Hingoli Political News esakal
मराठवाडा

हिंगोली जिल्ह्याचे पाणी इतरत्र वळवू देणार नाही, सिंचन संघर्ष समितीचा इशारा

हिंगोली जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष दूर करावा, सापळी धरण रद्द करावे.

संजय कापसे

कळमनुरी (जि.हिंगोली) : हिंगोली जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष दूर करावा, सापळी धरण रद्द करावे, सिंचना करिता कयाधू नदीवर (Kayadhu River) प्रस्तावित करण्यात आलेले बंधारे बांधावे कयाधू नदीचे पाणी पळविण्याचा प्रयत्न हाणून पाडू यासह इतर मागण्यांसाठी जिल्हा सिंचन संघर्ष समितीच्या (Hinogli) वतीने रविवारी (ता.दोन) ट्रॅक्टर मोर्चा काढून प्रशासनाला अल्टिमेटम देण्यात आला. संघर्ष समितीचे अध्यक्ष माजी खासदार अॅड शिवाजी माने, आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar), माजी आमदार गजानन घुगे, दतराव अडकिने, उत्तमराव शिंदे, दिलीप चव्हाण, मनोज आखरे, राम कदम, संजय बोंढारे, नंदकिशोर तोष्णीवाल, शिवाजी शिंदे, संजय कावडे, कृष्णा पाटील, राजेश्वर पतंगे, मारुती पवार यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी झाले होते.तसेच मोर्चामध्ये कोंढुर, डिग्रस, सापळी, सालेगाव, नांदापूर, धांवडा, बेलथर, गोरलेगाव, वडगाव, येलकी, पाळोदी, माळेगाव ,बाळापुर ,शेवाळा,  येगाव, रेडगाव या गावासह नदीकाठावरील गावांमधील शेतकरी ट्रॅक्टर घेऊन मोर्चामध्ये सहभागी झाले होते. (Do Not Move Hingoli District's Water To Another Place, Sinchan Sangharsh Samiti Warned)

यावेळी माने यांनी कयाधू नदीचे पाणी पळविण्याचा प्रयत्न कदापी यशस्वी होऊ देणार नाही. त्या करिता आवश्यकता पडल्यास मोठा लोक लढा उभारण्याचे सूतोवाच केले, तर माजी आमदार गजानन घुगे यांनी जिल्ह्याच्या सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी राज्यपालांनी अध्यादेश काढून सुद्धा सिंचनाचे प्रश्न मार्गी लागत नसल्याचे सांगितले. आमदार संतोष बांगर यांनी जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक तो पाठपुरावा करून या प्रश्नी आपण तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत उभे राहणार असल्याचे सांगितले.

दिलीप चव्हाण यांनी जिल्ह्याचा सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी सिंचनाची रखडलेली कामे पूर्णत्वास नेऊन हक्काचे पाणी इतरत्र वळवु देणार नाही असे सांगितले. दरम्यान सिंचनाच्या प्रश्नावर मागणी केलेल्या प्रश्नावर येत्या २६ जानेवारी पर्यंत शासनाने योग्य तो निर्णय न घेतल्यास जिल्ह्याच्या ठिकाणी ट्रॅक्टर मोर्चाकडून अधिकारी व मंत्र्यांना घेराव घालणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs SAW, 1st T20I: जेमिमाह रोड्रिग्सचं शानदार अर्धशतक, स्मृती मानधनाचीही मिळाली साथ; भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

Accident News:'अपघातात आर्टिकामधील तिघे ठार तर दोन जखमी'; धरणगाव-धुपेश्वर रोडवरील घटना, चालकाचे नियंत्रण सुटल अन्..

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 : राज्यात कुठं कुणाचा नगराध्यक्ष? दिवसभरातील निकालासंदर्भातील घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Jejuri Fire Incident Video : निवडणुकीच्या विजय जल्लोषादरम्यान मोठी आग; दोन नवनिर्वाचित नगरसेवक भाजले, अनेक लोक जखमी, जेजूरीतील धक्कादायक Video समोर...

Gadchiroli Municipal Result: गडचिरोलीत काँग्रेस उमेदवाराचा अवघ्या 'एका' मताने विजय; पराभूत मांडवगडेंचा निकालावर आक्षेप!

SCROLL FOR NEXT