HEMNAT KOTALKAR.jpg 
मराठवाडा

GOOD NEWS : मराठवाड्याचा सन्मान; लातूरचे हेमंत कोटलवार चेक गणराज्यचे नवे राजदूत

हरी तुगावकर

लातूर : भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने युरोपमधील चेक गणराज्यचे (चेक रिपब्लिक) या देशासाठी भारताचे राजदूत म्हणून लातूरचे सुपूत्र हेमंत हरिश्चंद्र कोटलवार यांची नियुक्ती केली आहे. सध्या ते राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत सहसचिव म्हणून कार्यरत आहेत. युरोपीय देशात भारतीय राजदूत म्हणून त्यांच्या रुपाने मराठवाड्याला पहिल्यांदा मान मिळाला आहे.

श्री. कोटलवार हे १९९६ चे आयएफएस अधिकार आहेत. त्यांनी आतापर्यंत विविध देशात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. या पूर्वी त्यांनी सौदी अरेबियाचे उपराजदूत म्हणून काम केलेले आहे. तसेच जागतिक व्यापार संघटनमध्येही त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. विदेश मंत्रालयात अनेक महत्वाच्या पदावरही त्यांनी काम केलेले आहे. या कामाची दखल घेवून केंद्र शासनाने त्यांची चेक रिपब्लिक देशासाठी भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे.

केंद्र शासनाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या महत्वाच्या विविध देशाशी झालेल्या कराराच्या यशस्वीतेसाठी हेमंत कोटलवार यांची भूमिका महत्वाची ठरली आहे. जागतिक व्यापार संघटन (जिनेव्हा) येथे भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात भारतास प्राप्त झालेली जागतिक अनुकुलता यात त्याचा मोठा सहभाग राहिला आहे. मुंबई येथील पासपोर्ट कार्यालयात पासपोर्ट अधिकारी म्हणून काम करीत असताना भारतात पारपत्र वितरीत करण्याची प्रणाली ऑनलाईन करून त्यांनी भ्रष्टाचार नष्ट करण्याचे काम केले. सौदि अरेबिया आणि येमेनच्या युद्धात अडकून पडलेल्या हजारो भारतीय नागरीकांच्या सुटकेसाठी त्यांची मध्यस्ती यशस्वी ठरली आहे. 

तसेच सध्या लदाख गलवान आणि डोकलाम प्रकरणात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सहसचिव म्हणून त्यांनी केलेले काम व त्यामुळे मिळालेली यशस्वीतता ही बाबही उल्लेखनीय ठरली आहे. या सर्व कार्यालयाची दखल घेवून केंद्र शासनाने त्यांची चेक गणराज्यचे नवे राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे.

त्यांच्या रुपाने युरोप देशात राजदूत होण्याचा मराठवाड्याला पहिल्यांदाच मान मिळाला आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे मुख्यमंत्र्यांचे माजी सचिव प्रवीण दराडे, लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आशुतोष डुंबरे, अभियंता राजेंद्र पत्तीवर, कवि बापू दासरी आदींनी श्री. कोटलवार यांचे अभिनंदन केले आहे.


(संपादन : प्रताप अवचार) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani News : अतिवृष्टीग्रस्त परभणी जिल्ह्यासाठी १२८ कोटींची आर्थिक मदत मंजूर; शेतकऱ्यांना थेट खात्यात जमा होणार नुकसानभरपाई

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Latest Maharashtra News Updates : अक्कलकोट तालुक्यात ओला दुष्काळाची स्थिती – जयकुमार गोरे

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

Pune Heavy Rain : पाषाण परिसरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी; चाकरमान्यांचे हाल, सखल भागात पाणी साचले

SCROLL FOR NEXT