Latur News 
मराठवाडा

चोराने पळवले भिंतीवरील घड्याळ, मिक्सर अन्‌ शेवगासुद्धा

सुशांत सांगवे

लातूर : घरफोडी झाल्यानंतर सोन्या-चांदीचे दागिने, मौल्यवान हिरे-मूर्ती किंवा रोख रक्कम चोरीला गेली, अशा बातम्या तुम्ही आजवर पाहिल्या, वाचल्या आहेत. अशा घटना शहरात वारंवार घडतातही. पण, घरफोडीच्या घटनेत भिंतीवरील घड्याळ, मिक्सर, शेवगा अशा वस्तू चोरीला गेल्याचे तुम्ही कधी वाचले-ऐकले नसेल. पण अशी घटना लातूरात घडली आहे. या घटनेतील एका चोरट्याला पोलिसांनी मंगळवारी (ता. १७) ताब्यातही घेतले आहे.

मार्केट यार्ड भागात महेश हरिदास गरड (वय ३२) हे राहतात. ते एका खासगी कंपनीत अभियंता म्हणून काम करतात. कामानिमित्त ते रविवारी (ता. १५) तुळजापूर येथे गेले होते. देवीचे दर्शनही घेता येईल म्हणून कुटूंबासह ते तुळजापूरला रवाना झाले. पण, त्यांना कामामुळे तुळजापूरमध्येच मुक्काम करावा लागला. त्याच रात्री त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरटे घरात शिरले.

घरातील कपाटात रोख १५ हजार रुपये होते. याशिवाय, बँकेचे चेकबुक, पासबुक, एटीएम कार्ड, गाडीचे आरसी बुकही होते. चोरट्यांनी ते आपल्या बॅगेत टाकले. घरातील २७ साड्या (१५ हजार), मिक्सर (२ हजार) , भिंतीवरील घड्याळ (दोनशे रुपये), शेवगा (१ हजार) इतकेच काय बेनटेक्सचे दागिनेसुद्धा चोरट्यांनी आपल्या बॅगेत भरून घरातून पळ काढला. या घरफोडीत ४१ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला. तुळजापूर येथून परत आल्यानंतर गरड यांना सोमवारी (ता. १६) सकाळी हा प्रकार समजला. त्यानंतर त्यांनी गांधी चौक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

साथीदाराचा शोध अद्याप सुरू

पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर बाजूच्या इमारतीवरील सीसीटीव्ही असल्याचे निदर्शनास आले. त्यावरील फुटेज पाहिल्यानंतर दोन चोरटे पोलिसांना दिसले. त्यापैकी एकाला पोलिसांनी लगेच ताब्यातही घेतले. बाळू बाबूराव कांबळे (वय २८, रा. बौद्ध नगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडील साड्या, घड्याळ, शेवगा, मिक्सर, पासबुक, एटीएम कार्ड पोलिसांनी जप्त केले आहे. त्याच्या साथीदाराचा शोध अद्याप सुरू आहे, अशी माहिती पोलीस कर्मचारी संतोष गोसावी यांनी दिली.

हेही वाचा -  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''माझा भाऊ...'' मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

मासिक पाळी आली की गाव सोडावं लागतं, प्रसूतीनंतरही २१ दिवस वनवास; आंध्र प्रदेशातील धक्कादायक प्रथा...

MSRTC Udgir Chaos: उदगीरच्या ४९ एसटी बसेस कोकणात; स्थानिक वाहतुकीचे तीनतेरा, प्रवाशांना बसस्थानकावर ताटकळावे लागले

Leopard Terror: मांजरी खुर्दमध्ये बिबट्याचा कहर; गोठ्यात घुसून वासराचा फडशा, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

National Unity Day : गुजरातमध्ये पार पडणार राष्ट्रीय एकता दिन ; संजीवनीचे बॅण्ड पथक देणार पंतप्रधान मोदींना सलामी

SCROLL FOR NEXT