'स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत' अभियानाचा उडाला फज्जा
'स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत' अभियानाचा उडाला फज्जा 
मुंबई

'स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत' अभियानाचा उडाला फज्जा

रविंद्र खरात

कल्याणः मध्य रेल्वेच्या कल्याण ते कर्जत दरम्यान असलेले उल्हासनगर रेल्वे स्थानकात दुर्गंधी व अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून, फलाटांवर कचराकुंडी तुडूंब भरलेल्या पाहता रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलेल्या 'स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत' अभियानाचे उल्हासनगर रेल्वे स्थानकात फज्जा उडाला असून यामुळे रेल्वे प्रवासी त्रस्त आहेत.

मध्य रेल्वेच्या कल्याण ते कर्जत रेल्वे स्थानक दरम्यान उल्हासनगर रेल्वे स्थानक महत्वाचे स्थानक आहे. महिन्याला येथून सरासरी 20 लाख प्रवासी प्रवास करतात तर सव्वा कोटीच्या जवळपास उपन्न मिळते. या स्थानकात दोन फलाट आहेत. रेल्वे स्थानकातील शौचालयाची दुरावस्था झाली असून, परीसरात दुर्गंधी व अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. फलाटांवर कचराकुंडी तुडूंब भरलेल्या असून ती परिस्थिती पाहता किमान महिनाभर त्याकडे स्थानकातील स्वच्छता कर्मचारी वर्ग तिकडे फिरकला नसल्याचे समजते. स्थानक परिसर व फलाटांवरील ठिकठिकाणी असलेली घाण कचरा पाहता रेल्वे मंत्रालयाने घोषित केलेल्या स्वच्छ रेल, स्वच्छ भारत याचा उल्हासनर रेल्वे स्थानकात पुर्ण फज्जा उडालेला आहे.

रेल्वे स्थानकातील सरकता जिना कधी सुरू असतो का? असा प्रश्न असून तिकीट घरातील नियोजन नसल्याने तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागते. फलाट 2 वरील इंडीकेटर्स तांञिक बिघाडाने बंद असल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडते. स्थानक परिसरात फलाट 2 वर कोणतीही संरक्षक भिंत नसल्याने अतिक्रमण फलाटापर्यंत आल्याचे दिसते तर वॉटर व्हेंडिंग मशीन नव्यानेच बसविण्यात आलेय तीही बंद आहेत.

सुरक्षा वाऱ्यावर
उल्हासनगर मधील प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत असताना रेल्वे प्रशासन तेथे काय सुविधा देते किंवा सुरक्षेवर लक्ष देते? हा प्रश्न निर्माण झाला आहे. तेथील रेल्वे प्रशासन अधिकाऱ्याने दिलेल्या माहिती नुसार 4 सफाई कर्मचारी, 2 रेल्वे पोलिस, 4 रेल्वे सुरक्षा बल पोलिस कर्मचारी असल्याची नोंद आहे. मात्र, तेथे कधी असतात असा प्रश्न ही निर्माण होतो. यामुळे गेल्या काही दिवसात स्काय वाकवर गुन्हेगारी व चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यावर रेल्वेची हद्दीत नसल्याने रेल्वे पोलिस यांनी हात झटकले असून, राज्य पोलिस व मनपाकडे बोट दाखवत असल्याने सर्व सामान्य प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर आहे.

चक्क बकरी बांधल्या जातात
रेल्वे स्थानक मधील दुरावस्था, स्टेशन गाठताना तारेवरची कसरत प्रवाशांना करावी लागते. मात्र, रेल्वे स्थानकाच्या जिन्या खाली बकऱ्या बांधण्यात येत असल्याने या रेल्वे स्थानकात सुरक्षा व्यवस्था आहे की नाही? असा सवाल केला जात आहे.

प्रवासी संघटना पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारी नुसार उल्हासनगर रेल्वे स्थानकातील समस्या दूर करण्याचे आदेश संबधित अधिकारी वर्गाला दिले असल्याची माहिती मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.

ई सकाळवरील इतर ताज्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर, धाराशीव नामांतराला विरोध करणारी स्थानिकांची याचिका हायकोर्टाने फेटाळली

Latest Marathi News Live Update : "राजीव गांधी यांच्या काळात राम लल्लाची पूजा सुरू झाल्याचे पंतप्रधान मोदी विसरले"

Met Gala 2024 : किम कार्देशीयनने मेट गालामध्ये लावली चक्क स्वेटरमध्ये हजेरी ; फॅन्स झाले नाराज

Sharad Pawar: विरोधकांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण?, इंडिया आघाडी म्हणजे १९७७ मधला जनता पक्ष, शरद पवार काय म्हणाले?

Ajit Pawar : कारखाने बंद पाडायचा माझा उद्योग नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार

SCROLL FOR NEXT