latur crime news 
मराठवाडा

हिरेमठ पेट्रोलपंपावरील सशस्त्र दरोडा; तिघांना सक्तमजुरी, महिला पोलिसाची निर्दोष मुक्तता

विकास गाढवे

लातूर : लातूर ते बार्शी रस्त्यावरील हिरेमठ पेट्रोल पंपावर चार वर्षांपूर्वी सशस्त्र दरोडा टाकल्या प्रकरणात जिल्हा न्यायालयाने तिघांना सात वर्ष सक्तमजुरी व पंचवीस हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झालेल्या एका महिला पोलिसांची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. पाचवे जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.पी.रागीट यांनी हा निकाल दिला. 


याबाबत सहायक सरकारी वकील विठ्ठल व्ही.देशपांडे यांनी सांगितले, की हिरेमठ पेट्रोल पंपावर १६ जानेवारी २०१७ रोजी सायंकाळी पावणेआठ वाजता दुचाकीवरून आलेल्या तिघांनी दरोडा टाकला. एकाने पंपावरील कर्मचारी विनोद रामसिंग ठाकूर याच्या कानपट्टीला पिस्तूल लावून कॅश बॅग मागितली. ती न दिल्यामुळे त्याने पिस्तुलातून हवेत गोळी झाडली व दुसऱ्याने कत्तीने बॅग कापून घेतली. तर तिसऱ्याने सेल्स कॅबिनमध्ये बसलेले पंपाचे मालक श्रीकांत हिरेमठ यांच्या दिशेने एक गोळी झाडली व हिरेमठ यांना कॅबिनकडे ओढत त्यांच्याशी झटापट करू लागला. यावेळी ठाकूर यांच्याजवळील दोघांपैकी एकाने हिरमेठ यांच्याजवळ जाऊन एक गोळी झाडली.

ती गोळी काचेवर लागून कपाटाची काच फुटली तर दुसऱ्याने हिरेमठ यांच्या डाव्या हातावर कत्तीने वार करत त्यांना जखमी केले आणि त्यांच्याकडील सोन्याचे लॉकेट, माळ व अंगठी काढून घेतली. त्यानंतर तिघेही दुचाकीने मुरूडच्या दिशेने निघाले. या वेळी ठाकूर व अन्य कर्मचाऱ्यांनी आरोपींवर दगडफेक केली. एकाला दगड लागला व त्याच्या हातातील पिस्तुल तिथेच पडले. मात्र, तिघेही पळून जाण्यात यशस्वी झाले. या प्रकरणी ठाकूर याच्या फिर्यादीवरून गातेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांच्या वेगवान तपासात प्रभुलिंग महादेव लखादिवे (रा.पाखरसांगवी), प्रदीप लिंबाजी ओगले (रा.साईरोड, आर्वी) व सचिन संभाजी कावळे (रा. विर हणमंतवाडी, लातूर) यांनी दरोडा टाकल्याचे उघड झाले. या तिघांना अटक केल्यानंतर महिला पोलिस वर्षाराणी सुधाकर चव्हाण हिचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे तिलाही अटक करून पोलिसांनी तपासाअंती न्यायालयात चौघांविरूद्ध दोषारोपत्र दाखल केले. या प्रकरणाचा प्राथमिक तपास सहायक पोलिस निरीक्षक एस.ए.चव्हाण यांनी केला तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी. आर. सोनटक्के यांनी तपास पूर्ण केला.  


तीन आरोपाखाली शिक्षा

पाचवे जिल्हा व सत्र न्यायाधीश रागीट यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यात २४ जणांची साक्ष नोंदवण्यात आली. फिर्यादी ठाकूर व हिरमेठ यांच्यासह प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची ठरली. त्यावरून न्यायालयाने दरोड्याप्रकरणी प्रभुलिंग लखादिवे, प्रदीप ओगले व सचिन कावळे यांना दोषी ठरवत महिला पोलिस चव्हाण हिची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. दरोड्याच्या गुन्ह्यात तिघांना सात वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी पाच हजार रूपये दंड, सशस्त्र दरोड्याच्या आरोपाखाली सात वर्ष सक्तमजुरी तर शस्त्र कायद्यानुसार प्रभूलिंग लखादिवे व सचिन कावळे या दोघांना सात वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
 

जखमी हिरेमठ यांना भरपाई
या प्रकरणात आरोपीकडून वसुल केल्या जाणाऱ्या पंचवीस हजार रूपये दंडाच्या रक्कमेतून दहा हजार रूपये जखमी हिरेमठ यांना त्यांच्या उपचारासाठी तर कॅबिनच्या काचेच्या नुकसानीची भरपाई म्हणून द्यावेत, असा आदेश न्यायालयाने दिल्याचे सहायक सरकारी वकील देशपांडे यांनी सांगितले. या प्रकरणात अॅड. देशपांडे यांना अॅड.वैशाली वीरकर, परमेश्वर तल्लेवाड व पैरवीकार जमादार जीवन राजगिरवाड यांनी साह्य केले.  

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians ने रिलीज केलेल्या खेळाडूने इतिहास घडवला, २४ वर्षांच्या पोराने जाँटी ऱ्होड्सचा विक्रम मोडला; जगात असा पराक्रम करणारा पहिलाच...

Chandrapur Car Accident: राजूराजवळील भीषण अपघातात पाच ठार; आर्टिगा कार पुलावरून कोसळली, चालकाचे नियंत्रण सुटलं अन्..

Makar Sankranti 2026: यंदा 14 की 15 जानेवारी, कधी साजरी होणार मकर संक्रांती? जाणून घ्या शुभ मुहूर्त अन् महत्व

खरा आत्मविश्वास चेहऱ्यावर नाही, विचारांमध्ये असतो! महिलांसाठी खास प्रेरणादायी विचार

तुला पाहते रे! गायत्री दातारने दाखवला होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा; काय करतो अभिनेत्रीचा मिस्टर परफेक्ट? अर्ध जग फिरलाय अन्

SCROLL FOR NEXT