Aurangabad news  
मराठवाडा

राशीभविष्य : धनू, मकर आणि कुंभ यांनी साडेसातीच्या काळात...

सकाळ डिजिटल टीम

ज्योतिष शास्त्रामध्ये शनिला मोठे महत्त्व आहे. अनेक शनिभक्त शनिशिंगणापूरला येऊन दर्शन घेतात. दर शनिवारी शनीच्या मूर्तीवर तेल वाहतात. पीडा हरणासाठी अजून काय नाना उपाय करतात. वेदमूर्ती ज्योतिषाचार्य अनंत पांडव यांनी शनीच्या सध्याच्या ग्रहदशेबद्दल eSakal.com च्या वाचकांसाठी काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. 

ज्योतिषाचार्य म्हणतात, की शनिमहाराज हे सर्व ग्रहांमध्ये न्यायाधीश आहेत. जे चांगले कार्य करतात, त्यांना शनी चांगले फळ देतो. जे वाईट कृत्ये करतात, त्यांना शनी शिक्षा देतो. ग्रहराज शनिमहाराज हे सूर्य आणि छाया यांचा मुलगा आहेत, अशी श्रद्धा आहे. शनिवार हा शनिमहाराजांचा विशेष दिवस आहे. तसेच यमराज हा शनिमहाराजांचा भाऊ आणि यमुना ही बहीण आहे.

धनू : आर्थिक वृद्धी होईल. आपण मुळातच एक उत्तम सल्लागार आहात. विद्वान आहात व सात्विक वृत्ती आहे. साडेसातीचे २०१८-१९ हे वर्ष पूर्णपणे खराब गेले. प्रत्येक कामात अडथळे व अपयश आले. परंतु आता मात्र तसे होणार नाही.

या वर्षात आर्थिक वृद्धी होईल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न मार्गी लागतील. तसेच बराचसा ओढा अध्यात्माकडे राहील. अचानक धनलाभाचेही योग आहेत. नोकरी/व्यवसायात वृद्धी होईल. नवीन कल्पना सुचतील. त्या अंमलात येतील व त्यात यशही मिळेल. 

मकर : साडेसाती आहे, त्यामुळे अखंड सावधान राहा. आपला स्वभाव धीरगंभीर, भावनाप्रधान, शिस्तप्रिय आहे. लोकांचे आपल्याबद्दल प्रचंड गैरसमज आहेत. त्यात साडेसाती आली आहे. त्यामुळे मानसिक क्लेश खूप संभवतात.

कमालीचा एकांतवास जाणवेल. त्यामुळे आपणच शांतता, संयम ठेवावा. जिभेवर पूर्णपणे नियंत्रण ठेवावे. लेखक असाल, तर एखादी सुंदर कलाकृती आपल्याकडून लिहिली जाईल. पती/पत्नीने एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे. कायदा मोडू नका. नाही तर अटक होण्याचे योग आहेत.

कुंभ : साडेसातीला सुरवात झाली आहे. आपल्या लग्नेशाचे व्ययस्थानातून भ्रमण होत आहे. त्यामुळे कोणतेही कारण नसताना आपणाकडून नुकसान होऊ शकते. वास्तविक आपल्याला हुशारी व धूर्तपणा हे गुण मुळातच मिळाले आहेत. त्यामुळे नुकसान होणार नाही. दक्षता घ्या.

नोकरी/व्यवसायात दीर्घकालीन एखादी अडचण उभी राहू शकते. आरोग्याची काळजी घ्या. डॉक्टरांना निदान होण्यास अडचणी निर्माण होतील. विवाह ठरविताना काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच आपली फसवणूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasai Virar Election : वसई–विरार महापालिका निवडणुकीत माघारींचा धडाका; २८६ उमेदवार बाहेर; ५४७ रिंगणात!

Pune Political : उमेदवारी नाकारताच राष्ट्रवादी शरद पवार पक्षात खदखद; पुण्यात बैठकीत इच्छुकांचा गोंधळ!

Satish Bahirat : एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या पक्षनिष्ठेची, पुन्हा एकदा चर्चा!

Tamhini Ghat Accident: 'त्याच' थारवर जाऊन कार कोसळली; ताम्हिणी घाटात पुन्हा तसाच अपघात, एकाचा मृत्यू

Paithan Political : उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात; पैठणच्या राजकारणात उत्सुकता ताणली!

SCROLL FOR NEXT