसतसं अक्षय कुमारविषयीचं तिचं प्रेमही वाढत होतं.

अक्षय कुमार हा हॅन्डसम,टॉल कॅटॅगरीत मोडणारा अभिनेता. त्याच्यासाठी आजही मुली तितक्याच वेड्या होताना दिसतात. आता त्यात काजोल देखील होती हे अनेकांना माहित नसावं बहुधा. काजोल विषयी बोलायचं झालं तर ती अक्षयच्या प्रेमात एकेकाळी इतकी वेडी झाली होती की एखाद्या पार्टीत केवळ अक्षय येणार म्हणून ती जायची आणि संपू्र्ण पार्टीत त्याच्या पाठी-पाठी असायची.

द कपिल शर्मा शो मध्ये निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने काजोलच्या या गुपिताचा सर्वांसमोर खुलासा केला होता. करणने सांगितले होते, एकेकाळी अक्षय कुमार काजोलचा क्रश होता. एका पार्टीत ती अक्षय कुमारला शोधत होती,आणि तिची माझ्याशी टक्कर झाली. तेव्हा तिनं फारशी ओळख नसताना,त्याच पार्टीत आम्ही देखील पहिल्यांदा भेटलेले असताना तिनं मला घेऊन संपूर्ण पार्टीभर त्याचा शोध घेतला. तो तर तिथे आम्हाला भेटला नाही पण आमच्या दोघांत मात्र त्या दिवसानंतर एकदम चांगली गट्टी झाली,ती अगदी आजतागायत कायम आहे.

याआधी करण आणि काजोल एका पार्टीत भेटले होते,तेव्हा करणनं थ्री पीस सूट घातला होता म्हणून काजोलनं त्याची खूप खिल्ली उडवल्याचं देखील तो म्हणाला होता. तेव्हा काजोलमुळे करणला स्वतःची इतकी लाज वाटू लागली की तो ती पार्टी सोडून निघून गेला होता.

काजोलने यशराज बॅनर अंतर्गत बनलेल्या 'ये दिल्लगी' सिनेमात अक्षय कुमारसोबत काम केले आहे. सिनेमा फारसा चालला नव्हता पण त्यातील गाणी मात्र हिट झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT