murum.jpg 
मराठवाडा

Corona Breaking : मुरूम शहरात कोरोनाचा शिरकाव, बाधित परिसर केला सील 

महेश मोटे

मुरूम (जि. उस्मानाबाद) : शहरातील यशवंत नगर भागातील पाण्याच्या टाकीजवळील एक रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल शनिवारी (ता.११) रोजी सकाळी प्राप्त झाला. नऊ तारखेला पाठवण्यात आलेल्या स्वॅब तपासणीतील प्रलंबित असलेला एक स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे उमरगा तालुक्यात आता कोरोना बाधितांची संख्या ५२ वर पोहचली आहे. 

मुरूम शहरात आजवर एकही रुग्ण नव्हता अचानकपणे हा रुग्ण आढळल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित रुग्ण हा हॉटेल व्यावसायिक असल्याने अनेक लोकांच्या संपर्कात आला असल्याचे समजते. ज्यांचा या रुग्णांशी संबंध आलेला आहे अशा नागरिकांनी मनामध्ये भीती न बाळगता ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे. 

दरम्यान शनिवारी सकाळी शहरातील यशवंत नगर भाग सील करण्यात आला. ही परिस्थिती लक्षात घेऊन उमरग्यातील उपविभागीय महसूल अधिकारी तथा दंडाधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार, मुरूम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत बारवकर, पोलीस उपनिरीक्षक शिवदर्शन बिरादार, वैद्यकीय अधिक्षक वसंत बाबरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सत्यजित डुकरे, नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक हेमंत देशपांडे, उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे आदींनी या परिसरामध्ये येऊन तात्काळ यशवंनगर भागातील पाण्याच्या टाकीजवळील संपूर्ण भाग सील केला. 

सदर परिसरात नगरपरिषदेच्या वतीने निर्जंतुकीकरण करण्यात येऊन जवळपास ५० घरांचे आरोग्य खात्याकडून थर्मल स्कॅनिंग मशीनद्वारे तपासणी करण्यात आली. सदर पॉझिटिव्ह रुग्ण हा मूळ भालके गल्ली प्रभाग क्रमांक सात मधील असून त्या रुग्णाच्या परिवारातील अनेक सदस्यांनी अन्य गावातील नागरिकांची संपर्क साधल्याचे बोलले जात आहे.

प्रशासनाने यासंदर्भात अधिक दक्षता घेऊन प्रभाग क्रमांक सातमध्ये लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. नगरपरिषद व पोलीस प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून गावातील प्रत्येक चौकांमध्ये जनजागृती करणारे फलक लावून व पोलिस बंदोबस्त वाढवून यंत्रणा सज्ज झाली आहे.

संपादन : प्रताप अवचार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT