sagar salunke.jpg
sagar salunke.jpg 
छत्रपती संभाजीनगर

एनएसयुआयच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत औरंगाबादला मिळाले स्थान

अतुल पाटील

औरंगाबाद : एनएसयुआयच्या (नॅशनल स्टूडटस यूनियन ऑफ इंडिया) राष्ट्रीय समन्वयकपदी येथील सागर कैलास साळुंके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर मराठवाडा विभागातून नियुक्ती होणारे सागर साळुंके हे एकमेव आहेत.

विद्यार्थी काँग्रेसची राष्ट्रीय समन्वयकपदाची यादी नुकतीच घोषीत करण्यात आली. यामध्ये विद्यार्थी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष श्री. साळुंके यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी यापूर्वी औरंगाबाद एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडलेली आहे. सागर साळुंके यांनी उभे केलेले युवकांचे मोठे संघटन, आतापर्यंत केलेल्या त्यांच्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर नव्याने ही जबाबदारी सोपवली आहे. 

सागर यांनी गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आंदोलने केलेली आहेत. लॉकडाऊनच्या काळात पायी जाणाऱ्या कामगारांना जेवण उपलब्ध करुन देण्यासोबतच त्यांच्या गावी नेऊन सोडण्याचे काम केले आहे. नियुक्तीबद्दल किरण पाटील डोणगावकर, मानस पगार, डॉ. अमर जाधव, जिंदा सांडभोर, अजय रणनवरे, रोहित बनकर, आकाश बारहाते पाटील, प्रथमेश देशपांडे, ओंकार मुखेकर, अभिषेक शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT