मुंबई

#RepublicDay2020 : बलशाली आणि सर्वसमावेशक महाराष्ट्रासाठी कटिबद्ध - राज्यपाल कोश्यारी

सकाळवृत्तसेवा

मुंबई - आज देशभरात आपण भारताचा ७१ वा प्रजाससत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करतोय.  प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र सरकारतर्फे परेडचं आयोजन करण्यात येतं. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं गेलं. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील सपत्नीक उपस्थित होते. ध्वजारोहण झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना संबोधित केलं. यानंतर राज्यपालांनी मानवंदना देखील स्वीकारली. त्यानंतर भगतसिंह कोश्यारी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त परेडमध्ये सामील झालेल्या विविध दलांचं निरीक्षण केलं. यानंतर राज्यपालांनी महाराष्ट्राला संबोधित केलं. 

काय म्हणालेत राज्यपाल कोश्यारी ?  

संत ज्ञानेश्वर माऊलींना वंदन करून सुरवात

संत ज्ञानेश्वर माऊलींना वंदन करून राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संबोधनाची सुरवात केली. 

गड-किल्ले आणि स्मारकं 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला गती देण्यासाठी सरकार बांधील आहे. याचसोबत महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्या संवर्धन आणि संगोपनासाठी देखील राज्यसरकार बांधील असल्याचं राज्यपाल कोश्यारी म्हणालेत. इंदूमिलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाला गती देण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची उंची देखील वाढवण्यात आली आहे. हे स्मारक अन्याय आणि विषमतेविरोधात लढायला मदत करेल असं राज्यपाल म्हणालेत. 

शेतकरी कर्जमाफी आणि पीकविमा 

आम्ही सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत, शेतकरी सक्षम व्हावा, चिंतामुक्त व्हावा यासाठी सरकारने शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरु केली आहे. ज्यांचं कर्ज २ लाखांपेक्षा अधिक आहे त्यांच्यासाठी वेगळी योजना लवकरच आम्लात आणली जाईल. शेतकरी चिंतामुक्त व्हावं यासाठी  आम्ही कटिबद्ध आहोत. बळीराजाला चिंतामुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे असं राज्यपाल कोश्यारी म्हणालेत. पीकविमा योजनसेसाठी मंत्रिमंडळ समिती गठीत करण्यात आली आहे.    

विकासासाठी कटिबद्ध

आजपासून शिवभोजन योजनेचा प्रारंभ झालाय.या माध्यमातून गरिबांना १० रुपयात जेवण मिळणार आहे, याचा मला आनंद आहे. याचसोबत औद्योगिक प्रगती, व्यावसायिकांसाठी पुढाकार आणि विकासाला प्राधान्य दिलं जाईल. पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे.  

वन्य संरक्षण आणि महिला सबलीकरण 

वन्य संरक्षणात महाराष्ट्र अग्रेसर आहे. महाराष्ट्रातील वन्य जीव संरक्षण आणि संगोपनासाठी सरकार लक्ष ठेऊन आहे. याचसोबत राज्यातील महिला बचत गट, स्वयंसिद्धा, सवयंसहाय्यता गटांचं बळकटीकरण करण्यात येणार आहे. विधवा सबलीकरणासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यामाध्यमातून राज्यातील महिलांचं आर्थिक सबलीकरण होणार आहे. 

 रंगभूमीचा इतिहास सांगणारे संग्रहालय

लवकरच रंगभूमीचा इतिहास सांगणारे संग्रहालय उभारण्यात येईल. शिवडी नाव्हा-शिवा मुंबई ट्रान्स हार्बरच काम सुरु आहे, या माध्यमातून मुंबई नवी मुंबईला जोडली जाणार. याचसोबत कोस्टल रोडचं देखील उदघाटन करण्यात आलंय. हा प्रकल्पदेखील लवकरच पूर्ण करण्यात येईल 

सर्वसमावेशक महाराष्ट्रासाठी कटिबद्ध

राज्यभरात राज्य सुरक्षा सप्ताह पार पडला. याचसोबत महाराष्ट्रात पर्यावरण पूरक बाबींवर लक्ष देण्यासाठी विकास योजनांचं नियोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात सिंगल युज प्लास्टिक वापरावर बंदी आहे. यावर देखील योग्य नियोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात सर्व शहात्तर अमृतवाणी प्रकल्प राबवण्यात  येणार आहे. महाराष्ट्रात क्रीडा अकादमी स्थापन केली जाईल, याचा फायदा महाराष्ट्रातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील तरुणांना होईल.    महाराष्ट्रात सर्व विभागात CMO कार्यालयांची देखील सुरवात करण्यात आली आहे   ज्याचा देखील देखील सर्वांना फायदा होणार असल्याचं कोश्यारी म्हणालेत. संबोधनाच्या शेवटी 'बलशाली आणि सर्वसमावेशक महाराष्ट्रासाठी कटिबद्ध होऊयात ' म्हणत कोश्यारी आपलं भाषण थांबवलं.  

शिवाजी पार्कवरील पथसंचलनात कोण-कोण झालं सहभागी ? 

  1. भारतीय नौदल
  2. भारतीय तटरक्षक दल
  3. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल 
  4. छत्तीसगड पोलिस
  5. राज्य राखीव पोलिस बल
  6. एकत्रित महाराष्ट्र पोलिस दल 
  7. मुंबई पोलीस सशस्त्र दल 
  8. बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथक मुंबई
  9. सशस्त्र महिला पोलिस मुंबई
  10. लोहमार्ग पोलीस 
  11. गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याचे c60 पथक
  12. मुंबई वाहतूक पोलिस
  13. महाराष्ट्र मोटार वाहन विभाग 
  14. राज्य उत्पादन शुल्क
  15. वन विभाग 
  16. मुंबई अग्निशमन दल 
  17. बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल
  18.  सुरक्षा रक्षक मंडळ  ठाणे 
  19. जिल्हा राष्ट्रीय सेवा योजना मुले -मुली 
  20. सी कॅडेट कोअर मुले नंतर मुली
  21. रोड सेफ्टी पेट्रोल -मुले ,
  22. रोड सेफ्टी पेट्रोल मुली
  23. बृहन्मुंबई महानगरपालिका मुल-मुली
  24.  भारतीय स्काऊट गाईड
  25.  ब्रास बंड मुंबई पोलीस
  26.  पाईप बँड
  27. बृहन्मुंबई पोलीस अश्व दल पोलीस

प्रमुख आकर्षण 

यावर्षी नव्याने मुंबई पोलीस दलात सामील करण्यात आलेल्या अश्वदलाकडे सर्वांचं लक्ष होतं. या अश्वदलाकडून तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. यासचसोबत शिवाजी महाराजांच्या आरमाराचा चित्ररथ देखील या संचलनात सहभागी झाला. शिवाजी महाराजांच्या समुद्रीसीमा बंदिस्ती करण्यासाठी उभारलेल्या आरमाराचा चित्ररथ  यावेळी पाहायला मिळाला. कान्होजी आंग्रे यांची यशोगाथा या चित्ररथातून मांडण्यात आली. 

maharashtra governor bhagat sing koshayari on republic day event at shivajipark mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT