eknath shinde devdnra fadivns shriant shinde  sakal
मुंबई

Ekanth Shide: कल्याणची जागा हवी तर ठाण्याचा हट्ट शिंदेंना सोडावा लागेल; भाजपची भुमिका?

ठाण्याची कल्याणमधून कोंडी; भाजपची रणनिती शिंदे तिढा कसा सोडवणार |Dilemma from Thane welfare; How will BJP's strategy solve the Shinde rift?

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

Kalyan Loksabha News: महायुतीत जागा वाटपात ठाणेकल्याणच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या ठाणे मतदारसंघावर भाजप आपला दावा कायम ठेवून आहे.

ठाण्याची जागा मिळावी यासाठी भाजपने कल्याणमधून शिंदे यांची कोंडी केल्याची चर्चा आहे. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी कल्याणमधून निश्चित असल्याचा प्रचार भाजपनेच येथे मेळावे घेत सुरु केला. (Kalyan MP Shrikant Shinde)

त्या मेळाव्यांमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांनी मात्र उघड उघड नाराजी दाखविली असून भाजपचे मंत्री चव्हाण यांनी देखील अप्रत्यक्षरित्या आमच्या सहकार्याशिवाय पर्याय नसल्याचे शिंदे यांना दाखवून देत असल्याचे जाणकार सांगत आहेत.

ठाण्यात चिन्ह तुमचे उमेदवार आमचा असा प्रस्ताव देखील भाजपने सेनेपुढे ठेवला असल्याची माहिती असून कल्याणची जागा हवी तर ठाण्याचा हट्ट शिंदे यांना सोडावा लागेल असाच पवित्रा भाजपने घेतल्याची माहिती जाणकारांनी दिली. महायुतीच्या या तिढ्यामुळे ठाकरे गटाची देखील कोंडी झाली असून त्यांनाही आपला उमेदवार अद्याप निश्चित करता आलेला नाही.(eknath shidne vs bjp Thane)

महायुतीच्या जागा वाटपाच्या पहिल्या फेरीत मुख्यमंत्र्यांनी बाजी मारत आत्तापर्यंत आपल्या सात खासदारांना उमेदवारी मिळवून दिली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचा वरचष्मा असलेल्या ठाणे, पालघर, कल्याण या मतदारसंघातील चित्र अजूनही स्पष्ट झालेले नसल्याने शिंदे समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

ठाणे मतदारसंघावर भाजप आपला दावा कायम ठेवून आहे. भाजपचे नेते गणेश नाईक यांचे पुत्र माजी खासदार संजीव नाईक यांच्यासाठी भाजपने या जागेवर दावा केला आहे. (BJP has claimed this seat for former MP Sanjeev Naik)

ही जागा मुख्यमंत्री यांना सोडावी लागली तरी दोघांच्या सहमतीचा उमेदवार म्हणून नाईक यांनी धनुष्यबाण चिन्हावर ही निवडणूक लढवावी असा प्रस्ताव देखील भाजपने शिंदे यांच्यासमोर मांडला आहे.

यामुळे ठाण्यातील इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ठाण्याची जागा भाजपला मिळावी यासाठी भाजपने कल्याण मधून शिवसेनेची कोंडी केल्याचे चित्र आहे. (loksabha election 2024)

मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा कल्याण हा मतदारसंघ असून या मतदारसंघातून त्यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी सुरुवातीपासून शिवसेनेने प्रयत्न केले आहेत. शिवसेना व भाजप मधील धुसफुस चव्हाट्यावर आली आणि त्यातच भाजपने कल्याण लोकसभा मतदारसंघावर आपला दावा करत शिंदे यांच्यापुढे अडचणींचा डोंगर उभा केला.(eknath shinde kalyan loksabha)

. मनसेची महायुतीसोबत दिलजमाई झाली आणि भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी आचारसंहितेच्या पूर्वी विकास कामांच्या वेळी खासदार शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील अशी घोषणा करत शिंदे यांना खूश केले. मात्र त्यानंतर दिव्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी येथे उमेदवार कोणी असो त्याने कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी असे निवेदन पक्ष प्रदेशाध्यक्षांना देत शिंदे यांच्याविषयी असलेली नाराजी उघड केली. यानंतर मंत्री चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कल्याण लोकसभा मतदारसंघात मेळावे घेतले गेले. या मेळाव्यात शिंदे यांच्याविषयी डोंबिवली येथील कार्यकर्त्यांनी देखील नाराजी असल्याचे घोषणाबाजी करत दाखवून दिले.

यावेळी मंत्री चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हटले होते की, ''मला वेगवेगळ्या ठिकाणी पक्षाने जबाबदारी दिल्याने प्रचारासाठी जावे लागणार आहे. त्यामुळे तुम्हालाच येथे उमेदवराचा प्रचार करायचा आहे. मोदी यांना निवडून देण्यासाठी काम करा. पंतप्रधान मोदी यांनी देखील म्हटले पाहीजे की हा मतदारसंघ कार्यकर्त्यांच्या जीवावर जिंकणारा संघ आहे.(bjp latest news marathi)

नेता येतो भाषण करतो मग परिवर्तन होते असा हा संघ नाही'' असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपच्या कार्यकर्त्यांची असलेली नाराजी व त्यांचे सहकार्य शिंदे यांच्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे सांगितल्याची चर्चा आहे. तसेच या मतदारसंघातील काही चाणक्यांनी केलेल्या सर्व्हेक्षणात शिंदे यांच्या विजयाबाबत सांशकता असल्याची चर्चा विनाकारण सुरु झाली आहे. कल्याणच्या जागेवर डोळा असलेले भाजपचे कार्यकर्ते देखील अशा चर्चांना उधाण आणत आहेत. (bjp in thane)

शिंदे यांनी ठाणे मतदारसंघ सोडला नाही तर कल्याणवर भाजपा दावा करेल. मंत्री चव्हाण यांच्यासारखा उमेदवार भाजपकडे आहे. किंवा मनसेचे आमदार राजू पाटील हे देखील ऐन वेळेला भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवतील अशी ही जोरदार चर्चा आहे. कल्याणची जागा पुत्र श्रीकांत यांच्यासाठी प्रतिष्ठेची असल्याने कल्याण ची जागा हवी तर ठाण्याची जागा भाजपला सोडावी लागेल अशी कोंडी भाजपने शिंदे यांची करुन ठेवली आहे. (shinde shivsena in kalyan)

महायुतीचा उमेदवार जाहीर होत नसल्याने महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाला देखील येथे आपला उमेदवार निवडताना कोंडी होत आहे. ठाणे व कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शेवटच्या क्षणी जाहीर करुन शिवसेना ठाकरे गटाला झुलवत ठेवणे, त्यांना जास्त संधी न देणे हे देखील उमेदवार जाहीर न करण्यामागचा उद्देश असल्याचे काही शिवसैनिकांचे मत आहे.(eknath shinde latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT