मुंबई

महत्त्वाची बातमी : रुग्णांसाठी ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा बहाल

मिलिंद तांबे

मुंबई : कोरोना कोविड-19 उपचारात रुग्णांसाठी अत्यावश्यक अशा ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार या वाहनांना रुग्णवाहिकेसारखा दर्जा देण्याची अधिसूचना गृह विभागाने आज जारी केली आहे. त्यामुळे आता वैद्यकीय ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या या  वाहनांवर सायरन असणार आहे. तसेच या वाहनांची वाहतूक रोखता येणार नाही. 

कोविड-19 रुग्णांवर वेळेत उपचार करण्यासाठी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन वायूचा पुरवठा सहजपणे उपलब्ध व्हावा यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 (2005 चा.53) चे कलम 38 चे उप कलम (1) आणि उपकलम (2) मधील खंड (एल) आणि साथ रोग अधिनियम- 19871897 चा 3) चे कलम 2 अन्वये यासाठी या वाहनांना रुग्णवाहिका चा दर्जा देण्यात आला आहे.

त्यानुसार आपत्ती काळात पुढील एक वर्षासाठी वैद्यकीय कारणास्तव वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिजन वायूची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहीका समकक्ष वाहन तसेच आपत्ती व्यवस्थापन कर्तव्यार्थ वाहन म्हणून समजण्यात येणार आहे. अशा वाहनांना केंद्रिय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 108 च्या उप नियम (7) तसेच नियम 119 च्या उप नियम (3) च्या तरतूदी लागू करण्यात येत आहे, असे गृह विभागाने काढलेल्या अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे. 

या महत्त्वाच्या बातम्याही वाचा : 

( संकलन - सुमित बागुल ) 

ambulance status for vehicles transporting oxygen state home department issued GR

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Union Budget 2026: मोठी बातमी! 15,000 शाळा व 500 कॉलेजमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब्स, गेमिंगमध्ये 10 लाख नोकऱ्यांचा मार्ग मोकळा

Nashik Kumbh Mela : हवाई दळणवळण ते मोबाईल नेटवर्क; सिंहस्थासाठी केंद्रीय मंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

Pune News: राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार घरोघरी करणार प्रचार; अजित पवार यांच्या चित्रफिती नागरिकांपर्यंत पोचविणार!

Union Budget 2026: होमस्टे, ई-व्हिसा आणि कनेक्टिव्हिटी वाढणार, परदेशात जाणे स्वस्त होणार; बजेटमध्ये मोठी घोषणा

Rohit Shetty Shootout : रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट! चार जणांना पुणे पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT