zoo aurangabad.jpg
zoo aurangabad.jpg 
छत्रपती संभाजीनगर

अन्यथा, औरंगाबादचे प्राणिसंग्रहालय बंद

माधव इतबारे

औरंगाबाद : केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या आदेशानुसार महापालिकेने सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालयात प्राण्यांसाठी नैसर्गिक वातावरण तयार करणे, पिंजऱ्यांची दुरुस्ती करणे अशी कामे हाती घेतली होती. मात्र, कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनचा फटका या कामांना बसला. आता परिस्थिती पूर्वपदावर आली असल्याने ही कामे तातडीने सुरू करण्यात यावीत, असे आदेश महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी (ता.२७) आढावा बैठकीत दिले. 

प्राण्यांसाठी नैसर्गिक वातावरण तयार करा, पिंजऱ्यांची रचना बदला यासह इतर सूचना केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकतरणानाने वर्षभरापूर्वी महापालिकेला केल्या होत्या मात्र वर्षभराची मुदत संपली तरी कामे पूर्ण झालेली नाहीत. लॉकडानच्या काळात दुरुस्तीची कामे करता आली नाही. जी काही कामे सुरू केली होती, तीही संथगतीने सुरू होती. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने या कामांना गती देण्याचे आदेश श्री. पांडेय यांनी मंगळवारी आढावा बैठकीत दिले.

वाघांचा आणि बिबटांच्या पिंजऱ्यात लाकडी किंवा सिमेंटचे फेरोक्रीट मचान बनविणे, वसुंधरा चित्रपटगृह दुरुस्ती करणे, परिसर सौंदर्यकरण व रंगरंगोटी, चित्रपटगृह चालू करणे, प्राणिसंग्रहालयातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती करणे, प्राणी वाहतूक करण्यासाठी नवीन पिंजरे तयार करणे, विविध प्राण्यांचे पिंजरे दुरुस्त करणे, परिसराची रंगरंगोटी अशा १८ कामांचा आढावा घेतला व सर्व कामे गतीने पूर्ण करण्याचे आदेश दिले. बैठकीला अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, मुख्य लेखाधिकारी संजय पवार, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, प्राणिसंग्रहालय संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे, अभियंता चांडक यांची उपस्थिती होती. 

...अन्यथा औरंगाबादचे प्राणिसंग्रहालय होऊ शकते बंद 
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने वारंवार सूचना करूनही दुरुस्तीची कामे न केल्याने प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द केली होती. तत्कालीन पदाधिकारी, खासदार आणि आयुक्‍तांनी विनंती केल्यानंतर प्राधिकरणाने दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यासाठी एक वर्षांचा वेळ दिला होता. वर्षभरात दुरुस्तीची कामे झाली नाही तर प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द केली जाईल, असे प्राधिकरणाने बजावले होते. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT