Who is Coke Studio fame kana yaari wahab ali bugti,not in good condition in his own country pakistan...read Google
मनोरंजन

पाकिस्तानी गायक वहाब अली बुगती,आपल्याच देशात ज्याचं आयुष्य होत्याचं नव्हतं झालं

पाकिस्तानचा प्रसिद्ध गायक वहाब अली बुगतीच्या आवाजाची चर्चा जगभरात होत आहे. यु ट्युबवर त्यानं पोस्ट केलेल्या व्हिडीओचे असंख्य चाहते आहेत.

प्रणाली मोरे

Pakistani SInger wahab ali bugti: पाकिस्तानचा प्रसिद्ध गायक वहाब अली बुगतीच्या आवाजाची सध्या जगभरात चर्चा होत आहे. आपल्या दमदार आवाजानं लोकांना वेड लावणाऱ्या वहाब अली बुगतीची सध्याची अवस्था मात्र फारशी काही ठीक नाही. पाकिस्तानात आलेल्या पुरामुळं सध्या त्याला स्वतःचं घर सोडून रहावं लागत आहे.(Who is Coke Studio fame kana yaari wahab ali bugti,not in good condition in his own country pakistan...read)

वहाबचे चाहते सोशल मीडियावर लोकांकडे त्याच्यासाठी मदतीचं आवाहन करत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का एक सर्वसाधारण व्यक्ती ते स्टारपदापर्यंतचा प्रवास वहाबसाठी सोपा नव्हता. वहाब अली बुगती एक बलुची पाकिस्तानी गायक आहे. २०२२ मध्ये वहाब प्रसिद्ध पाकिस्तानी टी.व्ही सीरिज Coke Studio मध्ये दिसला होता. कोक स्टुडिओत परफॉर्म केल्यानंतर वहाब चर्चेत आला होता. त्यानं शो मध्ये 'काना यारी' हे गाणं गाऊन प्रत्येकाला वेड लावलं होतं.

वहाब गेल्या अनेक वर्षांपासून संगीताशी जोडला गेलेला आहे. त्याचा एक गाण्याचा ग्रुप आहे. कितीतरी गायक वहाबसोबत गातात. संगीताच्या दुनियेत आपली ओळख बनवण्यासाठी त्याला खूप मेहनत करावी लागली. वहाब जेव्हा प्रोफेशनल रकॉर्डिंग स्टूडिओपर्यंत पोहोचू शकला नाही तेव्हा त्यानं ट्रे़डिशनल इन्स्ट्रुमेंट्स वाजवून गाणं गायला सुरुवात केली. ते सगळेच आता ट्रेडिशनल इन्स्ट्रुमेंट्सच्या तालावरच गातात. वहाब याचे कितीतरी म्युझिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

वहाबचे स्वतःचे एक युट्युब चॅनल आहे. युट्यूब चॅनलवर वहाब आपले म्युझिक व्हिडीओ अपलोड करत असतो. पण एक गायक म्हणून त्याला खरी ओळख ही कोक स्टुडिओत गाऊन मिळाली.

वहाब सध्या कठीण प्रसंगातून जात आहे,कारण पाकिस्तानात अनेक ठिकाणी पुरानं थैमान घातलं आहे. ज्यात एक विभाग असा आहे जिथे वहाब अली राहतो. नसीराबाद हे ठिकाण सध्या पुरानं वेढलं आहे. वहाबचं आयुष्य जे व्यवस्थित सुरू होतं,पण अचानक आलेल्या पुरान सगळंच उद्धव्स्त झालं आहे. पुराच्या वाढणाऱ्या पाण्यानं लोकांची घरं वाहून गेलीयत. एका क्षणात वहाबला कुटुंबासोबत आपलं राहतं घर सोडावं लागलं.

वहाब अली नसीराबाद,बलुचिस्तान,पाकिस्तान इथं राहणारा आहे. त्याचे शिक्षण हे सरकारी शाळेतून झाले आहे. कॉलेजचं शिक्षण त्यानं बलुचिस्तानच्या युनिव्हर्सिटीतून केलं आहे. वहाबचं लग्न झालं असून,त्याला एक मुलगा देखील आहे. मुलाचे नाव समीर खान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Emergency quota : रेल्वेचा मोठा निर्णय!, ‘अमृत भारत’ अन् ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनमध्ये आता ‘इमर्जन्सी कोटा‘

सोलापूर महापालिकेत ‘स्वीकृत’साठी ‘या’ पदाधिकाऱ्यांना संधी! जागा ९ अन्‌ इच्छुक ५६७; २० फेब्रुवारीला पहिल्या सर्वसाधारण सभेत होणार घोषणा, वाचा...

Pune News : पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची धडक कारवाई; दोन बांगलादेशी महिला ताब्यात

Pune Cyber Crime : सायबर चोरट्यांमध्ये भाजी विक्रेत्यांपासून उच्चशिक्षित बेरोजगार; ज्येष्ठाची २२ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरण, आणखी चौघांना अटक

Maha Shivratri Shivling Puja : महाशिवरात्री निमित्त हिंदू पक्षाला मोठा दिलासा! ; दर्ग्याच्या आतील शिवलिंगाची पूजा करण्यास न्यायालयाची परवानगी

SCROLL FOR NEXT